Problems ये जीवन हैं।
एखादी समस्या आली आणि तिचा स्वीकार केला की आपण त्या समस्येतून बाहेर येण्यासाठीच्या मार्गांचा विचार करू लागतो.
अशावेळी प्रथम त्या समस्येकडे चॅलेंज म्हणून पाहावे.स्वतःला विचारावे, “मी ही समस्या पार करू शकणार आहे का? ही समस्या सोडवायला मी योग्य व्यक्ती आहे का?”उत्तर जर ‘हो’ आले तर चॅलेंज स्वीकारायचे आणि समस्येतून बाहेर यायचे.उत्तर जर ‘नाही, तुला नाही जमणार!” असे आले तर ह्या बाबतीत बोलण्यासाठी कोण योग्य व्यक्ती आहे. याचा विचार करून त्या व्यक्तीशी मोकळेपणे बोलून मोकळं व्हावे. वास्तविक समस्येवर मोकळं बोलले की जवळजवळ पन्नास टक्के ताण हलका होतो आणि कधी कधी आपण बोलत असतानाच आपल्यालाच त्यावरचे उत्तर सापडते.
मात्र येथे ‘योग्य व्यक्ती’ हा शब्द फार महत्वाचा आहे.मग ती व्यक्ती मित्र- मैत्रीण, कुटुंबातील सदस्य, वयाने लहान- मोठी असणारी किंवा समुपदेशक ( counselor) अशी कोणीही पण एखादीच असू शकते. ती अशी असावी की जी गॉसिपिंग करणार नाही, आपली समस्या ऐकून घेऊन मदत करू शकेल असा आपल्याला विश्वास हवा.नाही तर कधी कधी कोणाजवळ कसे बोलावे म्हणून स्वतःच सर्व सहन करत बसतात किंवा कोणीही आले की त्याच्याजवळ सांगत बसतात. या गोष्टींमुळे मनस्ताप वाढतो आणि योग्य मार्ग मिळत नाही.त्यामुळे,’ ये ही हैं राईट चॉईस’ अशा व्यक्ती आपल्या कोण कोण आहेत ते शोधा आणि नसतील तर आता जोडा.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!क्लिक करा!
छान आहे
लेख आवडला छानच
Yogya vyakti kon aahe he kase samjel sir?
छान लेख आहे