
ग्रहणांचा गर्भावर परिणाम होतो हे खरे आहे काय ?
अंधश्रध्दा, प्रश्नचिन्हे आणि पूर्णविराम
( संकीर्ण – सूर्यग्रहण विशेष )
ग्रहणकालात गरोदर बाईने भाजी अगर इतर पदार्थ चिरला, तर गर्भाचा ओठ चिरला जातो. एखादी वस्तू गर्भार बाईने मोडली ( ग्रहणकालात ) तर गर्भाचा अवयव मोडतो. इत्यादी समजुती आपल्याकडे प्रचलित आहेत. भारतात असल्या कल्पित अवास्तव कथांचे पीक उदंड आहे. ग्रहण ही दैवी घटना आहे. चंद्रग्रहणाचे वेळी केतू चंद्राला गिळतो व सूर्यग्रहणाचे वेळी राहू सूर्याला गिळतो, वगैरे.
ग्रहण ही दैवी घटना नाही. खगोलशास्त्र व प्रकाशशास्त्र यांच्या अभ्यासातून ग्रहणांची कारणे वैज्ञानिकांना माहीत झाली आहेत. पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत आल्यावर ग्रहणे घडतात. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यास पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची सावली पडते. या भागातील लोकांना सूर्य दिसत नाही, यास सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य व चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली, की पृथ्वीच्या सावलीत चंद्र येतो, अशा वेळी चंद्रग्रहण होते.
नेहमीपेक्षा वेगळ्या वाटणा-या व ज्याचा उलगडा होत नाही अशा घटनांना दैवी शक्ती चिकटविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून चालत आला आहे. विज्ञानाचा एवढा प्रसार होऊनही असे मानणारे लोक आपल्या देशात उदंड आहेत.
ग्रहणकालात गरोदर बाईने नेहमीची कामे करायला हरकत नाही. ग्रहणकाळात अन्न व पाणी दूषित होते असे मानणे हास्यास्पद आहे. घरात ठेवलेल्या घागरीतील पाणी दूषित होते, मग नदीचे पाणी शुध्द कसे राहाते ? ते तर अधीक दूषित झाले पाहिजे. अशा दूषित पाण्यात अंघोळ करून ग्रहणकाळात अशुध्द झालेले शरीर कसे शुध्द होते ?
आल्डस हक्सले हा विख्यात आंग्ल लेखक भारतात आला असताना कुंभमेळ्याच्या ठिकाणी त्याला काय दिसले ? चिखलाने, गाळाने, अस्वच्छ झालेल्या गंगेत हजारो लोक अंघोळ करीत होते. रोगी लोकांची त्यात भर.
हे किळसवाणे दृश्य पाहून हक्सले म्हणाला, ” मी लक्षाधिशाचा मुलगा असतो तर हिंदुस्थानातील माणसांना निरीश्वरवादी बनविण्यात मी आयुष्य घालविले असते.”
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!


लेख खूप चांगला आहे, 21या शतकात अपंग असलेल्या लेकरांना कचर्यामध्ये जमिनीमध्ये गाडून ठेवने अशा खूप सार्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, हे भारताचं दुर्दैव आहे, जोपर्यंत या जगात देव नावाचा शब्द आहे तोपर्यंत देव विरूद्ध सैतान, भूत, भिती, स्वर्ग नर्क, हे शब्दही अस्तित्वात राहणार, आणि हे सर्व थांबवायचे असेल तर सर्व कर्मकांडा विरूद्ध लढणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ, नरेंद्र दाभोळकर, पानसरे कलबूरगी लेखक यांच्या दिवसा ढवळ्या हत्या घडवल्या जातात, आणि याचा तपास सूद्धा होत नाहीत ,किती दुर्भाग्य?
या सर्व लोकांच्या मागे आपण ठाम पणे ऊभे राहायला हवं
अन्यथा येणारी पिढी सूद्धा आपण नकळत अशीचं घडवणार आणि येणार्या पिढीच्या पदरात देव धर्म, ऊपास तापास
कर्मकांड आपण जर टाकले, तर मग आपल्या सारखे कर्मदरीद्री दैववादी स्वःताच्या मनगटावर विश्वास न ठेवता देवाच्या भरवशावर जगणारे, कोनिचं नसणार, जर खरचं भारतं महासत्ता बनवायचा असेलं तर अंधश्रद्धेचा जोखडातून बाहेर पडावं लागेलं ,अंधश्रद्धा मुक्तीची खरी सूरवात असेल
Khup chan
लेख छान आहे.अंधश्रद्धेऐवजी ग्रहणातून निर्माण होणारा प्रखर प्रकाश गर्भातील बालकांचे आयुष्य प्रकाशमय करेल ,तसेच , ग्रहणामुळे जर वातावरणात काही प्रतिकुल परिस्थिती निर्माण होत असेल ,तर ,येणारे बालकास प्रतिकुल परिस्थितीत कसा मार्ग काढावा याचे शिक्षण गर्भावस्थेतच मिळेल.असे विचार अंर्तमनावर बिंबवले तर तसेच घडेल.
खरे आहे पण आपणावर धर्मतील चांगल्या गोष्टी ऐवजी दुसऱ्या अवास्तव गोष्टी थोपवण्यात आल्या आहेत बहुतेक हा त्याचा परिणाम असेल।
खुपच छान…
लोकांना अंधश्रद्धेपासुन परावृत्त केले पाहिजे
Nice