
पोरांना थोडंस घासू द्या!
कामानिमित्त नेहमीप्रमाणे औरंगाबाद गेलो होतो.
बड्या व्यापाऱ्याच्या मुलानी… नेहमीचे संबंध असल्यामुळे “चहा मागवला”..
आज शॉप मध्ये गर्दी कमी होती म्हणून …थोड्या गप्पा झाल्या…..
मी त्याला विचारले…” कितवीत आहेस? ”
त्यावर तो मुलगा म्हणाला ..”मी बारावीत आहे”
मी थोडं खोलात जाऊन …त्याची दिनचर्या विचारली तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलाने आपली दिनचर्या सांगितली………
बघा त्यातून काही बोध घेता येईल का…….
तो मुलगा आपली दिनचर्या सांगू लागला …….
“हर्षल संचेती सर, मै सवेरे मॉर्निंग मे ९ बजे शॉप ओपन करता हू.. साथ मे खाने का टिफिन भी लाता हू, फिर ११ बजे डायरेक्ट शॉप से कॉलेज जाता हू…. फिर श्याम ५.३० बजे कॉलेज छुटने के बाद फिर मै शॉप पर आता हू…..
और ९ बजे शॉप बंद करके… हम सब घर जाते है…..
मैने पुछा ..”पढाई कब करते हो,”
उस लडके ने कहा रात को और सुबह जल्दी उठकर करता हू…..”
फिर मैने पुछा…” त्योहार को जब छुटी होती है, तब आप क्या करतो हो”….
उस लडके ने कहा …” सर मै शॉप पर ही रहता हू
म्हणजे लक्षात घ्या …करोडो रुपयांची संपत्ती त्या व्यापाऱ्याच्या मुलाकडे असूनही त्याला काम करून शिक्षण घ्यावे लागते….
त्याचे वडील त्याला नोकराच्या तोडीचे काम सांगत होते…..
आणि तो मुलगा ते काम आवडीने करीत होता…
आणि या उलट छटाकभर संपत्ती असणारे आपले नोकरी वाले लोकं…. आपल्या मुलांना अजिबात शारीरिक धक्का लागू देत नाहीत …पाहिजे ती गरज रेडिमेड उपलब्ध करून देतात ……..
जवाबदारी ची जाणीव होईल अश्या कामांपासून कोसो दूर ठेवतात…….
फुकटात कोणतेही काम न करता ..पॉकेट मनी देत असतात………
आणि मग जेव्हा पोरगं निव्वळ शरीराने मोठं होते आणि अक्कल कवडीचीही दिसत नाही… हुशारी दिसत नाही ,तेव्हा हेच आई वडील पोराला दोष देतात…..
त्यालाही जबाबदारी येऊ द्या… जबाबदारी ची जाणीव होऊ द्या……..
लाड पुरवा परंतु…! त्याची थोडीशी जिरवतही जा…..
छोट्याश्या ,..कोवळ्या.. एक दोन वर्षांच्या वयातील बाळाला जेव्हा आई वडिलांनसमोर इंजेक्शन दिले जात असते…. तेव्हा बाळाला होणाऱ्या त्रासाकडे आईवडील दुर्लक्ष करीत असतात….*कारण पोराचा जीव महत्वाचं असतो…. कारण तो आजार दूर होणं महत्वाच असतं …….
अगदी त्याच प्रकारे…… आपल्या मुलांना थोडंस त्रास होऊ द्या…. मग येईल अक्कल हळूहळू….
मुलगा शाळेच्या मार्कशीट वर किती मार्क घेतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे.. जीवनात किती यशस्वी होतो याला जास्त महत्व असायला पाहिजे …….
पहा पटतंय का ? ……… ??
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !

खूप छान लेख.सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या की किंमत राहत नाही वस्तूचीही आणि व्यक्तीचीही.काही मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी झटावं लागतं हे हया लेखाचा उद्देश खरचं छान आहे.
Khup changla lekh ahe.
खुपच सुंदर
खूपच छान धन्यवाद
खूपच छान वाटला. फ्रीमध्ये सर्व मिळाल कि जबाबदारीची जाणीव होत नाही.
Khup chan asech lekh aankhi have parenting var
Mast ashe. ….. Khar ch ya goshti jade lakshat dyayla have as vatat
खुप छान माहिती दिली आहे