Skip to content

मूर्ख असतात त्या व्यक्ती, ज्या आत्महत्या करतात!

का वाढताय आत्महत्या ?


सौ.सविता दरेकर


पेपरला वाचण्यात आले ,नववीतल्या मुलाने आत्महत्या केली ..कारण छोटेच परीक्षेत जरा कमी मार्क मिळाले…!
तसे पेपरला रोजच कुठलीना कुठली आत्महत्येच्या बातम्या झळकताच..

कधी तरुण शेतकरी कर्जाला, सततची नापिकीला,शेतमाल पिकतो तर कधी भाव सापडत नाही म्हणून कंटाळून आत्महत्या करतो…
कुणी महीला संसारातल्या कटकटींना त्रासुन तर कधी मुलीही समाजाच्या विकृतीला घाबरून जीव संपवतात…

पण का? का करावे असे…मिळालेला जन्म शेवटच्या श्वासापर्यत का नाही टिकवु शकत दुबळे ,हळवे मन हा मोठा प्रश्न आहे …यासाठी, गावोगाव,शाळामधे निराशेच्या मानसिकतेवर समुपदेशन,प्रबोधन करणे काळाची गरज आहे …

लहान मुलं आसो का मोठे माणसं ..पण प्रत्येकाची मानसिकता का निराश होत चाललीय? प्रत्येकाला आपला असा जीवाचा जीवलगासारखा मायेचा विश्वासाचा आधार हवाय…कुठे हरवत चाललाय हा आधार हा विश्वास …? याचा शोध घ्यायला हवा प्रत्येक मनाने ….

जन्माला येतो तेव्हा पासुन आईवडील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपता रात्र रात्र जागवून आई बाळाला वाढवते सांभाळते खाऊपिऊ घालते….ते मुल असे जगातून अचानक जाताना पाहून त्या आईच्या काळजाचा घाव कसा भरणार…!

मागे असलेले कुटुंब जाणाऱ्याच्या आठवणीतून कसे सांभाळु शकणार हा विचार मनी का येत नाही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या ?

संघर्ष…संघर्ष ….संघर्षच तर खरा जीवन जगण्याचा अनुभव आहे जो आयुष्यातल्या सुखदुःखाची, प्रेमाची,स्वतःची,प्रत्येक नात्यांची जाणीव करुन देतो…

का घाबरतो जीवा …फक्त सुखाचाच विचार हवा कशाला, अन्न ,वस्र,निवारा आणि शिक्षण, ह्याच मुख्य गरजा पुरेशा आहे जगण्यासाठी…आणि मेहनतीने ह्या गरजा कमीजास्त प्रमाणात आपण पुर्ण करण्याईतके बळ प्रत्येकात दिलेय देवाने…

अपंगत्व असेल ते अपवाद आहे याला पण ते सुद्धा जिद्दीने लढताना दिसताय कमवताना दिसताय समाजात हे प्रेरणादायी आहे सुदृढ मनुष्यासाठी…

मग का हा पळकुटेपणा… आत्महत्या हा उपाय नाही हो समस्येचा…?
आतून अगदी आतून आवाज दिला पाहीजे स्वतःच्या अस्तित्वाला …स्वतःहाच स्वतःहाची उर्जा व्हायला पाहीजे…!कणखरपणा ,आत्मविश्वास जागवला पाहीजे..
नाहीच मिळाले काही तर उपाशी तर उपाशी ….पण शेवटचा श्वासापर्यत जगण्याची लढाई लढत राहीले पाहीजे न हरता …..जिंकण्यासाठी ….मृत्यूलाही…!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “मूर्ख असतात त्या व्यक्ती, ज्या आत्महत्या करतात!”

  1. Priyanka Khandode

    Kharach khup chan mahiti dili aahe.sdhya khup garaj aahe mansik aadharchi sglyana .aapla lekh tyasathi madat karel

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!