Skip to content

मनासारखे झाले नाही, म्हणून नाराज होताय का??

मनासारखे झाले नाही, म्हणून नाराज होताय का??


आपण बघत असतो घरात किंवा कामाच्या ठिकाणी लोक आपल्याला जसे वाटेल तसे वागत नाही. कदाचित आपण सांगितलेले काम ते ऐकतील पण वागणे ही एक वेगळी गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा समोरच्या माणसाने आपल्या मनाप्रमाणे वागले पाहिजे हा हट्ट सोडून दिला पाहिजे. कारण प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि त्यानुसार वागण्याची पद्धत वेगळीच असते आणि प्रत्येकाला आपलं वागणं बरोबर आहे, असच वाटत असतं. त्यामुळे विनाकारण दुसऱ्यांनी आपलं ऐकावं हा दुराग्रह सोडला पाहिजे.

आज-काल सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि अशांतता बघायला मिळते. सोशल मीडियाचा प्रत्येकाच्या जगण्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे घरातल्या लोकांपेक्षा आभासी जगातील माणसांशी लोक बोलत आहेत. आपल्या घरातील माणसे ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी असलेली माणसे यांच्याशी असलेले नाते महत्त्वाचे आहे ते जगणे समृद्ध करणारे असते हे समजून घेतले पाहिजे वाद झाले एकमेकांचे भांडण झाले तरी संवाद न थांबता व्यक्ती वेगळ्या दृष्टिकोनाची आहे हे समजून घ्यावे.

आजकाल आपण सगळे शिकलेले असतो, पण सुसंस्कृत किती लोक असतात हा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीने समजून-उमजून शिक्षण घेतले नाही, ती व्यक्ती असहिष्णू बनत जाते. अशी लोक रागीट असतात. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा संयम नसतो. अशी माणसे घरात आणि कामाच्या ठिकाणी तापदायक असतात. तुम्ही नेमक्या कोणत्या वर्गावरील आहात ते पहा.

विशेष म्हणजे हे असं गैरसमजाला धरून वागणं नैसर्गिक आहे, अशी देखील काही लोकांची समजूत आहे. ती देखील साफ चुकीची आहे. तुम्ही कुठेही असा विवेकाने जर विचार केला आणि त्याच प्रमाणे कृती केली तर आणि तरच घराची काय किंवा कामाच्या ठिकाणी शांतता टिकून राहते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “मनासारखे झाले नाही, म्हणून नाराज होताय का??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!