Skip to content

समस्यांना आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाहीये???

समस्यांना आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाहीये???


अपयशामुळे आपण आपले प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. समस्यांना आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाहीत.

जेव्हा यश मिळते, त्या वेळी तुमचे किंवा ज्याने यश मिळवले आहे त्याचे सारे लोक कौतुक करतात. पण ज्यावेळी अपयश येते, त्यावेळी नेमके त्याच्या उलट घडते. जो तो तुम्हाला लाखोल्या वाहण्यास टपलेला असतो. यशाच्या बाबतीत माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अग्निपंख या आपल्या आत्मचरित्रात एक सत्य घटना सांगितली आहे.

त्यावरून आपल्याला यश मिळवायचे असल्यास काय केले पाहिजे याचे दर्शन घडते. दिनांक 1 मे 1989 रोजी अग्नी या प्रक्षेपणास्त्र चे उड्डाण अयशस्वी झाले होते. यापूर्वी एकदा अग्नीची पहिली चाचणी अयशस्वी झाली होती. आता पुन्हा एकदा तेच अपयश. प्रसिद्धीमाध्यमांनी संशोधकांवर प्रचंड टीका केली होती. मात्र या टीकेवर शास्त्रज्ञांच्या टीमचे प्रमुख असलेले एपीजे अब्दुल कलाम खचले नाहीत. ते तिसऱ्या चाचणीसाठी पुढे सरसावला. त्यांनी आपल्या संपूर्ण स्टाफ ची मिटिंग घेतली.

जवळ जवळ दोन हजार कर्मचारी त्या मिटींगला उपस्थित होते. त्यांना उद्देशून कलाम म्हणाले निराश होऊ नका. ही एक दुर्मिळ संधी आहे. आपण ती पेलली पाहिजे. आपण आपले प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. समस्यांना आपल्यावर स्वार होऊ देऊ नका. लोकांच्या टिकेना घायाळ होऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की महिन्याच्या अखेरीपर्यंत आपण अग्नीचे यशस्वी उड्डाण करणार आहोत.

कलाम यांनी आपले वचन पाळले. 22 मे रोजी तिसऱ्या प्रयत्नात अग्नीचे यशस्वी उड्डाण झाले. यावेळी कणभर ही चूक झाली नाही. अवघ्या सहाशे सेकंदाचे ते उड्डाण, पण त्या एका उड्डाणाने डॉक्टर कलाम यांनी गेली पाच वर्षे घेतलेल्या अथक प्रयत्नांचे सार्थक केले होते. अग्निपंख मध्ये कलाम म्हणतात..

‘मी अग्नीच्या चाचणीच्या कामात स्वतःला झोकून दिले होते.’

मी केवळ याच कामासाठी पृथ्वीवर आलो आहे, ही भावना मी सतत मनात जागी ठेवत होतो. त्या काळात मी जणू काही नव्या कार्यक्षमतेने भारलेला होतो. संध्याकाळचे बॅडमिंटन, सुट्ट्या, कुटुंब, नातेसंबंध, मित्र या सर्वांपासून दूर राहून मी माझ्या कामाला वाहून घेतलं. कारण मला माहित होतं की आपल्याला यश मिळवायचे असेल तर स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेच पाहिजे.

मतितार्थ असा की, जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर झोकून देऊन काम करण्यास शिकले पाहिजे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “समस्यांना आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाहीये???”

  1. आपले लेख नेहमी प्रेरणादायी असतात म्हणून मी आपल्या व्हाट्स अँप ग्रुप ला joint झालो…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!