Skip to content

अशी ‘Fight’ करा…आपल्या दररोजच्या ताणतणावांशी!!

तणावमुक्त जीवन : यशस्वी आयुष्याचा मुलमंत्र!


रवींद्र मोरे

(सब एडिटर – लोकमत)


हल्लीचे युग हे धावपळीचे असल्याने, त्यामुळे ताणतणाव हा प्रत्येकालाच आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकजण कोणत्यातरी समस्याने चिंतातूर आहे. असुरक्षिततेची भावना ही कायम मनात असते, त्यातूनच राग येऊन तणाव येत असतो. विना तणावाचा व्यक्ती आजघडीला जगभरात सापडणे अवघडच. जीवनात आघात, अडचणी, समस्या, चिंता व आजार या सर्वांचा आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येकाच्याच जीवनात तणाव असून, त्याला सामोरेही जाणे आवश्यक आहे.

तणाव घालविण्यासाठी

शेजारी व मित्रमंडळी यांच्यात मिळून मिसळून राहावे. एकमेकांशी देवाणघेवाण करावी. समोरची व्यक्ति आनंदी होईल, असे मनमोकळेपणे त्यांचे कौतुक करावे. कुटुंबासाठी वेळ काढून, सर्वांसोबत जेवण करणे, टीव्ही पाहणे, गप्पा मारणे अशा गोष्टी करणेही आवश्यक आहेत.

कधीही आपल्याकडे जे आहे, त्यामध्ये समाधान मानावे. ईर्षा, द्वेष, मत्सर के ल्याने जास्त तणाव वाढतो. रागीट स्वभावाच्या व्यक्तीने रोज हवेत फिरायला जावे. स्वत: ला कामांमध्ये गुंतवून ठेवावे. चिंता करणे टाळावे. दुसºयांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे. घरामध्ये मुले व वडीलधाºयांवर विनाकारण रागावू नये.

आजारी पडल्यानंतर त्याचा उपचार करावा. याउलट चिंता करीत बसल्याने आजार वाढत जातो.

संगीत हे माणसाचे तणाव घालण्याचे काम करते. त्यासाठी संगीत ऐकणे हे फार आवश्यक आहे.

लहान मुलेही तणाव घालविण्यासाठी उत्तम पर्याय आहे. इतरांबरोबर स्वत: ची तुलना कधीही करु नये. आहार व व्यायामाकडे लक्ष द्यावे. सकारात्मक विषयांवरील चित्रपट पाहणे आणि पुस्तक वाचन केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार लोप पावतात. कोणतेही काम केले तर त्याचा नेहमी उत्साह जाणवतो. नियमीत ध्यान व अभ्यासामुळे मानसिक शांती मिळून मनाचा विकास होतो. तसेच आईवडिलांनीही स्वत: च्या इच्छा, अपेक्षा मुलांवर लादू नका. उलट त्यांच्या आवडी, निवडी लक्षात घ्याव्यात. मुलांना लहानपणपासून शिस्त लावणेही आवश्यक असून, त्यांचा हट्ट पुरविताना मर्यादाही पाळाव्यात.

तणावाचे परिणाम

पित्ताचा आजार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत व मूत्रपिंड आदी आजार हे शारीरिक, तर दम लागणे, अतिरिक्त राग येणे, निरुत्साह वाटणे, निद्रानाश, विस्मरण व भावनाविवशता हे तणावाचे मानसीक आजार आहेत.

कसा येतो तणाव

स्पर्धेमुळे आजघडीला प्रत्येकजण तणावाला तोंड देत आहे. कोणत्याही प्रसंगाला आपण दिलेला नकारात्मक प्रतिसाद म्हणजे तणाव होय. कार्यालयात जाण्यासाठी उशीर होणे, लगेच फोन न लागणे, दिलेले काम न होणे आदी छोट्या – छोट्या गोष्टीनेही तणाव येतो. यामधूनच नैराश्याचे प्रमाण वाढते व अनेकजण आत्महत्येकडेही वळतात. तसेच तरुणपणातच उच्च रक्तदाब, ह्दयविकार, मधुमेह, नैराश्य आदी आजारांना बळी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे.

अतिघाई, अट्टाहास धरणारे, कामात झोकून पण तणावात काम करणारे, अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणारे, क्षुल्लक कारणावरुन सतत चिडचिड करणारे, घडाळ्याच्या काट्याप्रमाणे वागणारे, मनासारखे झाले नाहीतर चिंताग्रस्त होणारे तसेच आक्रमक स्वभाव असणारे या तणावाचे बळी ठरतात. अतिरिक्त तणावामुळे विविध प्रकारच्या मानसीक व शारीरिक व्याधी जडतात. त्याकरिता वेळेवरच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आनंदी राहण्यासाठी

ज्या गोष्टी शिकण्याची आवड आहेत, त्या शिकाव्यात तसेच साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधावा.

हसविणाऱ्या मित्र किंवा मैत्रीणींसोबत जादा वेळ घालवा. संकटे व दु:ख प्रत्येकाच्या जीवनात येतात परंतु सकरात्मक विचारसरणीने त्यावर मात करीत पुढे जात राहा. जे तुम्हाला आवडते त्यांना सोबत ठेवा मग ते कुटुंब, पाळीव प्राणी, संगीत, छंद काहीही असू द्या. आवडत्या ठिकाणी सहलीला जावे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “अशी ‘Fight’ करा…आपल्या दररोजच्या ताणतणावांशी!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!