Skip to content

आपल्या ‘भीती’ मागचं नेमकं मानसशास्त्र काय??

आपल्या ‘भीती’ मागचं नेमकं मानसशास्त्र काय??


सुलभा घोरपडे


भीती अनेक स्वरूपानी व्यक्त होताना दिसते .

हत्याराला किंवा बंदुकीच्या गोळीला गुरखा भीत नसतो , हे खरं असले तरी म्हणून काय तो विंचवाला भीणार नाही असे नाही .

वाघाला न भीणारा शिकारी कदाचित शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॕ. च्या शस्त्राना भीत असेल.

काहींना अस्तित्वात नसलेल्या , कल्पनेतील भुतांची भीती वाटते तर काहींना एकटेपणाची , तर काहींना रोगाची भीती वाटते.

निरोगी काही माणसे सुद्धा कल्पनेने निर्मिलेल्या अज्ञात रोगांना भीतात.

काहींना उंचीवरून खोल पाण्यात पाहिल्यास भीती वाटत असते तर कुणाला समाजात मिसळण्याची भीती वाटते तर कुणाला पाल, झुरळ , साप याची भीती वाटते.

कुणाला परीक्षेची …कुणाला कशाची भीती वाटेल हे सांगता येणार नाही पण….

सर्वात मोठी भीती वाटते ‘ जग काय म्हणेल ‘ याची .

खरं तर भीतीची भावना नैसर्गिक आहे. काही अंशी भीती वाटणे नैसर्गिक आहे. भीती शिवाय नीती नाही . थोड्या प्रमाणातील भीती मुळे मनुष्य वाईट कृत्य करण्यापासून लांब राहील .म्हणजे निसर्गाने स्वसंरक्षणासाठी ही भावना आपल्या आत रूजवली आहे पण आपल्या अवास्तव चिंतेमुळे , अतिप्रमाणातील भीतीमुळे तीचे रूपांतर मानसिक रोगात होऊन झोप उडते , आणि मनुष्य चिंतेच्या खाईत उडी घेतो.

समाजाची जगाची भीती तर अजिबात बाळगू नये. जगाला बारा तोंडे अशी एक म्हण आहे आणि ते खरे आहे. जग नांदणार्याला पळ म्हणते तर पळणार्याला नांद म्हणते.

जग हे भीत्र्याला भीती दाखवते आणि माणसानेच माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे.

ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सामना केला तर त्या गोष्टीबद्दल भीती नष्ट होऊन पुन्हा आपल्यालाच वाटते अरे यात भीण्यासारखे काहीच नाही आपण उगीचच भीत होतो. म्हणून …
भीती सोडा आयुष्य बिनधास्त जगा…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

5 thoughts on “आपल्या ‘भीती’ मागचं नेमकं मानसशास्त्र काय??”

  1. सुंदर शब्दांतून व्यक्त केले आहे.

  2. लेख आवडला पण आणखी सखोल माहिती मिळाली तर भीतीवर मात करता येईल…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!