Skip to content

पहिलं करिअर…’अद्याप मला आई व्हायचं नाहीये’.

करिअरला प्राधान्य देतानाच योग्य वेळेत आई होणं आवश्यक!


आधुनिकतेने आपल्याला खूप बदलवलेलं आहे. आता मुलं आणि मुली दोघंही करिअरला प्राधान्य देत आहेत आणि लग्नाला नंतर प्राधान्य देत आहेत. परिणामी मुलींना लवकर आई व्हायचं नसतं. असं नुकत्याच झालेल्या संशोधनातून हाती आलेली ही बाब आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांच्या जननक्षमतेची पडताळणी केल्यानंतर या गोष्टीला पुष्टी मिळाली की स्त्रियांमध्ये आई बनण्याची सगळ्यात चांगली शक्यता वीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असते.

आपण किती बदललो आहोत?

जीवनाची रचना करताना निसर्गाने मानवासाठी एक सरळ नियमावली बनवली आहे, पण माणसाने त्या नियमावलीची पूर्ण वाट लावली आहे. जीवनाचे नैसर्गिक सुख मिळवणं आता अवघड झालं आहे.अर्थातच प्रत्येक स्त्रीच्या मनात ही उत्कट अभिलाषा असते की तिच्या गर्भात गर्भ वाढावा तिने त्या जीवावर जीवापाड प्रेम करावं, पण वर्तमानातील स्थिती लक्षात घेता ही इच्छा अपूर्ण राहते. करीयरची शिडी चढता चढता त्यांचं वय वाढतं. यामुळे इच्छा असूनही गर्भ राहतोच असं नाही. सत्य हे आहे की मातृत्वसुख मिळवण्याचंही एक वय असतं.

जननक्षमतेवर वयाचा परिणाम.

स्त्रीच्या जननक्षमतेचा संबंध वयाशी असतो. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांच्या जननक्षमतेची तपासणी केली, तेव्हा वीस ते तीस या वयात स्त्रीमध्ये आई होण्याची क्षमता सर्वाधिक असते, असं दिसून आलं. तर सत्य हे आहे की निसर्गाने स्त्रीच्या जननतंत्राचा जीर्ण होण्याचा वेग अधिक वाढला आहे. याच सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे स्त्रीच्या मध्य जीवनकालात येणारी रजोनिवृत्ती हे आहे. त्यानंतर ती आई होण्याची क्षमता गमावते. पण जननक्षमतेत ही कमतरता खूप आधीच निर्माण होते. मातृत्वाची क्षमता 20 ते 25 या वयात सर्वाधिक असते. पण वयाच्या तिशीनंतर ती कमी होते.

काय होते समस्या?

वयाच्या तिशीनंतर गर्भधारणा झाल्यानंतर वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. पहिली म्हणजे गर्भपात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. जसजसं वय वाढतं तसं गर्भातील पेशींच्या स्तरावर अनिष्ट परिणाम होतो. उशीराने झालेल्या गर्भधारणेतील गर्भाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही आणि त्यामुळे गर्भपात होतो. दुसरं, गर्भावस्थे दरम्यान आईच्या शरीरात गंभीर प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढणे आणि गर्भजणीत विषाक्त होण्याने आईच्या जीवाला धोका असतो.

वय वाढल्यानंतर गर्भात गुणसूत्रांच्या स्तरावर असमानता निर्माण होण्याची जोखीमही वाढते. अशा वेळेस उदरात वाढणार्‍या बाळामध्ये वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. यामुळेच वयाच्या पस्तिशीनंतर आई बनणाऱ्या स्त्रियांमध्ये डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता वाढते. मुलांमध्ये जेनेटिक दोष असतील तर संपूर्ण जीवन कठीण होतं.


प्रस्तुत लेख १२/१२/१९ च्या संध्यानंद दैनिकामधून घेण्यात आलेला आहे. वाचकांपर्यंत योग्य माहीती पोहचावी हाच एकमेव हेतू.



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!