Skip to content

लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी!

लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी!


राजाभाऊंच्या मुलीच लग्न झालं…लग्नात लाखो रुपये खर्च झाले.. लग्न झाले… पार पडले.. लग्नात हजार ,दोन हजार लोकं आली.. लांब लांब चे नातेवाईक आले (सुट्या काढून)
मुक्कामही केले…

राजाभाऊ ची कॉलर टाईट झाली… वॉर्डातून, गावातून निघतांना वेगडाच आनंद असायचा…. पोरीच्या लग्नानंतर राजाभाऊ जवळपास दोन महिने लग्नाच्याच चर्चा करायच्या…(जीवनभराची कमाई लग्नात निछावर करून… आटापिटा करून धुमधडाक्यात राजाभाऊ ने पोरीचं लग्न लावले)……

मग काय … चर्चेत एकच .. “2000 लोकं आली,मुंबई, दिल्ली विदेशातून संबंधित नातेवाईक आले.. ….

पाउनचार तर बोलायचं कामच नाही…..

लग्न आटोपून दोन तीन महिने उरकले but राजाभाऊ लग्न नाही विसरला……

” राजाभाऊ ला बिमारी झाली… गेल्या साथ दिवसापासून राजाभाऊ ICU मध्ये भरती आहे ”
But लग्नात आलेल्या 2000 लोकांचा कुठं पत्ताच दिसत नाही”

कुठे गेली ती पाऊनचार करणारी लांब लांब ची माणसं?

राजाभाऊ ने होती नव्हती कमाई लग्नात खर्च केली… कर्जही घेतले….. आणि आता ICU मध्ये भरती आहे साथ दिवसाचा ICU चा खर्च …डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नाही….

राजाभाऊ ची पत्नी व्याजाने पैसे घेत आहे…. नातेवाईकांनाच पैश्याची अडचण ते तरी कुठून देतील…..????

राजाभाऊ बेडवर पडून होते… मी गेलो भेटायला…. राजाभाऊ च्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते… रडत रडत मला म्हणाले…

” विनोदराव, तुमचं ऐकलं असत तर बरं झालं असत… तुम्ही म्हणत होता , मुलीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कराल तर 100% return मिळेल…”
याला आमच्या बिजनेस लँग्वेज मध्ये Return On इन्व्हेस्टमेंट म्हणतात….

नातं असो की मैत्री सर्व सुखाचे भागीदार असतात… आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागते….

विनोदराव मी खूप मोठी चूक केली…. शान मारण्यासाठी मी सर्वच जमा पुंजी लग्नात खर्च केली…. आता माझ्यावर अगोदरच कर्ज आणि वरून मी हॉस्पिटलमध्ये आणि सगड्यानी मदतीचा हाथ काढून घेतला…. त्यांना वाटत असेल की मी पैसे परत कधी आणि कसे करेल?

हे सांगताना राजाभाऊ च्या डोळ्यातून अश्रू ढसा ढसा वाहत होते……

राजाभाऊ म्हणाले ” विनोदराव, माझ्याकडे आता काहीच नाही.. पूर्णपने कंगाल झालो आहे ”

हे सांगताना अचानक भडकन आवाज आला… आणि बाहेर आरडा ओरड सुरू झाली… मी दरवाजा खोलून बाहेर गेलो….

बाहेर पाहून माझं हृदय स्तब्ध झालं.. माझ्याही डोळ्यात आता अश्रू होते…. कारण,राजाभाऊ ची पत्नी हार्टattak ने दगवल्या होते…..

( त्यांची पत्नी आमचं बोलणं लपून ऐकत होत्या……. )

मी लगेच राजाभाऊ कडे आलो… राजाभाऊ तडफडत होता मी मोठ्याने डॉक्टर ला आवाज दिला…. शेवटी राजाभाऊचा ब्रेन ह्यामरेज ने मृत्यू झाला……….

माझं अतिशय सुन्न मन झालं…. … रात्री झोप लागत नव्हती…
पत्नीने विचारलं काय झालं?

तिला संपूर्ण स्टोरी सांगितली…. तिचंही मन सुन्न झालं….

आणि म्हणाली … ” जर राजाभाऊ ने लग्नात तोमा मिरविण्यासाठी अतिउत्साहात पैसा खर्च केला नसता तर राजाभाऊ आज जिवंत असते ”
आणि म्हणाली … मी आजपासून विनाकारणचा खर्च टाळण्याचा प्रयत्न करते ……”

राजाभाऊ च्या अंत्यसंस्काराला मी जाऊ शकलो नाही… but मी माहिती घेतली तेव्हा कळले…. अंत्यसंस्कार च्या वेळी जवळपास दीड ते दोन हजार लोकं उपस्थित होती…….

लग्नाच्या वेळी ही जवळपास 2000 लोकं होती ….

मरणाला आणि लग्नाला जी लोकं होती तीच लोकं राजाभाऊ हॉस्पिटल ICUमध्ये असताना कुठे गायब झाली ?

(आताही राजाभाऊ ची आठवण येते…. जिथंही थाटामटात लग्न दिसते…. फक्त राजाभाऊ सारखं हाल होऊ नये हीच इच्छा)

राजाभाऊ हे काल्पनिक पात्र आहे…… ही पोस्ट लिहिण्याचा हेतू एवढाच की *संकटाशी एकट्यालाच सामना करावा लागतो, लोकं काय म्हणतील याला बळी पडु नका…

अज्ञानाने आम्हीही कधीकाळी याला बळी पडलो आहे….

पुढच्याला ठेच मागचा शहाणा व्हाव्हा हाच उद्देश ठेवून ही पोस्ट लिहिली…..

विसरू नका सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग

मत परवाह कर उनकी..,जो आज देते है ताना,
झुका देंगे ये सर.. …… जब आयेगा तेरा जमाना,
लहरे बन जाये तुफान,… कष्टी का काम बहना
कुछ तो लोग कहेंगे….., लोगो का काम है क हना
कुछ तो लोग कहेंगे……. लोगो का काम है केहना …..



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!