Skip to content

टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा !

टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा !


धनंजय देशपांडे


आजच्या काळात बिझिनेस मध्ये असा किंवा नोकरीत, “वर्क प्रेशर” हा एक अविभाज्य घटक झालेला आहे. तो कुणालाही चुकत नाही. अमुक एका वेळेत अमुक इतके काम झालेच पाहिजे, हे प्रेशर प्रत्येकाला असते. आणि हे केवळ नोकरी / बिझिनेस करणाऱ्याला असते असे नाही तर अगदी हाऊसवाईफ मंडळींना देखील असते. याच वर्क प्रेशरचे नंतर “टेन्शन” मध्ये रूपांतर होते अन आपलं जगणं अवघड होऊन बसत. चिडचिड वाढत. बीपी वाढतो. वैतागवाडी होते.

जरा आठवून पहा, हल्ली सकाळी आपल्याला जाग आल्यावर डोक्यात सगळ्यात आधी कोणते विचार येतात ? तर आज ऑफिसात गेल्यावर टेबलावर काय काय ढीग समोर साचला असणार याचाच ! किंवा गृहिणीसाठी सकाळचे सगळ्याचे डबे करताना कोणाला कोणती भाजी लागते, आणि सगळे काही वेळेत होईल का ? याच विचारातून दिवस सुरु होतो.

मला आठवतेय, माझ्या लहानपणी झोपेतून उठल्यावर आधी दोन्ही हात एकमेकांवर घासून मग ते तळहात डोळ्यावर ठेवले जायचे आणि “कराग्रे वसते लक्ष्मी” हा श्लोक म्हणूनच अंथरूण सोडायचे. तळहात एकमेकांवर घासल्याने नकळत ते उष्ण व्हायचे त्यातून ऊर्जा तयार होऊन ती अलगद डोळ्याच्या पापणीतून आत यायची !! आणि मग दिवस छान सुरु व्हायचा.

हल्ली असे कुठे घडत असेल वाटत नाही ! कारण “वर्क प्रेशर” चा भोवरा त्या आधीच फिरायला सुरु झालेला असतो. त्याच भोवऱ्यात गरगरत आपण दिवसाला सामोरे जातो. त्यामुळेच हल्ली कामामुळे नव्हे तर मानसिकरीत्या आपण खूप थकून जातो. मग नकळत स्वभाव वैतागाकडे झुकतो. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद विसरून जाणे सुरु होते. चिडचिड वाढते. आणि मग एकूणच जगणे “रडवेले” होते !

हि समस्या सर्वत्र आहे ! मग यावर उपाय आहे काय ?

तर मुळात जगात अशी एकही समस्या नाही कि ज्यावर उपाय नाही ! हे माझे मत आहे. फक्त तो उपाय शोधण्यासाठी कधीतरी “अशी” पोस्ट समोर यावी लागते इतकेच !

तर या वर्कप्रेशर मधून रिलीज होण्यासाठी एकच करायचे. स्वतःला “रिफ्रेश” करायचे. ज्या कॉम्पुटर वर आपण हल्ली काम करतो तोसुद्धा कधी कधी “हँग” होतो तेव्हा आपण एकतर रिफ्रेशचे बटन दाबतो किंवा “रिस्टार्ट” चे !! तसेच प्रत्यक्ष जगण्यात करायचे. महिना दोन महिन्यातून एकदा का होईना “मनासारखे” जगायचे. त्यासाठी थेट सिंगापूर मॉरिशसलाच गेले पाहिजे असे नाही.

तर अगदी आपल्या जवळच अशी अनेक ठिकाणे असतात जिथे आपण सहज जाऊन एका दिवसात परत येऊ शकतो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर चक्क मोबाईल बंद करायचा. कपड्यासह चेहऱ्याला केलेली इस्त्री चुरगाळून टाकायची. आणि कधीतरी काहीतरी करायचे राहून गेलेलं त्यादिवशी करायचे. त्यासाठी वयाचा विचार करायचा नाही. लोक काय म्हणतील हाही विचार फाट्यावर मारायचा. सगळं कस मनसोक्त जगायचं. मग पहा, परत आल्यावर दुसऱ्या दिवशी किती रिफ्रेश वाटते ते ! मग त्या दिवशी काम करताना “प्रेशर” थोडे कमी झाल्याचे जाणवेल.

डीडी क्लास : थोडक्यात काय तर, “एक उनाड दिवस” अधून मधून जगण्याची आता गरज झाली आहे. ज्याला डायबेटीस असतो तो कसा जेवणाआधी ठराविक गोळी घेतोच घेतो, तसेच आपण सारे “वर्क-बेटीस’ रुग्ण आहोत, असे समजून त्याची गोळी एक दोन महिन्यातून “एक” घ्यायचीच. ती गोळी म्हणजेच एक दिवस कोणतेही बंधन न पाळता मनसोक्त जगण्याची ! मी असे करतोच करतो. हळूच पुण्यातून सटकून कधी गड किल्ल्यावर जातो तर कधी सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या आवडीच्या हॉटेलच्या बागेतील झाडाखाली सरळ ताणून देतो. किंवा जवळपासच्या एखाद्या “स्वस्त” रिजॉर्ट मध्ये जातो. तिथे मग मी ना डीडी असतो ना धनंजय देशपांडे असतो. तर तिथे मी फक्त “एक उनाड मुलगा” असतो !

म्हणून तर एका झटक्यात आजही काचकन दोरी सोडून भोवरा फिरवू शकतो ! त्यातला आनंद वेगळाच हो !
पहा विचार करून !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

11 thoughts on “टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा !”

  1. सुजाता

    लेख छान च आहे. प्रश्नच नाही.
    एक suggestion… शाळांमध्ये असे sessions सुरू व्हायला हवेत. Need त्यानांच जास्त आहे. फोन मधून विद्यार्थी पण काळात नकळत tnsn ना आमंत्रण देत असतात. Possible आहे की नाही माहीत नाही पण प्रत्येक company मध्ये half yearly असे session व्हायला हवे. पुरुष मंडळींना असे पटत नसते. पैसे वाया, वेळ वाया, फालतू पणा, अशी मते असतात त्यांची. साहजिकच पत्नी आणि मुले त्यात ओढली जातात.
    समाजात असे चांगले विचार पेरावे लागतात. असे छान छान लेख प्रत्येकापर्यंत पोहचवावे लागतील.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!