Skip to content

म्हणूनच मी Abortion करायचं ठरवलं, कारण….

सिंगल पेरेंट


सौ अर्चना कुलकर्णी


किरणच्या डोळ्या समोर अंधारी आली . डोळे पहात आहेत ते खरचं आहे कि भास ? तीने स्वतःला चिमटा काढला “आईग ” म्हणजे खरच आहे हे . रवि आणि त्याच्या हातात हात घालून चालणारी ती . कोण असावी ? ऑफिस मधली कि कुठे पार्टीत ओळख झाली असेल ? कुठ का असेना पण आपला संसार मात्र क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्या सारखा कोसळला .

तेव्हढ्यात अरुणाने हाक मारली ” किरण अग तुझं लक्ष कुठे आहे . हा रंग बघ साडीचा अस्मानी मस्त आहे ना ?” गदा गदा हालवण्याने किरण भानावर आली .” अरुणा चल घरी जाऊया निदान मी तरी जाते मला कससच व्हायला लागलंय घरी जाऊन पडते जरा .” अरुणा काही बोलायच्या आत किरण गाडीत बसली शोफारला गाडी घराकडे न्यायला सांगितली .

डोळे मिटून सीटवर मागे डोकं टेकवलं क़ाय वाढून ठेवलंय आपल्या नशिबात आणि का ? कुठे चुकले मी ? माझ्याच नशिबात हे भोग का ? लहानपणा पासून आई माझे बाबा कुठे आहेत सगळ्या मुलांचे आई-बाबा एकत्र राहतात माझे बाबा का राहत नाहीत आपल्या जवळ ? किती तरी वर्ष मिळालंच नाही . एकदा फारच हट्टाला पेटले तेव्हा आईने सांगितलं . दोघांच एकमेकांवर प्रेम होतं . लग्नाच्या आणा भाका घेतल्या पण जेव्हा त्याच्या घरी कळल तेव्हा कडाडून विरोध झाला . भेटायला बंदी घातली आणि त्याला ताबडतोप अमेरिकेला पाठवण्यात आलं. श्रीमंत आई वडिलांचा नेभळट मुलगा . पण हे समजायला खूप उशीर झाला होता प्रेमात इतके पुढे गेले होते कि त्याच्या खुणा हिच्या अंगावर दिसू लागल्या .

आपल्याला दिवस गेलेत कळल्यावर आजी आजोबांनी खूप आरडा ओरडा केला अबोर्शन कर म्हणून मागे लागले पण मन तयार झालं नाही .एकटी ने राहायचा निर्णय घेतला आणि तुझा जन्म झाला . किरण सुन्न होऊन हे ऐकत होती . आयुष्य भर आई सिंगल पेरेंट म्हणून राहिली.

आपल्याला बाबांची उणीव जाणवायची इतर मैत्रिणींचे वडील त्यांचे लाड करायचे तेव्हा किरण एकटीच बसून रडायची . जस जशी मोठी झाली तिने एक मनाशी पक्क ठरवलं . आईने जी चूक केली ती आपण करयची नाही . रीतसर लग्न करयचं . प्रेम बीम कुच नहि . जेंव्हा रविच स्थळ आलं नाव ठेवयला जागाच नव्हती मोठ्या हुद्यावर घर दार गाडी घराणं हि चांगलं . झट पट लग्न झालं .

किरणने ठरवलंच होत अगदी सुखाने संसार करयचा . रवीच्या सुखात सुख मानायचं . आणि आज तर किरण फारच खुश होती तिला बाळाची चाहूल लागली होती . हि गोड बातमी रविला कधी एकदा सांगते असे झाले होते . रविला ऑफिस मधून यायला खूप उशीर व्हायचा . आज ऑफिसला दांडी मारून अरुणा बरोबर शोपिंगला आली होती रवी साठी सरप्राइज गिफ्ट घेण्यासाठी पण तिलाच जीवघेण सरप्राइज मिळालं

किरण घरी आली सोफ्यावर धपकन बसली. काय करायचं खरंच त्या दोघांच एक मेकांवर प्रेम असेल ?त्यांचे गुंफलेले हात आणि गुंतलेली नजर तर हेच सांगत होती कि ते एकमेकांच्या किती जवळ आहेत . उद्या त्याने घटस्पोट मागितला तर ?

खूप रडून झाल्यावर किरणने आपल्या ओटीपोटावरून हात फिरवला म्हणाली “बाळा मला क्षमा कर आजचा तुझा शेवटचा दिवस. मी आयुष्यभर बिन बापाची वाढले सिंगल पेरेंटच दुःख मी आईच्या डोळ्यात बघितलं आहे. मी भोगलंय ते तुला भोगू द्यायचं नाहीये बाळा .उद्या तुला ह्या जगातून जायचय good byee” भरल्या कंठाने किरणने उद्याची ओबोर्शन वेळ घेतली . कर्कश्य आवाजात बेल वाजली शांत मनाने किरणने घरी आलेल्या रवी साठी दार उघडले.

अन दुसऱ्या दिवशी मी अबोर्शन करून मोकळी झाली, कारण आईची होणारी वाताहात मी पहिली होती. त्यामुळे सिंगल पेरेंटचं दुःख काय असतं, हे मी जवळून अनुभवलं होतं.

कदाचित मी चुकीचा निर्णय घेतला असेल किंवा मी ज्या अनुभवात वाढली त्या अनुभवाने मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले असेल. पण आईच्या वाट्याला आलेली स्थिती पाहून मी पूर्णपणे हतबल झाली होती आणि वास्तव निर्णय घेऊ शकत नव्हती.

वरील संपूर्ण कहाणी एका काल्पनिक पटलावर तयार करण्यात आलेली असली तरी आजूबाजूला बारकाईने डोकावल्यास अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. यामध्ये मुद्दा इतकाच आहे की अबोर्शन करून नवीन आयुष्य सुरू करायचं की अर्धवट चिकटलेली निशाणी सकारात्मकतेने सांभाळायची, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न.

एकीकडे अबोर्शन केल्याचे पाप आणि दुसरीकडे अबोर्शन न करून समाजापासून दूर सारल्याची चिंता…..

याची उत्तरे जरी देता आली नसली तरी निदान भावनिक पाठिंबा तरी द्या!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!