Skip to content

वारंवार प्रेम न मिळाल्याची तक्रार आणि मागणी करणे हा स्वतःचा स्वतःच केलेला सर्वात मोठा अपमान आहे.

वारंवार प्रेम न मिळाल्याची तक्रार आणि मागणी करणे हा स्वतःचा स्वतःच केलेला सर्वात मोठा अपमान आहे.


प्रेम ही अशी भावना आहे जी सर्वांना हवी असते. मुलगा मुलगी मध्ये जे प्रेम असतं तेच फक्त प्रेम नाही. प्रेम प्रत्येक नात्यात असत आणि असलं पाहिजे. आई मुलाचं प्रेम, पालक आणि मुलांमध्ये असलेले प्रेम, मैत्रिमधील प्रेम. ही एक सार्वत्रिक भावना आहे. जी सर्वांना पाहिजे असते, ज्यासाठी प्रत्येक माणूस आसुसलेला असतो. खरच आहे, कोणाला वाटेल की आपला इतरांनी राग राग करावा, आपल्यापासून दूर जावं.

माणूस एक समाजशील प्राणी आहे त्यामुळे माणसाच्या आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व आहे आणि एका चांगल्या नात्याचा पाया हा प्रेम आहे. त्यामुळे हे प्रेम मिळणं न मिळणं याचा आपल्या एकंदरीत या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. जर लहानपणी मुलांना आई वडिलांकडून प्रेम मिळालं नसेल, ती काळजी, आपुलकी मिळाली नसेल तर ती मुले कायम प्रेमासाठी आसुसलेली राहतात. त्यांच्या पुढच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो.

हे प्रेम मिळवायच्या नादात अशी माणसं बऱ्याचदा चुकीच्या नात्यात अडकतात. अश्या लोकांकरून प्रेमाची अपेक्षा करतात ज्यांच्यासाठी या गोष्टी शुल्लक असतात. अश्या लोकांना सतत कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्या सोबत असावं असं वाटत राहतं. जी माणसं आयुष्यात येतात ती निघून जातील अशी सतत भीती मनात बाळगणे, सततची असुरक्षितता याचे नात्यावर चुकीचे परिणाम होतात आणि ती व्यक्ती निघून जाते.

माणसाला प्रेम आयुष्यात पाहिजे. कारण सोबतीची गरज ही प्रत्येकाला असते. पण प्रेम हे आयुष्याला उभारी देणार, आपल्याला उन्नत करणार असल पाहिजे. आधीचे घाव भरून काढण्यासाठी जर आपण कोणत्या नात्यात अडकत असू, सारखं आपल्यावर कोणी तरी प्रेम करावे अस म्हणत असू तर हे आपल्याच नुकसानीचे आहे. हे आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकत.

सतत ही तक्रार करण की माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही ही गोष्ट आपल्यालाच त्रास देते आणि आपला स्व – आदर कमी करून टाकते. आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही असं कधी होत नाही. आणि असं असलं तरी तो एक काळ असतो. अश्या वेळी आपण इतरांपेक्षा स्वतःवर जास्त लक्ष दिले पाहिजे.कोणी दुसऱ्याने आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा न करता आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे.

इतरांना खुश करायच्या नादात या विचाराने की ते आपल्यावर प्रेम करतील आपण स्वतःला गमावून बसतो. ज्याच्या तोटा नंतर आपल्यालाच होतो. कारण एका मर्यादेनंतर आपण कोणासाठी काही करू शकत नाही. समोरचा माणूस त्याला योग्य वाटेल ते करतो. त्यामुळे आपल्यावर सगळ्यांनीच प्रेम केलं पाहिजे, कोणीतरी प्रेम करणार असलच पाहिजे अस होऊ शकत नाही. असं करणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखे आहे. याउलट आपला सेल्फ रीस्पेक्ट वाढवा, जसे आहात तसे रहा, माणसं आपोआप प्रेम करतात.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “वारंवार प्रेम न मिळाल्याची तक्रार आणि मागणी करणे हा स्वतःचा स्वतःच केलेला सर्वात मोठा अपमान आहे.”

  1. खुप मदत होईल या लेखाची आणि अजून अशा प्रकारचे लेख वाचायला मिळावेत. धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!