ताण तणाव घेऊन आयुष्य जगू नका तर तो ताण तुमच्या भल्यासाठी वापरायला शिका.
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा सोबत काही भावना घेऊन येतो. ज्यात प्रेम, राग, भीती यासारख्या भावनांचा समावेश होतो. ज्या वैश्विक आहे, म्हणजेच ज्या सर्वांना जाणवतात. अगदी लहान मूल पण आपली आई दुसऱ्या कोणाला तरी घेते अस दिसल्यावर रडत, आदळआपट करत, एकटी सोडून गेली तर घाबरून जातं.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माणूस या भावना घेऊन जगत असतो. त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या भावना येतात, आपण त्याचं व्यवस्थापन कसं करतो यावर आपल्याला होणारा त्रास अवलंबून आहे. जश्या या भावना सर्वांना जाणवतात तशीच एक अवस्था म्हणजे ताण. ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. हा देखील सर्वांना जाणवत असतो. कोणी म्हणतं ताण चांगला तर कोण म्हणत ताण खूप वाईट. याचं नेमकं उत्तर समजून घेण्यासाठी आधी ताणाची व्याख्या समजून घेतली पाहिजे.
A state of worry or mental tension caused by difficult situation.
अशी मानसिक अवस्था किंवा अशी चिंतेची अवस्था जी एखादी कठीण परिस्थिती, एखादं आव्हान आल्यावर माणसाला जाणवते त्याला ताण असं म्हणतात.
नवीन शहरात शिफ्ट होणं, आयुष्यातले मोठं मोठ्या निर्णय जसे की लग्न, कामात अचानक समस्या निर्माण होणं यासारख्या अनेक घटना ज्या माणसाला आव्हानात्मक वाटत त्यातून ताण येतो. लहान मुलांना नवीन इयत्तेत जाताना देखील ताण ये कारण शिक्षक नवीन असतात, अभ्यासक्रम बदललेला असतो. त्यामुळे भावनांप्रमाणे ही देखील एक सार्वत्रिक अवस्था आहे. आणि हा आपल्याला प्रत्येक वळणावर जाणवतो कारण आताची परिस्थिती तशी आहे, युग तसं आहे. सर्व काही अगदी क्षणा क्षणाला बदलत आहे. या नवीन गोष्टींशी स्वतः ला जुळवून घेणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये.
पण मग म्हणून सतत त्याचा ताण घेऊन जगायचं का? कारण या गोष्टी कधी कोणाला चुकल्या नाहीत. याचा अर्थ आयुष्य ताण तणावात घालवायचं का? याचे परिणाम काय होतील? तर अतिरिक्त ताणाचे आपल्या शरीर, मनावर सगळीकडे परिणाम होतात. हृदयावर परिणाम होतो. भूक मंदावते. लक्ष लागत नाही. अस्वस्थता, चिडचिड यासारख्या गोष्टी होतात. यातही असं मत येत की ताण पूर्णपणे जाणार तरी कसा? समोर काही संकट आलं तर आपण पूर्णपणे शांत तर बसू शकत नाही. आपल्याला काहीतरी नकारात्मक जाणवणार.
तर इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ताण घालवायचा नाही तर त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ज्याला stress managememt म्हणतात. म्हणजेच ज्या त्या परिस्थितीमध्ये जितका आवश्यक आहे तितकाच ताण अनुभवणे. परीक्षा आहे तर थोडा ताण तर पाहिजे त्याशिवाय आपण अभ्यास करणार नाही. काहीतरी unhealthy जास्त खाल्लं तर आजारी पडू हे मनात थोडतरी हवं नाहीतर आपण काहीही खात बसू.
हे कधी शक्य होतं जेव्हा आपण आपल्या भावनांच व्यवस्थापन करायला शिकतो ज्यासाठी आपल्याला आपले विचार बदलता आले पाहिजेत. कारण आपल्या वर्तनाच्या, भावनांच्या, एकंदरीत व्यक्तिमत्त्वाच्या मागे सर्वात मोठा वाटा कोणाचा असतो तर विचारांचा असतो. एखाद्या परिस्थितीमध्ये आपण कश्या पद्धतीने विचार करतो यावर पुढच्या गोष्टी म्हणजे आपल्या भावना, आपला ताण आधारित आहे.
यासाठी कोणतीही समस्या निर्माण करणारी परिस्थिती आली आणि आपल्याला खूप जास्त नकारात्मक वाटू लागलं तर स्वतःला काही प्रश्न विचारायचे. मी जो त्रास करून घेतोय त्याचा मला काही फायदा होतोय का? यातून काही चांगलं निर्माण होतंय का? मला वाटते तितकी ही परिस्थिती वाईट आहे का? की याहून काही वाईट असू शकतं? आणि नसेल तर माझ्या इतक्या त्रास करून घेण्याला काही अर्थ आहे का?
जेव्हा आपण हे आत्मपरीक्षण करायला लागू तेव्हा आपल्यालाच फरक जाणवेल आणि आपण हा ताण आपल्या फायद्यासाठी वापरायला लागू.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Helepfull for me.