Skip to content

अनेकदा परिस्थितीचा जास्त सखोल विचार करण्यापेक्षा तिथेच सोडून देणे उत्तम असते.

अनेकदा परिस्थितीचा जास्त सखोल विचार करण्यापेक्षा तिथेच सोडून देणे उत्तम असते.


परिस्थिती ही आपल्या हातात नसते.. म्हणजेच कधी कोणती वेळ येईल.. कोणते आव्हान आपल्यासमोर उभे राहतील.. कोणते बदल अचानक घडतील.. याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.. आज आनंदी असतो तर उद्या काय हे माहीत नाही…पण येणारी परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी येणाऱ्या परिस्थितीत आपण काय करायचं हे मात्र आपल्याच हातात असते..

प्रत्येकाचा एक स्वभाव असतो परिस्थितीला सामोरे जाण्याचा.. कोणी एकदम घाबरते त्यांना काय करावं.. काय बोलावं ..कोणते निर्णय घ्यावेत हे सुचत नसते तर कोणी क्षणात रडून माघार घेते.. कोणी अगदी धीटपणा दाखवून आलेल्या वेळेला तोंड देण्याची तयारी दाखवते.. कोणी त्या परिस्थितीतून पळ काढण्याचा प्रयत्न करते..

खर तर वेळ कोणतीही असो पण समोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीत अगदी सरळ आणि मोकळा विचार करून त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग काढणे केव्हाही योग्यच.. पण बरेच असेसुद्धा व्यक्ती आपल्याला भेटतील जे त्या परिस्थितीत इतका खोलवर विचार करतात की त्यामधून बाहेर पडण्याचे मार्ग अगदी समोर असूनदेखील अतिविचार केल्यामुळे तो मार्ग नजरेला दिसेनासा होतो..

कोणतेही निर्णय घेताना घाई करून उपयोग नसतो अगदी तसाच दिरंगाई करण्यात देखील अर्थ नसतो. विचार करून निर्णय घेणे हे स्वाभाविक जरी असलं तरीसुद्धा जास्त खोलवर विचार करणे.. त्या परिस्थितीच विश्लेषण करणे आणि मग त्या परिस्थितीमध्ये स्वतःला इतकं गुंतवणे की समोर सर्व काही अवघड करण्यासारखे आहे..

ते अस का घडल असेल.. हा असाच का वागला असेल.. की काय चूक केली.. मी काय वेगळं वागलो.. माझ्याच बाबतीत असे का घडते.. ते असे घडले नसते तर बरे झाले असते .. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे.. हे असेच का.. ते तसेच का.. या अशा पद्धतीने विचार करून त्यामध्ये अडकण्यापेक्षा मी आता काय केलं पाहिजे ज्यामुळे ही परिस्थिती बदलेल हा विचार आपल्याकडे असेल तर चांगलच आहे आणि जरी या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल..

आपल्या हातात काहीही नसेल.. ती परिस्थिती बदलणे अवघड असेल तर त्या परिस्थितीला कवटाळून धरण्यापेक्षा ती परिस्थिती तिथेच सोडणे केव्हाही उत्तम… आपल्याला वाटते की कस सोडून द्यावे.. पण जर धरून बसल्याने आपल्यालाच त्याचा त्रास होणार असेल .. उत्तरं मिळणार नसेल.. प्रश्न सुटणार नसतील.. वेळ बदलणार नसेल.. तर मग अशावेळी सोडून दिलं तर नक्कीच आपल्याला मोकळा श्वास घेता येईल.. अवघड वाटेल पण अशक्य नाही.. नक्की प्रयत्न करून बघा..

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “अनेकदा परिस्थितीचा जास्त सखोल विचार करण्यापेक्षा तिथेच सोडून देणे उत्तम असते.”

  1. खरंच छान 👌 कारण नेमकी ह्याची मला आता जास्त गरज आहे.हा लेख वाचुनच मला माझ उत्तर मिळाले.🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!