मला समजून घ्या ही गरज ज्यांची सर्वाधिक असते अशी माणसं आतून घुसमटत असतात.
Sometimes in life we just need someone who will be there for us. Someone who will listen. Who will understand.
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात असे वाटत असते की आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, कोणीतरी आपले ऐकावे, आपल्यासोबत राहावे, असावे. कारण सोबतीची गरज ही प्रत्येक माणसाला असते. अगदी जन्मापासून. जसं बाळ जन्माला आल्यावर आपल्या आईची कुस शोधू लागत तसं प्रत्येक माणूस अश्या व्यक्तीच्या शोधात असतो जो त्याला साथ देईल, त्याला समजून घेईल.
पण ह्याची मर्यादा किती असावी? कोणत्या मर्यादेपर्यंत आपल्याला इतरांनी समजून घ्यावं? हे प्रश्न आपल्याला कधी पडतात का? आणि जेव्हा आपण आपल्याला इतरांनी समजून घ्यावं असं म्हणतो तेव्हा आपण स्वतः ला हा प्रश्न विचारतो का की आपण इतरांना किती समजून घेतो. हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. सर्व सामान्य परिस्थितीमध्ये मला समजून घ्यावं असं वाटणं हे नॉर्मल आहे. पण आपण सतत असाच विचार करत असू, आपल्याला सतत तेच वाटत असलं तर समस्या आहे.
ज्यांना सतत अस वाटत. समजून घेण्याची गरज ज्यांच्यामध्ये सर्वाधिक असते त्या आतून कुठेतरी घुसमटत असतात. याचं अजून एक कारण हे असू शकत की अश्या लोकांमध्ये self esteem म्हणजेच स्व आदर कमी असतो. तसच स्वतः च्या क्षमताबद्द्दल जाणीव नसते, त्यात कमतरता वाटत असते. मी काहीतरी करू शकतो हेच पटत नसत. माझ्याकडून चुका होतील, मला हे जमणार नाही आणि त्यातून काहीतरी नुकसान होईल. त्यामुळे मला चुकीचं गृहीत धरू नका, मला समजून घ्या अशी ही मानसिकता असते.
अप्रत्यक्षरीत्या अश्या व्यक्तींना सतत इतरांची समंती म्हणजेच approval हवं असतं. कोणत approval? तर आपण कसे चुकीचे नाही हे सांगणारं approval. ही एकप्रकारची neurotic need आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं यात रूपांतर होतं. अशी माणसं आपण कसे बरोबर आहोत, कसं आपल्या हातात काही नाही हे दाखवायचा प्रयत्न करतील. कसा मी शक्तिहीन आहे हे सांगतील.
हे सर्व मुद्दाम केलं जातं का? तर नाही. याची अनेक कारण असू शकतात. आधी काहीतरी झालेलं असू शकतं, एखादा नको असलेला प्रसंग घडून गेलेला असू शकतो. जसं आधी म्हटल तस स्व आदराची कमी असणे. या सगळ्यात माणूस स्वतः ला स्वीकारतच नाही. ठीक आहे माझ्यात काही गोष्टी कमी असू शकतात, माझ्यासोबत काहीतरी घडून गेलेलं असू शकत. पण आता या क्षणाला त्याच काय करायचं?
या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतः ला अजून कमकुवत करून सतत दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यावं असं म्हणायचं की आहे ते झालय ते स्वीकारून ते कसं टाळता ये, कसं स्वतःला अजून भक्कम करता येईल यावर लक्ष द्यायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सतत इतरांवर depend न राहता, त्यांच्या समतींची गरज न ठेवता स्वतः मध्ये बदल करायला शिका. काय कमी असेल तर कोमट कौशल्य शिकल्याने ती सुधारता येईल यावर विचार करा, त्यानुसार काम करा. कारण इतरांनी कितीही समजून घेतल तरी आपल्या समस्या आपल्यालाच सोडवाव्या लागतात, दर वेळी दुसरा आपल्याला मदत नाही करू शकत.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Khup chhan watla ha lekh