Skip to content

मनाने खचून गेलेल्या माणसाला कोणतीच सर्जरी उपयोगी नसते. त्याला स्वतःलाच उभं रहावं लागतं.

मनाने खचून गेलेल्या माणसाला कोणतीच सर्जरी उपयोगी नसते. त्याला स्वतःलाच उभं रहावं लागतं.


लहान मुल जेव्हा हळू हळू चालायला सुरुवात करत तेव्हा ते कितीतरी वेळा पडतं, धडपडत. पण एक गोष्ट आपण पाहिली असेल की त्याला पडताना कोणी पाहिले, कोणी काही प्रतिसाद दिला तरच ते रडतं. याशिवाय ते एकटे असेल, सारखं पडत असेल तर इथे तिथे पाहून ते स्वतःच स्वतः उठून चालायचा प्रयत्न करत. कोणाच्याही आधाराशिवाय. एकटे असल्यावर याची प्रकर्षानं जाणीव होते की आपल्याला स्वतःलाच उठाव लागणार आहे. आपल्या मदतीला कोणी नसणार आहे.

अगदी लहान असल्यापासून आपल्यामध्ये ही मुळ प्रवृत्ती आहे. पण जसं जसं आपण मोठे होतो तशी ही जाणीव कमी होत जाते. दुसऱ्याच्या आधाराची सारखी गरज भासते. कोणीतरी आपल्याला बाहेर काढावं असं वाटतं. ज्यात काही गैर नाही. कारण माणूस म्हणून आपल्याही काही कमकुवत बाजू असतात, मर्यादा असतात. आपण सर्व काही एकट्याने सांभाळू नाही शकत. आपल्यालाही मदत लागतेच.

पण दुसऱ्या कोणी कितीही मदत केली तरी आपली स्वतःची ईच्छा शक्तीच इथे कामाला येते. आपल्याला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं असल तर आपल्याला दुसऱ्याची कसू भर मदत देखील पुरते. पण जर आपण स्वतःच त्यात अडकून पडले असलो तर कोणी कितीही मदत केली तरी काही होऊ शकत नाही. जसं घोड्याला पाण्यापर्यंत नेता येत, पाणी पाजता येत नाही, तसच मनाने खचलेल्या माणसाला बाहेरून कितीही मदत केली तरी त्याचं त्याला परत उभं राहावं लागतं.

कोणतीही सर्जरी, कोणते उपचार कामी येत नाही. समोरून कितीही मदत आली तरी आपल्याला बर व्ह्यायच आहे ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. यासाठी स्वतः लाच काही प्रश्न विचारावे लागतात. पहिलं म्हणजे मी ज्याचा इतका त्रास करून घेतोय त्यातून मला काही फायदा होतोय का? मला काही साध्य होतय का? जर नसेल होत तर त्रास करून घेण्यात अर्थ आहे का? तेच जर मी बर होण्यावर भर दिला तर मला काय मिळू शकत? मला काय फायदे होतील? सर्वात महत्वाचं मला का बरं व्हायचं आहे? मला का जगायचं आहे?

या ‘का’ ची एकदा उत्तरे मिळाली की माणूस आपोआप काही ना काही प्रयत्न करू लागतो. हे का म्हणजे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. ते मिळवण्यासाठी आपण जगत आहोत असा त्याचा अर्थ होतो. एकदा का जगायचं याचा उलगडा झाला की कश्याही पद्धतीने जगता येते. आता कश्याही पद्धतीने म्हणजे वाटेल तसं जगायचं का? तर नाही. याचा अर्थ कोणती समस्या आली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधायचे. म्हणतात ना करायची इच्छा असली की माणूस कसही करून ती गोष्ट करतो. त्यासाठी प्रयत्नशील राहतो.

तसच जगायची इच्छा असली की माणूस काही ना काही करून येणाऱ्या अडथळ्यांवर मात करतो. त्यासाठी स्वतः प्रयत्न करतो. म्हणून आयुष्याला काही अर्थ मिळवायला लागतो. ध्येय असावं लागत. मी आलो कश्याला आणि करतोय काय असा प्रश्न जर आपल्याला सारखा पडत असेल तर हीच वेळ आहे आपल्याला आपल्या आयुष्याचा नीट विचार केला पाहिजे. आपल्या आवडी निवडी पारखून पहिल्या पाहिजेत. खचून न जाता शांतपणे सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. बाहेरून इतरांनी कितीही मदत केली तरी आपली आंतरिक प्रेरणा असावी लागते. तेव्हाच आपण त्यातून बाहेर येऊ शकतो.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनाने खचून गेलेल्या माणसाला कोणतीच सर्जरी उपयोगी नसते. त्याला स्वतःलाच उभं रहावं लागतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!