Skip to content

कोणावरही अवलंबून न राहता जर तुम्ही आनंदी राहत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.

कोणावरही अवलंबून न राहता जर तुम्ही आनंदी राहत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.


माणूस कधी सुखी असतो का..?? जे आहे त्यामध्ये समाधानी असतो का.. ?? या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्याने शोधावीत .. कारण प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते आणि प्रत्येकाचं समाधान हे त्याच्या अपेक्षांवर अवलंबून असते …

एखाद्या व्यक्तीकडे साधं घर असेल तर तो बंगला बांधण्याची स्वप्न बाळगतो.. एखाद्याकडे गाडी नसेल तर तर तो गाडी घेण्यासाठी धडपडतो.. आणि ज्याच्याकडे टू व्हीलर असेल तो मोठ्या फोर व्हिलर साठी धडपडतो.. आणि फोर व्हीलर वाला अजून महागड्या गाड्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करतो..म्हणजे ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याच्याही पलीकडे जाऊन अजून जास्त हवे असते.. पण जर ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने दुचाकी गाडी वापरणाऱ्या व्यक्तीकडे पाहून ..तर दुचाकी गाडी असणाऱ्यांनी पायी चालणाऱ्या व्यक्तीकडे पाहून आणि ज्याच्याकडे दोन्ही पाय आहेत त्याने अपंग व्यक्तीकडे पाहून आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान मानण्याच्या जाणिवेत राहील की आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपल्याला आनंद सुख सापडते…

यावरून आपण आपल्या आयुष्याचं एक साधं गणित सोडवू शकतो.. जस आपण इतरांकडे जे आहे त्यामध्ये अडकून स्वतः दुःखी होतो किंवा तुलना करून स्वतः जवळील सुख सोडून भलत्याच मार्गावर भरकटतो… अगदी तसच आपल्यात जर स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधण्याची सवय असेल तर ठीक पण स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जर आपण दुसऱ्यांवर अवलंबून असू तर नक्कीच आपण कुठेतरी वाट चुकतोय…

म्हणतात ना कष्ट केले तर फळ मिळते.. पण दुसऱ्याने कष्ट केल्यावर आपण फळाची अपेक्षा करणे जस चुकीचं आहे तसच आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांचा आधार शोधणे सुद्धा तेवढच चुकीचं आहे..

लहान मुलं रडले की त्याला हसविण्यासाठी सगळे प्रयत्न करतात.. कोणी वेगवेगळे आवाज काढते तर कोणी अगदी माकडचाळे करून त्याला हसवत.. पण ते लहानपण निरागस असते .. अपेक्षारहित असते.. ते रडणं तात्पुरतं असते आणि ते हसणं निखळ असते.. आणि त्यावेळी लहान असल्यामुळे त्याला कळत सुद्धा नसते की कुठे आपण रडणं थांबवावं.. आणि आपण कस स्वतःलाच हसवाव.. पण मोठे झाल्यावर मात्र आपल्या दुःखावर आपणच फुंकर घालण्याचा आपण प्रयत्न केला तर इतरांना त्याचा त्रास होणार नाही. आणि आपलं सुख कशात आहे.. आपला आनंद कशात आहे हे सुद्धा आपलं आपल्याला चांगलच माहिती असते त्यामुळे तो आनंद ज्याचा त्याने शोधून तो मिळवायचा असतो आणि जे असे वागतात ते खरचं आयुष्याच्या योग्य मार्गावर आहेत असे समजायचं..

कारण जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहत नाही तो स्वतःच्या दुखासाठी सुद्धा इतरांना दोष देत नाही.. जस आनंद स्वतःकडून अपेक्षित करतो तसेच दुखातही स्वतः उभ राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो.. आनंद हा इतरांना वाटण्यासाठी असतो.. इतरांकडून अपेक्षित नसावा.. प्रत्येकाला ज्याचं त्याचं जग जगायचं असते.. त्यामुळे आपल्या आनंदाचं ओझ इतरांवर कशाला टाकायचं.. उलट आपणच आपल्यातील आनंद शोधून इतरांना सुद्धा आनंदी राहण्याची प्रेरणा द्यायची…

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कोणावरही अवलंबून न राहता जर तुम्ही आनंदी राहत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!