Skip to content

प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळ असते मग उगाच का कुणाशी आपण तुलना करतोय..???

प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळ असते मग उगाच का कुणाशी आपण तुलना करतोय..???


आयुष्य म्हंटल की कधी चढउतार तर कधी खाचखळगे.. कधी आनंदाच्या लहरी तर कधी दुःखाचं डोंगर.. कधी अविस्मरणीय प्रसंग तर कधी सहज वेळेसोबत निघून जाणारे क्षण..

कोण म्हणतेय माझं आणि तुझ आयुष्य अगदी सारखं आहे..?? प्रत्येकाचा जीवनप्रवास खूप वेगळा असतो.. एका घरात अगदी एकाच कुटुंबात राहून सुद्धा कोणी अगदी सारखं आयुष्य जगत नसते..

आता अगदी सहज बघायचं झालच तर.. एका घरात समजा आई वडील दोन मुल असे चारचौघे राहत असतील तर ते एकसारखं आयुष्य नाहीना जगत.. वडिलांना वडिलकीची जबाबदारी असते.. घर चालवायचं असते.. कुटुंबाकडे लक्ष देऊन स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळायचा असतो तर इकडे आईला घर सांभाळायचं असते..

कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायची असते.. दिवसभराचा कार्यभाग सांभाळत सगळ्यांना सावरायचं असते.. नाती जपायची असतात आणि नोकरी असेल तर नोकरी करत या गोष्टीसुद्धा जपत तारेवरची कसरत करायची असते.. मुलांना त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी .. परीक्षा .. तर कधी मस्ती मज्जा.. म्हणजेच एकंदर पाहिलत तर कोणाचं आयुष्य कोणासारख आहेका…

आता कामाच्या ठिकाणी सुद्धा पाहिलत तर समजा एका ऑफिस मध्ये वेगवेगळे department असतात..कोणी account बघते तर कोणी sales तर कोणी अजून काही.. पण जर sales department मध्ये दहा जण काम करणारे आहेत म्हणजेच त्यांचं काम सारखं वाटत असेल तरी त्यांच्यासमोर येणारे clients सारखे नसतात ना..

समोर येणारे व्यक्ती..त्यांच्या product बद्दल असलेल्या अपेक्षा या सारख्या नसतात ना.. मग जर असे असेल तर त्यांचं department जरी सारखं असेल तरी त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासमोर येणारे माणसं.. challenges ही काही सारखी नसतात ना.. मग त्यांचं आयुष्य सारखं असेल का.. तर नाहीना..

तर या सगळ्यातून एकच सांगण्याचा प्रयत्न आहे की जर आपल आयुष्य आपल्या कुटुंबातील व्यक्तिंसारखं नसते.. कामाच्या ठिकाणी सुद्धा नसते म्हणजेच आपलं आयुष्य हे वेगळ आहे..

प्रत्येकाचं वेगळं आयुष्य असते.. त्याची जीवनशैली.. त्यांची विचार करण्याची पद्धत.. त्यांच्या जगण्याच्या चालीरीती.. त्यांचे संस्कार.. त्यांच्या आयुष्याकडून आणि स्वतःकडून असलेल्या आशा अपेक्षा या सगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात..

जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदी दिसते तेव्हा त्या व्यक्तीकडे बघून आपल्याला आनंद वाटला पाहिजे तर त्यावेळी आपल्या मनात का असे विचार निर्माण होतात की हा किती आनंदी आहे आणि मी किती दुःखी …

खर तर आपला आनंद शोधण्यात आपणच अपयशी ठरलेले असल्याचं हे लक्षण आहे पण हा भाग वेगळा आहे मुळात जर एखादी दुःखी व्यक्ती पाहून आपण म्हणतो का की ही व्यक्ती का दुःखी आहे.. माझ्याच आयुष्यात आनंद आहे याच्या आयुष्यात हा आनंद का नाही..

कोणी यशाच्या शिखरावर असेल तर आपण त्या जागी का नाही ही आपल्याकडे शोकांतिका असते .. पण त्याचे प्रयत्न त्याची धडपड त्यालाच माहिती.. आपण करू शकतो का ती धडपड.. पण आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो आणि दुःखी होतो..

प्रत्येकाचं आयुष्य हे जस वेगळं आहे त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यातील त्याच्या यशाची.. त्याच्या प्रगतीची वाटचाल ही सुद्धा वेगळी असते.. प्रत्येकाच्या सुखाच्या …

आनंदाच्या मागे त्याचे प्रयत्न असतात आणि हे प्रयत्न ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो करत असतो ..म्हणून का कुणाशी आपण तुलना करावी.. आपल आयुष्य आपल्या हातात आहे.. ते कोणत्या वळणावर न्यायचं हे आपण ठरवू शकतो.. सुख दुःख हे येतील जातील ते नैसर्गिक जरी असले तरी त्यांना धरून ठेवायचं की आपण पुढे जायचं हे आपल्या हातात असते..

खर तर जे लोक प्रयत्नशील असतात .. स्वतःकडे जिद्द ठेवतात पुढे जाण्याची.. सकारात्मक विचार ठेवतात… ज्यांची सतत काहीना काही करण्याची मिळवण्याची धडपड सुरू असते.. ते लोक इतरांशी तुलना करण्यात स्वतःचा वेळ घालवत नाही..

ते चुकीच्या ठिकाणी थांबत नाहीत.. कोणाची प्रगती किंवा यश बघून त्यांचे पाय अडखळत नाही.. कारण ते इतरांशी तुलना न करता स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यात मग्न झालेले असतात आणि म्हणूनच ते यशाच्या वाटेवर असतात..

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळ असते मग उगाच का कुणाशी आपण तुलना करतोय..???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!