Skip to content

चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी त्रास व्हायला हवा.

चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी त्रास व्हायला हवा.


आपण लोकांशी चांगलं वागल की आपल्यासोबत पण लोक चांगल वागतात अशी शिकवण आपल्याला लहानपणीपासून मिळालेली आहे. दुसऱ्यांना मदत करणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव मनात ठेवणे, सहानुभूती असणे, माणूस म्हणून या गोष्टी आपल्यात असल्या पाहिजेत. कारण यातूनच नाती भक्कम होत असतात, चांगला समाज तयार होत असतो. माणसामाणसांमध्ये प्रेमभाव निर्माण होत असतो.

पण हे चांगल वागणं किती असावं आणि कोणासोबत असावं याची समज पण आपल्याला असली पाहिजे. कारण कित्येकदा आपलं चांगल वागणं आपल्याच अंगावर उलटत. जरी आपण चांगल्या भावनेने सर्व करत असलो तरी समोरच्याची मानसिकता कशी आहे याचा आपण अंदाज नाही लावू शकत. तो पण तितकाच चांगला असेल अस नाही.

आपल्या चांगल्या वागण्याचा अनेकदा गोड बोलून फायदा उठवला जातो, मग तो कोणत्याही मार्गाने का असेना. आणि यात अनोळखी व्यक्ती कमी आणि जास्त करून आपल्याला चांगल ओळखणाऱ्या व्यक्तींचा समावेश असतो. याचं कारण त्यांना आपल्या कमकुवत बाजू, आपल्याला काय आवडत, काय केल्याने आपल्याला चांगल वाटू शकत जे सर्व माहीत असतं. त्यामुळं आपल्याला manipulate करणं सहज शक्य होत.

कित्येकदा कर्तव्याची आठवण करून देऊन फसवल जात, आपल्याकडून काही ना काही काढून घेतलं जातं. प्रेमापोटी स्वतःकडे असलेले सर्व काही देऊन टाकलं आणि नंतर तिचं व्यक्ती एकटी पडली अश्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. याचं कारणच हे आहे. माणूस आपल्या चांगुलपणात कितीतरी वेळा स्वतः लाच विसरून जातो. आपण जे काही ते इतरांसाठी, आपल्या माणसासाठी असं त्याला वाटू लागतं. आपल्यासाठी काहीतरी करणं, स्वतःच विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा हे कुठेतरी मनात ठसलेलं असत.

आणि जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हा ही गोष्ट लक्षात येते की खरचं कितपत चांगल वागल पाहिजे. जेव्हा हे असे अनुभव येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे सर्व बरोबरच वाटत असत. ज्यात आपण आपल्यालाच विसरतो. पण ज्या क्षणी वास्तविकता डोळ्यासमोर येते, लोकांची खऱ्या अर्थाने पारख होते तेव्हा समजत की आपल्याला देखील व्यवहारी व्हायला हवं, स्वतःचा विचार करायला हवा. पायाला ठेच लागते तेव्हाच आपल्याला नीट लक्ष देऊन चाललं पाहिजे याची जाणीव होते.

तसच माणसांचे जेव्हा वाईट अनुभव येतात, त्रास होतो तेव्हा आपल्याला आपलं चांगल वागणं कुठे थांबवायचं हे समजत. चांगल वागणं थांबवायच म्हणजे वाईट वागायचं अस नाही तर समोरची व्यक्ती, तिला नीट ओळखून वागायचं. कोणालाही आपला फायदा उठवू द्यायचा नाही. आपल्या आयुष्याची दोरी कोणा दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. माणूस, परिस्थिती पाहून वागायचं, आपला पण विचार करायचा.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी त्रास व्हायला हवा.”

  1. Prakash Narayan Patil

    योग्य आहे.मलासुद्धा असे अनुभव आले. परंतु लहानपणापासूनचे संस्कार आणि त्यातून तयार झालेला स्वभाव यामुळे बदल होत नाही.आपण जागरूकतेने वागायला लागलो की समोरची व्यथित होते, किमान तसे भासवते. ते पाहून, ऐकून मलाच मानसिक त्रास होतो.
    – प्रकाश पाटील.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!