Skip to content

एकांतात खूप बरं वाटत असेल तर तुम्ही मनाने थकलेले आहात.

एकांतात खूप बरं वाटत असेल तर तुम्ही मनाने थकलेले आहात.


एकांत शांतता कोणाला आवडत नाही. रोजच्या गजबजलेल्या जगातून मनाला जरा कुठे उसासा मिळतो तो एकांतात गेल्यावरच. जिथे आपण जरा स्वतःशी बोलू लागतो. इतके दिवस ज्याला पार विसरून गेलेलो असतो त्याला परत आठवायचा प्रयत्न करू लागतो. थकलेलं मन या एकांताने कुठेतरी शांत होत, जरा श्वास घेत. स्वतः ला पुन्हा एकदा ताजंतवान करण्यासाठी हा एकांत लागतोच, लागतो.

पण पुन्हा एकदा, एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. नको असताना वाट्याला येतो तो एकटेपणा असतो, आणि स्वतः ला हवा असतो म्हणून मिळवलेला असतो तो एकांत असतो. अंतर्मुखी माणसं ज्यांना फार एकटं राहायला जास्त आवडतं त्यांना खूप जास्त माणसांना सहवास फारसा नको असतो. आता हा जो एकटेपणा आहे तो त्यांना हवा असतो, तो नको म्हणून आलेला नसतो..

पण जेव्हा खूप जास्त माणसांमध्ये राहणाऱ्या, वावरणाऱ्या व्यक्तीला एकटं राहावंसं वाटू लागतं, ज्याला तो व्यक्ती मला थोडा एकांत द्या म्हणते तेव्हा कुठेतरी गडबड होते. आता जसं आधी म्हटल काही काळासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी हा गरजेचा असतोच. पण माणूस सतत एकटं राहायला लागतो, जेव्हा त्याला आजूबाजूला कोण नकोस होत तेव्हा मात्र काहीतरी समस्या निर्माण झालेली असते.

असे काही अनुभव वाट्याला आलेले असतात की वाटत आता बास! मी एकटीच/एकटाच ठीक आहे. मला कोणाची गरज नाही. अश्या वेळी त्या माणसाला थोडा काळ एकटं राहू द्यावं. त्याचा त्याच्याशी संवाद होऊ द्यावा. पण जिथे आपल्याला समजत की व्यक्ती सगळ्यापासून लांब होत चालली आहे, खूप जास्त एकटी पडत चालली आहे तिथे मात्र तिला त्यातून परत घेणं त्याच्या जवळच्या माणसाचं काम आहे.

कारण जवळचा माणूस जितकं समजून घेऊ शकतो तितकं कोणी घेऊ शकत नाही. माणूस वरून कितीही शांत वाटत असला, एकटा बसत असला तरी त्याच्या आत मात्र मोठी खळबळ चालू असते. खूप प्रयत्न करून देखील ती मिटत नाही तेव्हा माणूस निराश होऊन स्वतःला एकटा पाडतो. परंतु एका काळानंतर हे एकटेपण, हा अस्वस्थतेतून आलेला एकटेपणा माणसाच्या अंगावर उलटू शकतो. कारण कितीही झालं तरी प्रत्येकवेळी आपण एकटेच आपल्या सर्व समस्या नाही सोडवू शकत. आपल्याला मर्यादा येतात आणि जेव्हा माणूस आतून थकतो तेव्हा तर विचार पण क्षीण होऊन जातात.

एकट्या पडलेल्या माणसाला त्या वेळी सर्वात जास्त स्वतःच्या माणसाचीच गरज असते. मदतीची गरज असते. जरी तसं बोलून दाखवलं नाही तरी ते समजून घ्यावं लागतं. कारण एकदा माणूस आतून शांत झालं, खूप जास्त एकटं पडलं की नंतर त्यातून त्याला बाहेर काढणं कठीण जातं. प्रकाशाच्या एका किरणात सर्व अंधार तोडायची ताकत असते. त्यामुळे आपला एक मदतीचा हात त्या माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकतो. तो त्या नको असलेल्या एकटेपणातून बाहेर येऊ शकतो, नव्याने काहीतरी सुरू करू शकतो.

म्हणून योग्य प्रमाणात त्याचा त्याचा वेळ त्याला देऊन पुन्हा मुळपदावर आणण गरजेचं आहे. अश्या वेळी त्याला मदतीचा हात दाखवणं खूप आवश्यक आहे. शेवटी एकांत हा आत्मचिंतन करायला लावणारा असेल तर त्याला अर्थ आहे. आतून अधिक पोखरून टाकणारा एकांत काही कामाचा नाही.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “एकांतात खूप बरं वाटत असेल तर तुम्ही मनाने थकलेले आहात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!