Skip to content

गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि काळजी कराल तर तुमचा जोडीदार तुम्हाला वैतागेल.

गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि काळजी कराल तर तुमचा जोडीदार तुम्हाला वैतागेल.


जोडीदार हा कसा असावा याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते.. पण जोडीदार म्हणजे आपल्या सुखं दुःखात आपली कायम साथ देणारा.. आपल्या जोडीला कायम उभा राहणारा हे मात्र प्रत्येकासाठी अगदी सारखं असते…

मला एखादी व्यक्ती आवडली.. मला तिचा सहवास खूप आनंद देतो.. मी तिच्या प्रेमात पडलो आहे आणि मला तिचं व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून हवी आहे असं एखाद्या व्यक्तीला कितीही वाटलं तरी समोरच्या व्यक्तीकडून त्याच भावना.. तिचं मत हे तेवढंच महत्त्वाचं असते.. एकतर्फी प्रेमातून कोणतही नात कायम टिकतेच असे नाही.. आणि जर नात घट्ट असावं.. सुंदर असावं.. अस वाटत असेल तर ते दोन्हीकडून सारख्याच भावनेने असावं.. जेव्हा दोन्हीकडून सारख्याच भावना.. सारखीच ओढ असेल तर ते नात खऱ्या अर्थी नात म्हणता येईल..

जोडीदाराकडून जशा आपण अपेक्षा ठेवतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करतोय का हे सुद्धा तेवढच महत्त्वाचं आहे.. नाहीतर एकाच्या अपेक्षा या वाढतच जाणार आणि दुसरा मात्र त्या अपेक्षा पूर्ण करता करता कंटाळून जाणार..

नात्यात जोडीदाराला जितकं आपण समजून घेऊ तेवढच तो सुद्धा आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल पण जेव्हा हे एकीकडून होते तेव्हा मात्र नात्यातला ओलावा कमी होत जातो.. जस टाळी एका हाताने वाजत नाही.. म्हणजेच जेव्हा वाद होतात तेव्हा चूक एकाचीच असते असे नाही लहान का असेना कळतं नकळत दुसऱ्याकडून सुद्धा चूक झालेली असते.. अगदी तसच नात्यातील ओढ ही सुद्धा एकाने प्रयत्न करून टिकणार नाही तर दोघांनीही ती ओढ टिकावी आणि वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते..

असच जेव्हा जोडीदाराला नकोस वाटेल.. इतकी काळजी इतकं प्रेम सुद्धा दोघांना एकमेकांपासून दूर लोटण्यास कारणीभूत ठरते. एक साधं उदाहरण म्हणजेच आपला जोडीदार उठता बसता कारण नसताना सुद्धा आपली काळजी म्हणून आपल्याला सतत फोन करत असेल जेवलास का.. काय करतोस.. कुठे आहेस.. काय करणार.. उगाच नेहमी माहीत असून सुद्धा सतत तेच प्रश्न विचारले तर त्या जोडीदाराला कंटाळा येऊ लागतो.. आणि तो टाळाटाळ करू लागतो पण जो फोन करतोय त्याला आपली चूक जाणवत नाही आणि उगाच नको ते गैरसमज करून तो नाराज होतो.. आणि दोघांमध्ये संवाद नाही झाला तर अजूनच राग रुसवे वाढून नात्यात दुरावा वाढतो..

अति काळजी.. अती प्रेम….. जेव्हा कोणतीही गोष्ट नात्यात अतिप्रमाणात होते तेव्हा कुठेना कुठे एकमेकांचा.. जोडीदाराच्या अशा वागण्याचा कंटाळा येऊ लागतो. आणि मग आपला जोडीदार त्यापासून लांब राहण्याचा … त्या प्रमाणाबाहेर होणाऱ्या काळजी.. प्रेम यापासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करतो.

म्हणून नेहमीच नात घट्ट व्हावं अस वाटत असेल तर नात्यात नेहमी नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करावा.. एकमेकांसाठी एकमेकांमध्ये सतत चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण एकमेकांना आनंदी ठेवू.

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि काळजी कराल तर तुमचा जोडीदार तुम्हाला वैतागेल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!