Skip to content

प्रॉब्लेम स्वतःचे आणि उत्तर मात्र दुसऱ्याकडून अपेक्षित

प्रॉब्लेम स्वतःचे आणि उत्तर मात्र दुसऱ्याकडून अपेक्षित


हल्ली सोशल मीडियावर बऱ्यापैकी लोक active दिसतात. कोणी खूप कॉमेडी व्हिडिओज बनवून सर्वांना हसविण्याचा प्रयत्न करतो तर कोणी समाजाला चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न करतो.. अनेक रेसिपी शिकायला मिळतात तर प्रत्येकाची वेगवेगळी कला या सोशल मीडियावर पाहायला मिळते…

आणि याच सोशल मीडियाचा उपयोग कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी करते तर कोणी दुःख मोकळं करते.. कोणी व्यक्त व्हावं की नाही या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एक सहजच प्रश्न मनात डोकावतो की सुख दुःख हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात पण अनेकांना आपल्या समस्यांच समाधान आपल्या प्रश्नाचं उत्तर हे तिथे मिळेल असे अपेक्षित असते..

वेगवेगळ्या विचारातून आपल्याला उत्तर मिळतात पण ते समस्येचं कायमच समाधान नसते तर तात्पुरती उपाय असतो. आपल्याला कोणतं टेन्शन असेल .. कसला त्रास असेल तर तसेच प्रश्न अनेकांना असतील नक्कीच.. पण त्यांच्या आजुबाजूच वातावरण.. त्यांच्या अवतीभवती वावरणारी माणसं.. त्यांचा स्वतःचा आणि इतरांचा स्वभाव यासारख्या असंख्य गोष्टी या वेगवेगळ्या असतात आणि आपण मात्र तो एकच उपाय करून स्वतःचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो..

तात्पुरती समाधान.. आणि कायमच समाधान यात खूप फरक आहे हे ज्याचं त्याला जाणवते जेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर मिळते.. सोशल मीडियावर नक्कीच अनेक उपाय अनेक तोडगे मिळत असतील पण अनेकदा आपल्या प्रश्नांची थट्टा सुद्धा केली जाते.. उगाच नको ती चर्चा सुरू होते.. आपले प्रश्न वैयक्तिक राहत नाहीत..

अशावेळी करायचं काय… ??? आता समजा एखाद्या नवरा बायकोचं एकमेकांसोबत पटत नाही.. त्यांच्यात सतत वाद होतात मग ते आपल्या कुटुंबातील माणसांना एकमेकांची तक्रार करतात त्यावर समाधान नाही मिळालं की आपल्या मित्र मैत्रिणींसोबत चर्चा करतात.. मग हळू हळू कुठेच समाधान मिळालं नाही की सोशल मीडियावर आपले प्रॉब्लेम शेअर करतात.. पण एवढं सगळं करून परिस्थिती बदलते का ?? तर मुळीच नाही कारण प्रश्न दोघांचा आणि दोघांमध्ये होता.. त्याबद्दल चर्चा दोघांमध्ये होणे जास्त गरजेचे होते म्हणजेच जर दोघांनी जरी वाद होत असतील तरी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू त्यावर नक्कीच दोघेमिळून तोडगा काढू शकतात.. एकमेकांना आपल्या चुका दाखवून त्यामध्ये सुधारणा करून नात पुन्हा नव्याने सुरू करू शकतात.पण नको तिथे आपले प्रश्न मांडले तर त्यावर उपाय मात्र मिळणार नाहीत याउलट आपले प्रश्न अजून वाढत जातील.. याचा अर्थ काय आहे तर आपल्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याजवळ असतात पण आपण मात्र दुसरीकडे भरकटतो…

आपण आपल्या प्रश्नांची उत्तर स्वतःकडून मिळवू शकतो फक्त त्यासाठी स्वतःशीच संवाद साधणे गरजेचे आहे.. प्रॉब्लेम खूप आहेत आणि ते कायम असतील पण त्या प्रॉब्लेम च मूळ कारण काय आहे..

तो प्रॉब्लेम माझ्याशी जोडलेला आहे तर त्याच्यासाठी इतर कोणाकडे बोट न दाखवता आधी स्वतःमध्ये काय चुका आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा.. आपल्यातच बदल घडवा.. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवणे हे कायम लक्षात ठेवा..

त्यापेक्षा मला काय करता येईल यावर focus ठेवा.. जेव्हा हे सगळ करण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण दुसऱ्याकडून अपेक्षित ठेवणार नाही.

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रॉब्लेम स्वतःचे आणि उत्तर मात्र दुसऱ्याकडून अपेक्षित”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!