भावनिक रित्या तुम्ही एखाद्या व्यक्तीत अडकला असाल तर तुमचे हाल होणारच आहे.
नातं असावं मनामनाच.. विश्वासाचं.. आदराच.. प्रेमाचं आणि आपुलकीचं… हे असे वाक्य आपल्या कानी पडतात..अनेकदा आपल्या वाचनात येतात.. मुळात आपण जन्माला आल्यापासून आपलं प्रत्येकाशी कोणतं न कोणतं नात हे असतेच.. आणि जसजसं आपल्याला कळतं जाते तसतसे आपण ते नात अनुभवायला लागतो.. नात्यातील खरेपणा..नात्यातील ओढ आपल्याला जाणवायला लागते..
मग नात्यात प्रेम आदर विश्वास काळजी या सगळ्या भावना महत्त्वाच्या असतातच पण नात्यात जर अशा भावनिकतेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर मात्र त्या नात्यात अनेक प्रश्न निर्माण होतात…
जर आपण एखाद्या व्यक्तीत भावनिकरित्या अडकलो असू तर त्या व्यक्तीला आपल्या भावनांची जाणीव असेल तर ठीक नाहीतर त्या सर्व भावनांचा आपल्यालाच त्रास होतो…
नातं म्हणजे त्यामध्ये मोकळीक गरजेची असते पण त्यामध्ये बंधन आली तर त्यातली मोकळीक नाहीशी होते आणि मग एकमेकांबद्दल तक्रार वाढत जाते…
मी जितकं त्याच्यावर प्रेम करते तेवढच प्रेम त्याने सुद्धा माझ्यावर केलंच पाहिजे असे हट्ट वाढत जाणे म्हणजेच भावनांचा अतिरेक होणे.. आणि जर तेवढं प्रेम नाही मिळालं की त्याचं आपल्या भावना आपल्याला त्रास देतात की मी का इतकं त्याच्यावर प्रेम करते…
खर तर आपलं एखाद्यावर प्रेम असणे यात आपली काहीच चूक नाही पण त्याचासुद्धा तेवढच प्रेम आपल्यावर असावं हा अट्टाहास आपल्या नात्यात बंधन वाढवतो…
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर पुढे कधीना कधी तो विश्वास निर्माण होईल असा सकारात्मक आशावाद ठेवून कोणताही विचार मनात ठेवून स्वतःला त्रास करून न घेता बिनधास्त जगता आले पाहिजे.. पण जर तस जगता येत नसेल तर तो विश्वास काही जबरदस्ती निर्माण होणार नाही … आणि फक्त रडून आणि बोलून आपल्यालाच त्रास होणार..
एखाद्या व्यक्तीत भावनिकरित्या अडकणे म्हणजे स्वतःच व्यक्तिगत आयुष्य जगणे पूर्णपणे विसरणे… आपल्या भावना या आपल्यापुरती मर्यादित असतील तर आपल्याला त्याचा त्रास नाही होणार.. कारण त्या आपल्या कंट्रोल मध्ये असतील.. पण एकदा का या भावनांचा कंट्रोल सुटला तर मात्र समोरच्या व्यक्तीकडून आपल्या भावनिक अपेक्षा वाढणार..आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर आपणच जास्त दुखावले जाणार..
यामध्ये होते काय तर आपण समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखतो कारण आपली समज वाढलेली असते पण समोरची व्यक्ती आपल्या भावना ओळखू शकत नसल्याने आपल्याला सतत निराशा पदरी पडते..
आपलं अस्तित्व.. आपलं व्यक्तिगत आयुष्य जपण जास्त गरजेचं आहे.. प्रत्येक व्यक्ती हेच करण्याचं प्रयत्न करत असतो पण जे व्यक्ती इतरांशी भावनिकरित्या जास्त गुंतत जातात ते मात्र स्वतःचा आनंद समोरच्या व्यक्तीत शोधतात तो त्यांना कधी मिळतो तर कधी नाही मिळत.. तर कधी नात तुटते आणि कायमच दुःख मिळते..
म्हणून अशा भावनांमध्ये न अडकता सर्व बाजूंनी योग्य विचार करून.. स्वतःच आयुष्य स्वतःच आनंदी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले हाल होणार नाही..
मिनल वरपे, संचालिका
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
Nice picture you have drawn with words
Chhan vatale pan aatta awaghad vatate apply karayala..
, happy
एक नंबर शब्द कमी पडावे आशे मार्गदर्शन शतशा धन्यवाद