मनाचे प्रॉब्लेम्स सुंदर क्षणांना आपल्या आयुष्यातून काढून फेकून देतात.
आलेला प्रत्येक क्षण हा त्याच एक अस्तित्व निर्माण करत असतो.. प्रत्येक क्षण सारखाच आहे असं कधी आपण बोलत सुद्धा नाही कारण प्रत्येक क्षण हा वेगळा असतो.. आता या क्षणाला आपण जो आनंद घेतोय तोच आनंद आपल्याला पुढच्या क्षणात मिळेलच असं नाही..
आठवण या शब्दातच कित्येक क्षण जपलेले असतात.. लहानपणाची आठवण.. शाळेची आठवण.. नातेवाईकांची..मित्रांची आठवण.. गेलेल्या सगळ्या जुन्या क्षणाची राहते ती फक्त आठवण.. कारण तो क्षण तर आपण थांबवू शकत नाही.. येणार येणार म्हणता म्हणता तो क्षण कधी येऊन सहजच निघून जातो हे कळत सुद्धा नाही… मग अशा क्षणातच निघून जाणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपण किती आणि कसं जपावं याची जाणीव असणे खूप गरजेचे आहे.. आणि जो ते जपेल तोच आयुष्याचा खरा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणता येईल…
माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता…. त्या दिवसाची तिने खूप तयारी केली होती.. तो दिवस किती खास आहे आणि तो सुंदर celebrate व्हावा यासाठी तिने खूप planning केले होते…पण त्याच्या दोन दिवस आधी तिच्या लक्षात आले की तिचा नवरा तिच्यापासून लपवून कोणाशी बोलतोय…
त्याला काहीही न विचारता तिने त्याचा मोबाईल check केला तेव्हा तिला तिच्या मैत्रिणीचा नंबर दिसला… पण त्यापुढे तिने काहीही न विचारता.. कोणताही संवाद न साधता तिला योग्य वाटेल तो अर्थ लावला आणि त्याचाच विचार करत तिने केलेले सगळे प्लॅन कॅन्सल केले..
आणि त्यादिवशी सुट्टी न घेता कामावर निघून गेली आणि उशिरा घरी आली.. आल्यावर तिचा पडलेला चेहरा.. तीच बदललेल वागणं बघुन.. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं त्यावेळी मात्र तिने सगळं सांगितलं … मग यावर त्याने सांगितलं की तुझ्या मैत्रिणीला तुझ्या आवडीनिवडी माहीत आहेत आणि मला आज तुला surprise gift द्यायचं होत म्हणून तुला न सांगता तिच्याशी मी contact केला..
आणि तीच गिफ्ट त्याने तिच्या हातात दिलं.. ते पाहून स्वतःच्या गैरसमजामुळे तिने तिच्या आयुष्यातला सुंदर दिवस वाया घालवला हे तिच्या लक्षात आले.. पण गेलेला दिवस आणि त्या दिवसातला प्रत्येक क्षण पुन्हा कधीच मिळणार नाही.,
मिनल वरपे, संचालिका
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.