Skip to content

स्वतःचा आनंद स्वतःमध्ये दिसला की तो इतरांच्या आयुष्यात घुसमटासारखा वावरत नाही.

स्वतःचा आनंद स्वतःमध्ये दिसला की तो इतरांच्या आयुष्यात घुसमटासारखा वावरत नाही.


Live a life with inner voice that can definitely gives you inner happiness, joy and right attitude to run the situation.

आनंदाची अशी एकमेव व्याख्या करता येणार नाही, कारण प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. मला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल गरजेचं नाही समोरच्या माणसाला पण तीच गोष्ट आनंद देईल. जसा या आनंदात माणसागणीक फरक पडतो जातो तसच तो मिळवण्याचा, टिकवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्नही वेगळा असतो.

काही जण आपला आनंद स्वतःमध्ये शोधू पाहतात तर बऱ्याच लोकांचा आनंद इतरांवर, परिस्थितीवर अवलंबून असतो. यातून होतं काय ती परिस्थिती आल्याशिवाय, तसं काही घडल्याशिवाय ती व्यक्ती आनंदी होत नाही. उदा. मला महिन्याला ३०हजार रुपये मिळालेच पाहिजेत, तरच मला बरं वाटेल, मला आनंद मिळेल. एका डॉक्टरच्या, थेरपिस्टच्या दृष्टिकोनातून माझ्या क्लायंटला बर वाटलं, की त्याला बर केलं तरच मला आनंद मिळेल, तरच मी एक चांगला डॉक्टर म्हणून येईन.

स्वतःला अश्या condition घातल्याने आपण स्वतःच आपल्या आनंदाला मर्यादा घालतो. कारण परिस्थिती काही पूर्णपणे आपल्या हातात असत नाही. बऱ्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात. आपण आपलं आयुष्य या सगळ्यावर कितपत ठेवायचं हे आपल्यावर असत. अनेकांचा असा हट्ट असतो की माझ्याकडे गाडी असली, माझा मोठा बंगला झाला तेव्हा कुठे मला आनंद मिळेल. हे सर्व मिळवणं चांगलच आहे, पण तोपर्यंत काय? तिथे पोहोचेपर्यंत आपण उदास राहायचं का? असमाधानी राहायचं का?

आनंद ही अशी भावना आहे जी आपण जितकी आपल्यात, स्वतःमध्ये शोधू तितकी आपल्याला जास्त जाणवते. आपला आनंद आपण स्वतः निर्माण केला की आपण कधी असमाधानी राहत नाही. या दोन्ही गोष्टी तश्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जेव्हा व्यक्ती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला शिकते, त्याबद्दल कृतज्ञ असते त्यावेळी आजूबाजूच्या गोष्टी आनंद देऊ लागतात.

अगदी झाडाला नवीन फुल आलं तरी एखाद्याला आनंद होतो, पहिल्या पावसाच्या सरींनी मन प्रसन्न होतं, कमी गरजांमध्ये देखील व्यक्ती सुखी, आनंदी राहते. हे सर्व आपल्या दृष्टिकोनावर आहे. जितकं आपण स्वतःमध्ये आनंद शोधू लागू तेव्हढे आपण समाधानी राहू. तेवढं परिस्थिती आपल्याला आनंद देईल आणि आपण त्यासाठी इतरांवर अवलंबून राहणार नाही. यासाठी आपण आपला आनंद कसा निर्माण करू शकतो याचा विचार करा. आयुष्याबद्दल कृतज्ञ रहा.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!