Skip to content

जर एखादी गोष्ट माणसाला करणं शक्य आहे, लक्षात घ्या तुम्हीही तिथपर्यंत पोहोचू शकता…

जर एखादी गोष्ट माणसाला करणं शक्य आहे, लक्षात घ्या तुम्हीही तिथपर्यंत पोहोचू शकता…


इटलीचा सम्राट आणि महान तत्त्ववेत्ता Marcus Aurelius एक प्रसिद्ध वाक्य आहे,

If a thing is humanly possible,
Consider it within your reach….

जर एखादी गोष्ट माणसाला करणं शक्य असेल तर आपणही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आपणही ती गोष्ट करू शकतो. हे लक्षात घेणं का आवश्यक आहे? कारण अनेकदा आपण ही गोष्टच विसरून जातो. काहीही नवीन करताना मला हे जमणार नाही, मी काही हे करू शकत नाही हेच विचार डोक्यात येतात. कशाचीही सुरुवात करण्याआधीच आपण हे ठरवून मोकळे होतो की आपण हे काही करू शकणार नाही.

अगदी लहान असताना सायकल चालवताना हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. सुरुवातीला जेव्हा त्यातलं काहीच माहीत नसतं, तेव्हा आपण ती घ्यायलादेखील घाबरतो. पण तिथे आई, बाबा किंवा शिकवणार कोणतरी असतं, त्यांच्या बोलण्यात देखील हे असतं की दादा/ ताई बघ कसे चालवतात. त्यांना जमत की नाही, तुला पण जमणार. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिली जातात.

कोणतीही नवीन गोष्ट शिकताना भीती वाटणं स्वभाविक आहे, आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसतं, ते शिकण्याच्या ज्या क्षमता आहेत त्यात आपण आता कुठे आहोत, नक्की आहोत की नाही हे देखील आपल्याला माहीत नसत. पण म्हणून ते करण्याचं धाडसच करू नये का? असं नाही. सततच्या सरावाने, शिकण्याने ती गोष्ट हळू हळू जमते.

हेच बऱ्याच जणांना मान्य करायचं नसतं. काहीतरी करायच्या आधीच मला काय हे होणार नाही, हे करणं शक्यच नाही. छोट्या गोष्टींच्या बाबतीत नाही तर अनेक मोठ्या शोधांच्या बाबतीत हे असं झालं आहे. पण आपल्या सर्वांना हे माहीत आहे ज्याला सुरुवातीला लोक अशक्यप्राय समजत नाही ते सर्व शोध माणसानेच लावले आहेत. आताच हे technology च जग माणसाच्या कष्टाने, बुद्धिमत्ता आणि नवीन काहीतरी करून पाहण्याच्या उत्कंठेनेच शक्य झालं आहे, तयार झालं आहे.

त्यामुळे काहीही न करता मला जमणार नाही म्हणण्याहून आधी आपण ती करून पाहिली पाहिजे. आपल्यात एखादी गोष्ट करण्याची क्षमता आहे की नाही हे ती करून पाहिल्याशिवाय कसं समजणार? आधीच चुकीचे अंदाज लावून आपण अनेक संधी गमावतो. म्हणून आधी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या क्षमता आजमावून पहिल्या पाहिजेत. त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जर एखादी गोष्ट माणसाला करणं शक्य आहे, लक्षात घ्या तुम्हीही तिथपर्यंत पोहोचू शकता…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!