Skip to content

इतरांना समजून घेताना आपल्याला पण कोणीतरी समजून घ्यावं असं व्यक्तीला नेहमी वाटतं…

इतरांना समजून घेताना आपल्याला पण कोणीतरी समजून घ्यावं असं व्यक्तीला नेहमी वाटतं…


आज खूप छान ओळी वाचल्या,

The healer also needs healing.
The planner also needs surprises.
The giver also needs to receive.
The thoughtful also needs to be thought of.
The considerate also needs to be considered.

जो इतरांना बरं करतो त्याला पण आतून बरं होण्याची गरज असते. जो इतरांना देतो त्याला आपल्यालादेखील काहीतरी मिळावं, इतरांचा विचार करताना आपल्याला पण विचारात घेतलं जावं असं वाटतं. किती खरं आहे हे सर्व. बऱ्याचदा एखादी व्यक्ती जेव्हा इतरांचा विचार करते, जे काही करायचं ते आपल्या माणसांसाठी किंवा समाजासाठी. इतरांच्या आनंदात आपला आनंद असा विचार करून जेव्हा व्यक्ती जगत असते तेव्हा तिला गृहीत धरलं जातं.

परंतु या सगळ्यात हे विसरलं जातं की त्या माणसाला देखील समजून घेतलं पाहिजे. तिचा पण विचार केला पाहिजे. कोणतीही व्यक्ती असुदे, जरी तिने बोलून दाखवले नाही तरी जर आपण इतकं सर्व करतोय तर आपला पण विचार केला पाहिजे, आपल्याला देखील समजून घेतले पाहिजे त्यात्या माणसाला वाटतच असतं.

याची उदाहरण आपल्याला आपल्या जवळच्या माणसांमध्ये, अगदी घरातल्या घरात पाहायला मिळतात. आपली आई सकाळी उठल्यापासून सर्वांचे जेवण बनवणे, मुलांना आवरणे, नवऱ्याचं घरातल्या इतर माणसांचं सर्व करणे, घर सांभाळणे या गोष्टी अविरत करत असते. तरी चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. का? तर हे आपण आपल्या माणसांसाठी करत आहोत ही भावना मनात असते.

मनातून वाटत असतच की आपला पण विचार केला जावा, आपल्यासाठी पण काहीतरी करावं. आणि म्हणूनच मुलांनी अचानक दिलेलं छोटंसं ग्रीटिंगकार्ड देखील डोळ्यात आनंदाश्रू आणते. आज तू जेवण करू नको आपण बाहेर खायला जाऊ असं जेव्हा नवरा म्हणतो तेव्हा आतून आनंद आणि समाधान वाटते.

हे केवळ आईच्या बाबतीत किंवा घरातल्या स्त्रीच्या बाबतीत होतं असं नाही. ज्या व्यक्तीच्या अंगावर जबाबदारी पडते, ज्या व्यक्तीला सगळ्याची जाणीव असते, त्या जाणिवेने ती

व्यक्ती जेव्हा सर्वांचं करत असते तेव्हा या गोष्टी होतात. अश्या वेळी त्यांच्या जवळचं माणूस म्हणून आपलं हे कर्तव्य असतं त्या माणसाला समजून घेणं, त्यांनी न सांगता त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणं.

चेहेऱ्यावर प्रत्येक वेळी हसू आहे याचा अर्थ ती व्यक्ती नेहमी आनंदीच असते असं नाही, किंवा तिला काही त्रासच होत नसतो असं नाही. त्यांना असं माणूस हवं असतं ज्यांच्याकडे ते मोकळेपणाने बोलू शकतील. आपल्या मनातलं सांगू शकतील. उपदेश करणारे, सल्ले देणारे खूप असतात. परंतु मनापासून, कोणतंही जजमेंट न करता ऐकून घेणं हे एक कौशल्य आहे.

आपण शेवटी समाजशील प्राणी आहोत. आयुष्यभर विविध नात्यांना निभावत, सांभाळत आपल्याला पुढे जावं लागतं. अश्या वेळी एकमेकांना समजून घेणं, सांभाळून घेणं, पुढे जायला मदत करणं यातून नातेसंबंध दृढ होतात तसच माणूस कधीच एकटा पडत नाही. आयुष्याला एकप्रकारची उभारी मिळते. म्हणूनच एकमेकांचा आधार होतं पुढे जाता आलं पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “इतरांना समजून घेताना आपल्याला पण कोणीतरी समजून घ्यावं असं व्यक्तीला नेहमी वाटतं…”

  1. छान पन पन ज्यांचा लग्न झालंय व जोडीदार जगातून गेला त्याच काय तो लेख पाठवा त्यांची कस जगाव

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!