Skip to content

अन अचानक… आयुष्य खूप जगावंसं वाटतं!!

अन अचानक… आयुष्य खूप जगावंसं वाटतं!!


सुखद जाणिवा

कधी कधी इतकं भरून येत. उगाचंच एकटं एकटं वाटायला लागतं. अवतीभोवती माणसांची गर्दी असूनही
आतून काहीतरी तुटायला लागतं. जगणंच खायला उठत
आणि अचानक त्याचवेळी….
शाळेतल्या मैत्रिणीचा फार वर्षांनी फोन येतो आणि ती सांगायला लागते आपला फोन नंबर मिळवण्यासाठी केलेल्या लडतरी आणि मग स्वतःला एकदम खास वाटायला लागतं…

कधीतरी वाटत आपली कदरचं नाही कुणाला, नको त्या लोकांसाठी कुजतोय आपण आणि त्याचवेळी
आपला कोणी कलीग प्रमोशन चे पेढे देताना सांगतो ‘मॅडम खूप शिकायला मिळालं हं तुमच्याकडनं’
आणि स्वतःच्याच नजरेत एक पाऊल वर चढायला होतं

कधी तरी कुठेतरी दंगा होतो आणि वाटायला लागतं एकदम असुरक्षित. रोजचा भाजीवाला पण जातीयवादी वाटतो आणि बसमधला शेजारचा माणूस आतंकवादी!
अंदाजानेच माणूस ओळखून ‘हा आपला’ अन ‘हा परका’ अस मनातच वर्गीकरण होत.
अन त्याचवेळी कोपऱ्यावरचा सलीमभाई शिरखुरमा
भरलेला डबा आणतो आणि वर दसऱ्याला कडाकण्या भरून मगच परत द्या असंही हक्कानं सांगतो…
आणि एकदम लख्ख दिसू लागतं सगळं पहिल्यासारखंच

कधीतरी लाज वाटायला लागते स्वतःच्या मध्यमवर्गीय असण्याची. जणू पैसा म्हणजे सर्वस्व वाटायला लागतं
आणि त्याचदिवशी डॉमिनो’ज चा पिझ्झा सोडून लेक शेजारच्या दुकानातन चॉकलेट विकत घेते
आणि वाटून टाकते मंदिराबाहेरच्या पोरांना. तिच्या चेहऱ्यावरचं स्वर्गीय हास्य बघून वाटतं
अरेच्चा, ‘हे तर आपल्याला रोज परवडू शकतं’….

कधी कधी स्वतःचं महत्व संपल्यासारखं वाटत.
कुणालाच आपली किंमत नाही असं काहीसं वाटायला लागतं
आणि त्याच दिवशी कधी नव्हे तो इनबॉक्स ला मेसेज येतो
‘आज भाजी मस्त झाली होती, बरं का’
आणि दिवसच नाही तर मन सुद्धा उजळून निघतं

कधी कधी नकोशी असलेली भावना वाढायला लागते. कुणालाच आपली गरज नाही अस काहीस वाटतं
आणि त्याचवेळी कल्पना चावला बनायची स्वप्न पाहणारी लेक गळ्यात पडून हलकेच बोलते
‘मम्मी तू पण येणार ना ग चंद्रावर माझ्याबरोबर! मला एकटीला भीती वाटेल की गं’
आणि खरं सांगू त्या बछड्याला जवळ घेताना मला मी म्हणजे जणू धरतीला तोलून धरणारा शेषनाग वैगेरे असल्यासारखं वाटायला लागतं
आणि मीठ नसलेलं अळणी जगणं एकदम सुंदर बनून जातं?

जगण्याच्या डायरीतलं पान…..



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling मध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहिती जसे की नाव, ठिकाण, ओळख, समस्या हे उघड केले जात नाहीत, त्या गोपनीयच ठेवल्या जातात, कृपया याची नोंद घ्यावी.


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

7 thoughts on “अन अचानक… आयुष्य खूप जगावंसं वाटतं!!”

  1. हाच काय या पेज वरचे बरेच लेख सकारात्मक बदल घडवता आहेत.खूप आभारी.

  2. आपले लेख खुपच छान असतात त्यातुन खुप चांगला बोध मिळतो आपल्याला रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी चे उत्तरही यातुन मिळते
    धन्यवाद सर

  3. अप्रतिम लेख
    डोक्यात विचारांचं काहूर उठली असल्यास हे वाचले, मनन केले तर नक्कीच त्याचा उपयोग होईल व मन आनंदी होईल यात शंकाच नाही

  4. खुपच छान, कारण मी सुद्धा कधी कधी असाच विचार करतो की माझी कदर कुणालाच नाही. नेहमी नैराश्य येतं आयुष्य जगत असताना.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!