Skip to content

आत्मविश्वास गमावला तर आयुष्याचे मोठे निर्णय सुद्धा चुकतात!!

आत्मविश्वास गमावला तर आयुष्याचे मोठे निर्णय सुद्धा चुकतात!!


गौरव भावसार


“हा, hello बाबा , कधी येताय ? कुठपर्यंत आले तुम्ही? ”

“हा तयार झालोय आता बस ची वाट पाहतोय, बस stop लाच उभाय.”

“आई जेवण बनवतेय तुमच्यासाठी पण ! लवकर या मग, मी पण वाट बघतोय !”

“हो रे पिल्ल्या ! तू अभ्यास वगैरे काय असेल ते सगळं करून ठेव. मी आल्यावर मग आपल्याला फिरायला जायला बरं मग कुठे तरी ! ”

“काही अभ्यास नाही दिलाय ! मी टीवी पाहतोय!”

“आणि पप्पा तुझे?”

“पप्पा बाहेर गेले, काय ते रोज सारखं भांडण झालं ! मी तर जास्त वेळ राहात पण नाही त्याच्या पायरे घरी..”

“बरं जाऊदे तू तुझा तुझा टीव्ही पहा. बाकीचं काही लक्ष देऊ नको. येतोचे मी एखाद तासात”

“हा ठीके , ठेवतो..”

“हम्म”

फोन कट करून “बाबांनी” फोन आपल्या खिशात ठेवला. सकाळची वेळ होती. stand वर २-३ जण होती. बस लवकर येत नसल्याने आजोबा कंटाळून stand च्या बाकावर बसले.. हाताची बोटं एकमेकात खोचून , त्यावर हनुवटी ठेऊन, खाली मान करून, रस्त्यावरच्या दगड माती पासून आपल्या पाया कडे नजर फिरवताना आपल्या विचारांत कधी हरवून गेले त्यांना पत्ता सुद्धा लागला नाही. अनेक चार चाकी, दुचाकी, भर वेगात रस्त्यावरून जात होत्या. त्यांच्या त्या एका सेकंदात हवेच्या वेगाने जाण्याचा आवाज समुद्रांच्या लाटांप्रमाणेच वाटत होता…तेवढ्या गाड्या सोडल्या तर पूर्ण परिसर शांत… इकडे एखाद्या समुद्राच्या किनारी, मन शांत होऊन स्वतःच्याच मध्ये हरवून जावं तसच आजोबा त्यांच्या स्वतःतच हरवून गेले… आयुष्यभर नुसती धावपळ करता करता जे विचार करायचे राहून गेले होते, ते ज्वालामुखी प्रमाणे एका पाठोपाठ एक मनात फुटत होते.. ज्या भरधाव वेगाने गाड्या जात होत्या, त्याच वेगाने आजोबांच्या डोळ्यासमोरून पूर्ण आयुष्याची रीळ जात होती.. चिंतन आणि शंका, प्रश्न, वेदना यांचा कल्लोळ माजवत होती…

“आयुष्याच्या अगदी तरुणपणामध्ये मला इच्छा होती स्वतःचं काहीतरी करण्याची.. पण काका आणि मामा तो मूर्खपणा म्हणून मला support केला नाही, आणि आई बाबांचाही त्यांच्यावर मनापासून विश्वास असल्याने त्यांनी देखील माझ्या निर्णयावर शंकाच घेतली… तरी देखील एकट्याने प्रयत्न करून कसातरी स्वतः चा व्यवसाय उभा केला.. बायकोनेही कधी साथ दिली नाही.. लोकांचं ऐकून तिचाही ग्रह हाच झाला कि माझ्या विचारात, आणि जे करतोय त्यात.. काही तत्थ्य नाही… त्यात व्यवसायाला अचानक उतरती कळा लागली … बायकोचे रोजचे खिजवणे आणि पैसे नाही किराणा नाही, नोकरी करायचा कंटाळा आहे, आयतं खायची सवय आहे, वगैरे वगैरे.. शेवटी तिच्या रोज रोजच्या कटकटीला आणि आई बाबा, आणि ह्या बाकीच्या नातेवाईकांच्या बोलण्याला कंटाळून, सोडून दिला व्यवसाय, आणि नोकरीला लागलो..

तशी चांगली चालली नोकरी, संसार शांततेत झाला… कुटुंबाच्या हिशोबाने ते चांगलंच झालं.. पण मनात कुणकुण लागुनच राहिली, कदाचित व्यवसाय सोडायला नको होता…. त्यानंतर काही स्वतःची इच्छा घरी सांगायची म्हणजे विचारायलाच नको. पुन्हा तेच तेच व्यवसायाचं काढून माझं म्हणणं दाबून टाकयचं… ‘आमचं ऐकलं म्हणून वाचला तुझा संसार नाहीतर पूर्ण बरबाद झालं असता…’ असे सारखे टोमणे चालू…त्यामुळे मुलीचा संसार सुखाचा व्हावा त्यासाठी एक चांगला नवरा तिला शोधून देणे, इतकं महत्त्वाचं कर्तव्य सुद्धा मी न करता काका आणि मामांना करू दिलं… ‘आम्ही बरोबर करून देतो चांगल्या ठिकाणी लग्न… आमचं ऐकल तर फायद्यात राहाल, यांचं ऐकाल तर खड्ड्यात जाल..’ आणि माझ्या बायकोने सुद्धा त्यांच्यावर स्वतःच्या नावर्याहून अधिक विश्वास दाखवला.. मी सुद्धा काही बोललो नाही, शेवटी आधीच आपल्या आयुष्यात एक मोठी चूक केल्यानंतर दुसरी चूक, तेही आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल निर्णय घेताना का करावी म्हणून मी सुद्धा शांत बसलो… स्वतः पेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवला. बायकोचेही तसेच म्हणणे होते, शेवटी सोडला त्यांच्यावर हा कार्यक्रम…

पण जसा तो मुलगा होता, मला आधीच माहित होतं हा आपल्या मुलीला नाही सांभाळू शकणार… कसल्या मागासलेल्या विचारांचा तो… मंगळसूत्र मुलीवाल्यानीच करा, खर्च तुम्हीच करा, एवढ्याशा कारणासाठी गोंधळ घातला होता, वर लाडीगोडी जशी लावत होता इतरांना, आणि लोकांना एखाद्या वाशिल्यासारखा घरच्या गोष्टी सांगत होता, तेव्हाच कळायला पाहिजे होता मला, हा आपल्या मुलीच्या लायकीचा नाही. मला कळलं होतं, त्याच्या काही वागण्यावरून समजत सुद्धा होतं.. पण माझ्या स्वतः वर माझाच विश्वास नसल्यामुळे, स्वतः ची किंमत न केल्याने, स्वतः ला कमी लेखल्याने, माझ्या पोरीच्या आयुष्याचा निर्णय सुद्धा मी चुकीचाच घेतला… म्हटलं काका मामा म्हणताय तर चांगला आहे मुलगा, होईल सर्व व्यवस्थित… पण कसलं काय, दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच गेली… ह्या बाइल्याने घरातले भांडण बाकीच्यांना सांगितले, साध्या साध्या गोष्टीवरून किरकिर, मारणे आणि मानसिक छळ करणे.. तुझा बाप असा, तुझं खानदान असं… २ पैसे कमावण्याची अक्कल नाही, गमावण्याची अक्कल आहे, आधी बापाकडून जे ६००० त्याने घेतले न माझे ते आण इथे मग सांग… नको नको त्या शिव्या देऊन ह्या गावंढळ माणसाने त्या पोरीचा नाही नाही तेवढा छळ केला, अजून ह्या माझ्या काका आणि मामांना लाडीगोडी लाऊन समजावत होता तिचीच चूक आहे, काहीही थोडं बोललं कि पळून येते म्हणतो माहेरी…

अरे? माहेरी नाही तर मग कुठे जाईल ती ? तू नीट सांभाळत नाहीस म्हणून यावा लागतंय न तिला, का हाउस आली तिला येऊन आपली इज्जत घालवून घ्यायची ? कुठे जाईल माझी पोरगी ? घरच्या लक्ष्मीला कसं सांभाळावं, तिच्यासाठी आपण काय काय करावं, तिच्या भावनेला समजून घ्यावं, तिला आधार द्यावा, ते सोडून हा बिनडोक माणूस साला तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय… मी जर ठिकाणावर राहिलो असतो तर हे सगळं झालाच नसतं.. माझी इतकी शिकलेली मुलगी, आपल्या आयुष्यात स्वतः चं अस्तित्त्व कमावण्याच्या ऐवजी, प्रगती करण्याऐवजी आणि एखाद्या सुसंस्कृत आणि पुढारलेल्या व्यक्तीशी लग्न करून एकदम सुखी आयुष्य जगण्याऐवजी त्या बिना लायकीच्या माणसासोबत नसती राहिली.. माझ्या आत्मविश्वास नसण्यामुळे माझ्या मुलीचा आत्मविश्वास सुद्धा बळी पडलाय.. तिचा आत्मा नरक यातना भोगतोय माझ्यामुळे तिला मिळालेल्या या आयुष्यात.. कायमचा… काय केलं मी हे..” विचार करता करता आजोबा डोक्याला हात लाऊन बसले. अक्षम्य गुन्हा केल्याच्या भावनेने सल निर्माण होत होती…पश्चात्तापाचे पाणी डोळ्यांत तरळायला लागले.. आजोबांनी विचारांच्या तंद्रीतच आकाशाकडे हळुवार तोंड उचलले.. डोळे उघडझाप करत ते मनातच बोलू लागले..

“काय रे देवा.. काय करू मी ? स्वतः चं ऐकलं तेव्हाही चुकलो.. लोकांचं ऐकलं तेव्हाही चुकलो… करू तर काय करू मी? स्वतःचं तेव्हा करू शकलो नाही कारण आपल्यामुळे आपल्या लोकांना त्रास नको व्हायला..आता स्वतःचं केलं नाही, तर पोरगी माझी त्रास भोगतिये.. कसं जगू देवा.. माझ्या मनाचं करू कि लोकांच्या हिशोबाने काय चांगलं ते करू.. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे सगळी..” आजोबांच्या आर्त यातना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने वाहू लागल्या.. मुठ आवळली गेली … समोरून बस आली …

लगोलग आपले डोळे पुसत आजोबा भानावर आले.. आपले विचार मंथन आणि आत्मचिंतन तिथेच थांबवत आजोबा काही झालंच नाही असा आव आणत आपल्या नातवंडाला देण्यासाठी घेतलेली चित्रांची पुस्तकं घेऊन बस मध्ये चढले…



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling मध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहिती जसे की नाव, ठिकाण, ओळख, समस्या हे उघड केले जात नाहीत, त्या गोपनीयच ठेवल्या जातात, कृपया याची नोंद घ्यावी.


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “आत्मविश्वास गमावला तर आयुष्याचे मोठे निर्णय सुद्धा चुकतात!!”

  1. स्वतःचीच कथा असल्यासारखी वाटली कदाचित माझे भविष्य लेखातील आजोबां सारखे असू शकते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!