आजकाल विसरायला का होतंय…? विसराळूपणामागची ही ६ कारणे तुम्हाला विचार करायला लावतील…
वयोमानानुसार विसरभोळेपणा हा विकार जडणे तसे साहजिक आहे.याला वैद्यकीय भाषेत ‘अलमायझर’ असेही म्हणतात.आज प्रत्येक घरात वयोवृद्ध व्यक्तींना ही समस्या आहेच.तसे पाहायला गेले तर ही नैसर्गिक बाब आहे.
पण ,आजकाल दुसरीच एक समस्या सर्वत्र अगदी कॉमन झाली आहे.ती म्हणजे ,’अकाली विसारळूपणा वाढणे’.
कमी वयात,किंवा अगदी तरुण वयात देखील अनेकांना ‘विसरायला होतंय’.काय कारणे असू शकतील बरे ह्या मागे?
ह्या लेखात आपण मुख्य ६ कारणे पाहणार आहोत जी विसराळूपणाला कारणीभुत ठरत आहेत.
१) अति-विचार – सतत एखाद्या गोष्टीबद्दल विचार करीत राहिल्यामुळे व्यक्ती वर्तमानात जगू शकत नाही.अति विचारात एक तर भूतकाळ असतो नाहीतर भविष्यकाळ. आणि ह्या अति-विचारात वर्तमान कुठेतरी हरवलेला असतो.आणि यामुळे ती व्यक्ती दैनंदिन आयुष्यातील गोष्टी हळूहळू विसरू लागते.जसे की , एखादी वस्तू कुठे ठेवली आहे हे न आठवणे इत्यादी..
२) नैराश्य/ वैफल्य – काही गोष्टींमुळे,समस्यांमुळे आजकाल तारुणांमध्ये नैराश्य ( Frustration)वाढत आहे.एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच तरुण पिढी नैराश्यात जात आहे.आणि वैफल्यग्रस्त (Depression) होत आहे.ह्या सगळ्यात साध्या साध्या रोजच्या जीवानातील गोष्टी माणूस विसरत चालला आहे.
३) तंत्रज्ञान/स्मार्ट फोन/संगणक यांचा अतिवापर- आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे आहे.यामुळे आपला देश प्रगती देखील करीत आहे.पण दुसरीकडे ,ह्या गोष्टी वापरणारे मात्र विसराळू बनत चालले आहेत.स्मार्ट फोन ची गोष्ट तर बोलायलाच नको.अगदी लहान मुलांपासून सर्वच जण याच्या आहारी गेले आहेत.आणि आज जणू ते एक ‘व्यसन’ च बनले आहे.पण अतिवापर यामुळे मानवी मेंदू वर याचा विपरीत परिणाम होऊन, स्मृतीभ्रनश सारखे विकार जडलेले दिसत आहेत.
४) मानसिक ताण-तणाव – ताण-तणाव यापासून कोणाची सुटका नाही.पण ताणाची देखील एक पातळी असते.ती ओलांडली की ,आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात.शालेय जीवनातील मुले देखील वाढत्या स्पर्धांमुळे तणावग्रस्त आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर होत आहे.अभ्यासावर ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.आणि मग परीक्षेत देखील काही आठवेनासे होते.तरुणांचे देखील असेच काहीसे आहे.कॉर्पोरेट जगात वावरताना भयंकर ताण आहे.आणि ह्या सगळ्यात अनेक गोष्टी लक्षात राहत नाहीत.
५) भीती- आज ह्या विकाराला ‘ Anxiety’ असे संबोधले जाते आहे.प्रत्येक गोष्टीविषयी वाटणारी अवाजवी भीती माणसाला वर्तमानात जगू देत नाही.छोट्या छोट्या गोष्टींविषयी मनात एक प्रकारचा ‘फोबिया’ वाढत चालला आहे.आणि यामुळे स्मरणशक्तीवर याचा विपरीत परिणाम होत आहे.आत्मविश्वास कमी झाल्यामुळे ती व्यक्ती समाजात मिसळायला कुठेतरी घाबरत आहे.आणि ह्यामुळे ती अनेक गोष्टी विसरते.
६) जंक फूड अति सेवन / व्यसनाधीनता – आजकाल तरुणांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.शहरीकरणामुळे ,मॉल संस्कृती,फूड कॉर्नर यासारख्या गोष्टी वाढतच चालल्या आहेत.आणि तरुण पिढी याकडेच आकर्षित होताना दिसते.पण या पदार्थांमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीराला आवश्यक असणारे घटक, Vitamins यातून मिळत नाहीत.आणि यामुळे स्मरणशक्ती देखील खालावते.दुसरीकडे, अमली पद्धर्थांच्या सेवनामुळे देखील बुद्धी हळूहळू भ्रष्ट होते.आणि त्या व्यक्तीला कुठले भान राहत नाही.
ही काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे विसरायला होत आहे. म्हणून आपण सर्वांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.मानसिक-शारीरिक आरोग्य योग्य असेल तरच आपण आयुष्यात यश मिळवू शकतो.नाहीतर हळूहळू अधोगती च्या मार्गावर आपले आयुष्य जाऊ लागते.
म्हणून स्वतःची आणि आपल्या प्रिय जनांची काळजी घ्या.स्वतःला वरील उल्लेख केलेल्या गोष्टींपासून दूर ठेवा.म्हणजे आपोआप सर्व गोष्टी सुरळीत राहतील.
निसर्गाने, विधात्याने माणसाला ‘बुद्धी’ वरदान केली आहे.आणि हेच माणूसपणाचे शश्रेष्ठत्व आहे.याचा आदर करा आणि लाईफ मस्त एन्जॉय करा!!!
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
