Skip to content

रात्री बेडवर ‘तो’ तिला हवा तसा वापरून घ्यायचा !!!

रात्री बेडवर ‘तो’ तिला हवा तसा वापरून घ्यायचा !!!


संकेत कुलकर्णी

डोंबिवली


आज अखेर अनमिकेच लग्न लागलं. सगळ्या जास्त मनावर दडपण घेऊन जगणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहत होते. मोठ्या मुलीने केलेल्या कृत्यामुळे धाकट्या मुलीचे लग्न होईल का? सतत ह्या विचारामुळे मनात काहूर माजले होते, आज मात्र ते वादळ शमले होते. जावई हवा तसा मिळाला, मुलगी दिल्या घरी मुलींसारखीच नांदेल असा विश्वास सासरच्यांनी दिला,ह्याचा वेगळा आनंद होता. आई वडिलांना अजून काय अपेक्षित असणार.

बघता बघता बरेच महिने उलटले, मुलीचं सगळं आनंदात सुरू आहे हे पाहून आई वडिलांच्या आनंदाला पारवरच उरला नव्हता. अचानक दारावरची बेल वाजली. घडाळ्यात रात्रीचे सव्वा वाजले होते, एवढ्या रात्री कोण असेल…? असा विचार करत वडिलांनी दार उघडले. पाहतात तर काय..? केस विस्कटलेले, कपाळावर टेंगुळ, डोळ्याभोवती काळनिळ वर्तुळ,बोडका गळ्यावर नखांचे ओरखडे. खालच्या ओठाच्या डाव्या बाजूने रक्ताची धार घरंगळत हनुवटीवरुन साडीवर ओघळत होती. हातात एकच मोठी बॅग धरून विद्रुप अवस्थेत पाच महिन्यांची गरोदर अनामिका दारात उभी होती. पाहताच क्षणी क्षणभर वडिलांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तूर्तास भानावर येऊन वडिलांनी तिच्या हातातली बॅग आपल्या ताब्यात घेतली अनामिकेने घरचा उंबरठा ओलांडताच वडिलांना मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. रडण्याचा आवाज ऐकून तिची आई आतून बाहेर आली. तिला हि काही समजेना, अनमिकेला पाणी देऊन शांत बसवलं. काही अगतिग घडलंय हे जाणलं होत. पणं नक्की काय…? हे कळतं नव्हतं. आई वडिलांच्या मनात प्रश्नांचा भरीव डोंगर रचला होता.
“अनामिका शांत हो आणि सांग नक्की काय घडलं…”आई ने विचारत, तिच्या पाठीवर हात फिरवला. तितक्यात अनामिका जोरात किंचाळली. अनामिकेच्या पाठीवर पट्याचे वळ उमटले होते. ह्या वेळेला आई वडिलांना अश्रु अनावर झाले.

मनाचा हिय्या करत वडिलांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला….“बाळ अनामिका शांत हो…! आणि सांग काय झालं…”

अनामिकेने हुंदका देत सांगायला सुरुवात केली.तिचं अंग अजुनही थरथरत होत. माझा नवरा आतिशय संशयित आणि विकृत स्वभावाचा निघाला. लग्न झाल्यावर एक दोन महिने खूप सुंदर गेले.योग्य घरात माझं लग्न झालं असंच वाटतं होत.त्याच्या कामाअवाभी आम्ही तिसऱ्या महिन्यात हनिमूनला गेलो. तेंव्हाच झाली त्याची खरी ओळख पटली .माझे शारीरिक संबंध माझ्या दिरा सोबत आहेत असे गलिच्छ आरोप लावायला सुरुवात केली. माझ्या पोटात वाढणारा अंश देखील त्याचाच आहे हे ऐकवायला देखील कमी नाही केलं. माझा नवरा मला हवा तेवढा वेळ देत नसे.फक्त रात्री पुरताच माझ्या जवळ येयचा आणि वाटेल तस मला रात्र भर वापरून घेयचा.

मी नकार दिला किंवा त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही की, माझ्या उघड्या उटीपोटाला पूर्ण ताकदीनिशी बोटांनी आवळ्याचा. मी कळवळून त्याला सांगायची पणं त्याला त्यात आसुरी आनंद मिळायचा, माझ्या अंगाला कुठे हि आणि कसेही चावयचा. रात्रभर एखाद्या खेळण्यासारखं माझ्या सोबत खेळायचा. पाळीचे पाच दिवस सोडत नव्हता मी नक्कीच त्याला जवळ येऊ देणारं नाही म्हणून माझे हात पाय बांधायचा.माझा तो भाग सोडला तर अक्ख अंग ओरबाडून चावून आणि चाटुन काढायचा.तसाच तो त्रास सहन करत असह्य होऊन मी कित्येक वेळा समजवायची, त्याच्या डोळ्यांतून मगरीचे अश्रू ओघळायचे, हात जोडून माझे पाय धरून माफि मागायचा, इतका गोड बोलायचा, जणु त्याच्या मुखातून अमृतच बाहेर पडत असावं.नंतर अगदी प्रेमाने मला जवळ घेयचा,डोक्यावरून हात फिरवायचा, लाडाने गालगुच्चे घेयचा, त्यावेळी त्याच्या स्वभावात कुठेच हवस किंवा वासना दिसतं नव्हती. कुठल्याच प्रकारची जबरदस्ती करत नसे. एक दोन दिवस तसेच करायचा.मी त्याच्या मगरीच्याअश्रूंना आणि ववळूच्या स्वभावाला बळी पडायची.

त्यानंतर एक-दोन दिवस वाया गेले त्याच्या मते म्हणून, दुपारीच घरी येत असे.ती कसर पूर्ण भरून काढायचा. त्यानंतर माझी अक्षरशःदुसऱ्या दिवशी बेडवरून उठण्याची हि ताकद नसायची.संपूर्ण शरीर आखडून जाई. मी त्याच्यासाठी त्याची हवस भागवणारी एक जिवंत खेळणी आहे. आता हि इकडे येताना त्याने त्याची इच्छा भागवून घेतली. मी निघताना तो तसाच बेडवर आडवा पडून म्हणाला…, उद्या माझी इच्छा निर्माण झाली की, तु इकडे येशील का…? का, मी तिकडे येऊ…? हे सांगताना अनामिकेने आईचा हात इतका घट्ट पकडला होता. तिला सांगतानाही ते सहन होत नव्हतं. अंग जास्तच थरथरत होत.

दिवस भर माझं मन मी कामात कशीबशी गुंतवायची आणि जस जशी रात्र जवळ येत असे,तसे माझ्या पोटात भीतीचे गोळे वाढतंच जायचे. सासूला सांगण्यात काडीचा हि अर्थ नव्हता. तुला जे हवंय ते मिळतंय ना. मग माझ्या मुलाला जे हवंय ते दिल तर तुझं कुठं भिगडत. अशी उत्तर देयची.

हे सर्व ऐकत असताना, आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या मुलीने आज पर्यंत फक्त आपली खुशालीच कळवली. ह्या प्रकाराची भनक घरच्यांपर्यंत पोहचू दिली नाही. त्याची कारण विचारण्याची हि वेळ नव्हे. वडिलांनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तिला घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठलं……..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

22 thoughts on “रात्री बेडवर ‘तो’ तिला हवा तसा वापरून घ्यायचा !!!”

  1. माझा नवरा same असाच होता, फक्त उपभोगाची वस्तू म्हणून मला वापरायचा आणि झालं कि निघुन जा माझ्या आयुष्यातून अस बोलायचा दारू सकाळी उठल्यापासुन प्यायचा जॉब करत नव्हता दारू साठी पैसे मागायचा छळायचा मारायचा

  2. काही अंशी सत्य, थोडे कल्पक,
    सध्याच्या सुशिक्षित मुली एवढे अत्याचार सहन करूच शकत नाहीत. अरेंज मॅरेज असेल तर माहेरचा रस्ता धरतात. आणि जर घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लव मॅरेज केलेअसेल तर हॉस्टेल चा पर्याय निवडतात

  3. I Think, This person is really a pscyco. May be he seen some Pron CDs/ Bfs on internet. Its fact.

  4. prabhakar ganapa

    असा घडू नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा हवा.

  5. असे भडक लेख प्रसिद्ध करून आपणास काय संदेश द्यायचा आहे, तुम्ही समाज मन बिघडविण्यास असे लेखच कारणीभुत ठरतात. खरं तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे.

  6. प्रतात

    लेख छान आहे
    काहीही अतिशयोक्ती नाही.
    अशी प्रकरणं खुप आहेत मुली आई बापाच्या इज्जतीपोटी सहन करतात

  7. He should be under psychiatric treatment. Typical case of Psychosexual problem along with paranoid schizophrenia.

  8. किती विचीत्र आसतात काही माणस साधी सरळ सोपी दिसणारी व्य क ती नवीन माणसे कोणावरअवलंबून राहता येत नाही याने फक्तं तिचा उपयोग करून घेतला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो खुप चुकला

  9. अशा नराधमांना ईलेक्टरीक शाँक देऊन मारलं पाहिजे

  10. Asha lokana psyctric treatment chi graj ahe.. Ha he ek psyctric problem ahe.. n mulini hi ashy gosti lapvun n thevta tabdtob ya wrti decision ghene grjeche ahe..

  11. खरोखरच चिड आणणारा प्रकार आहे …विवाह म्हणजे
    पूरूषांना बलात्कार करण्यासाठी दिलेला परवानाच आहे की काय……मूलींनाच धीट बनवले पाहिजे..

  12. लेख चांगला वाटत असला तरी, हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे त्यावर लेखकाने प्रकाश टाकला ऐवढेच

  13. सुजाता

    ही आवास्तविकता नाही असे पण असते समाजात. अशा मुली आहेत अजून पण. समाजाचे बंधन, मनाची भीती, संस्कार, आत्मविश्वास नसणे, अशा प्रसंगाची कधीच तोंड ओळख नसणे, आई वडिलांबरोबर अशा गप्पा मनमोकळे पणाने न मारणे अशी अनंत कारणे आहेत.ती चा दोष आहे असे नाही…
    तिला हिम्मत द्यायला हवी… यातून आपण मात्र एक शिकयला हवे की मुलीशी मुलाशी अशा गप्पा मनमोकळेपणाने मारल्या पाहिजे

  14. First reply 28 nov 12.25 ला reply द्यावासा वाटतो की, अशी ही माणसे समाजात आहेत नक्की च. या ठिकाणी तीने आपल्या आईवडिलांना तरी सांगितले परंतु काही स्रिया हे मरेपर्यंत सहन करत असतात. हे वास्तविक सत्य आहे.

  15. हा लेख मानसशास्त्रात किती मोडतो हे मला नक्की सांगता येणार नसले तरी हा लेख एक कथा म्हणून नक्कीच म्हणता येईल..
    म्हणजे वास्तवाशी बऱ्याच अंशी फारकत घेतलेला आणि अतिरंजकतेकडे धावणारा हा लेख म्हणता येईल..
    मुलगी अशिक्षित नाही.. आणि माहेरचा पाठींबा पण अतिशय चांगला आहे असे लेखातून जाणवते.. अशी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती एवढा अनाचार एवढा अधिक काळ सहन करेल असे वास्तविक पातळीवर पटत नाही.. आणि एवढ्या अल्पकाळात मुलीवर होणारा व्यभिचाराचा आरोप तर सहन करण्या पलिकडे आहे.. म्हणजेच विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे..
    अशा परिस्थितीत मुलगी अशी अवस्था होईपर्यंत पतीजवळ राहील हे अवास्तविक वाटते.. असो..

  16. भेदक , भयानक वास्तव दर्शवणारे लिखाण आहे . अशा पुरुषांचे लांडग्यात रूपांतरण करण्यात आणि प्रोत्साहन देण्यात घरच्या लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो ……

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!