आयुष्य आणि नातेसंबंधाबद्दलची ही ७ कटू सत्ये आपल्याला स्वीकारावीच लागतात.
आयुष्य हे खूप सुंदर आहे.पण तरी देखील आयुष्याबद्दलच्या काही वास्तव गोष्टी आपण स्वीकारत नाही.आणि मग आयुष्याबद्दल ,नात्यांबद्दल तक्रार करीत बसतो.तर पाहुयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आता आपण स्वीकारणे गरजेचे आहे.ह्या गोष्टी आपल्याला कटू वाटतील पण सत्य स्वीकारणे अपरिहार्य आहे.कारण एका शांतीमय आयुष्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी,यशस्वी होण्यासाठी हे स्वीकारणे गरजेचे आहे.
१) प्रत्येक व्यक्तीला आपण आवडू शकत नाही –
तुम्हाला आयुष्यात काही व्यक्ती खूप प्रिय असतात.मग नाते कोणतेही असेल.तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करतात.नेहमी त्यांची काळजी घेतात.त्यांच्यासाठी नेहमी हजर असतात.पण तशीच वागणूक त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नाही.मग तुम्ही दुःखी होतात आणि विचार करू लागतात की ,’मी इतके करूनही असे का..?’ .पण नात्यांचे वास्तव वेगळे असते.जे तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही आवडणारच असे होत नसते.आणि हे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितके आपल्यासाठी चांगले असते.
२) आपला आनंद आपल्याच हाती असतो –
अनेकदा माणूस स्वतःच्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हाती देतो.म्हणजे, त्याने माझ्यासाठी हे केले तर मी खुश होईल, मला बरे वाटेल वगैरे वगैरे.पण अशी अपेक्षा ठेवणे वास्तवाला धरून नसते.आपला आनंद आपणच निर्माण करायचा असतो.स्वतःच्या कष्टातून,कामातून, स्वकर्तुत्वाने तो निर्माण होत असतो.आणि हेच प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे.
३) कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत कायम नसते –
आयुष्यात तुम्ही कित्येक नाती कमावता,जपता. घट्ट ऋणानुबंध तयार होतात.पण तरी देखील हा ‘बॉण्ड’ कायमचा कधीच नसतो.प्रत्येकाला ‘एक्सपायरी डेट’ असते.कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यक्ती तुमच्यापासून कायमच्या दुरावतात.कितीही दुःख करून घेतले तरी ती व्यक्ती परत कधीच येत नाही.आणि हेच आपल्याला स्वीकारायचे आहे ,जरी हे कितीही वेदनादायी, कटू वाटत असेल तरी देखील.
४)अतिपरिश्रम यशाची खात्री देत नाहीत :
कर्मांयेवाधिकारस्ते मा फलेशुकदाचन – तुम्ही आयुष्यात आपर कष्ट करतात.यश ,पैसे,प्रसिद्धी मिळविण्यासाठी ,किंबहुना नाते टिकविण्यासाठी देखील.पण तरी देखील यश मिळत नाही.आणि हेच आयुष्याचे कटू सत्य आहे.म्हणून श्रीकृष्ण सांगतात,’कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नका’.माणूस ह्याच समस्येने ग्रासलेला असतो की ,मी किती कष्ट केले तरी देखील यश कसे बरे मिळाले नाही.पण आयुष्य हे असे आहे, कर्म,नशीब ह्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी असतातच.आणि त्याचा पूर्ण हिशोब ठेवला गेलेला असतो.
५) अपेक्षा दुःख देतात –
अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही.पण ती फक्त स्वतःकडूनच ठेवावी.जगाकडून ठेवाल तर नेहमी दुःखताच राहाल.नात्यांमध्ये, मित्रांमध्ये,सहकाऱ्यांमध्ये कळत-नकळत अपेक्षा ठेवली जाते.आणि स्वतः काहीही न बोलता समोरच्याने माझ्यासाठी सारं काही करावं असे आपण गृहीत धरून त्या नात्यात जगत असतो.पण होते उलटेच.तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि उरते ते फक्त दुःख आणि दुःखच.म्हणून हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे ,सुखी राहण्यासाठी.
६) प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे –
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’.प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.वेगळी मते,आवड-निवड वेगळी असते.तुम्हाला जे आवडेल तेच दुसऱ्याला आवडेल असे नसते.तुमचे जे मत असेल एखाद्या गोष्टीबद्दल,व्यक्तीबद्दल तेच दुसऱ्याचे असेल असे कदापि होत नाही.पण जवळच्या व्यक्तींना आपण गृहीत धरतो आणि असे वागतो की ,’मला जसे वाटत आहे,आवडत आहे तसेच दुसऱ्या व्यक्तीला देखील आवडत आहे.आणि आपल्या आवडी-निवडी दुसऱ्यावर अनेकदा लादल्या जातात.आणि परिणाम मात्र तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत.म्हणून हे सत्य स्वीकार की, ‘प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे’.
७) अहंकार आयुष्याला लागलेली कीड आहे –
स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये माणसे खूप गल्लत करीत आहेत आजकाल.मीच का करू, मीच का मागे घेऊ,मीच का आधी बोलू.असे छोटे मोठे अहंकार माणसे आयुष्यभर घेऊन बसतात आणि अनेक नाती गमावतात.समजूतदारपणा दाखविणे म्हणजे कमी पणाचे असे अनेक जणांना वाटते.कोणाकडे स्वतःहून जाणे म्हणजे त्याची ‘हाजी हाजी’ करणे असाही काही जणांचा दृष्टिकोन असतो. आणि ह्या सगळ्या वागणुकीला ‘अहंकार’ न समजता ‘स्वाभिमान’ समजण्याची चूक अनेक माणसे करतात.ही किड समाजात दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे.वेळीच हे लक्षात घ्या आणि चांगल्या गोष्टीची स्वतःपासून सुरवात करा.
ह्या काही कटू गोष्टी स्वीकारणे गरजेचे आहे.अन्यथा एक सुंदर आयुष्य,एखादे सुंदर नाते आपण हरवून बसू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
