प्रत्येक आव्हानांना तोंड देऊन पुन्हा पुन्हा उठून उभे राहणे हा स्त्रीचा ‘उपजत’ गुणच जणू…
सभोवतालच्या परिस्थितीनुसार ,व्यक्तीनुसार ,काळानुसार स्वतःला सतत बदलत ठेवणारी व्यक्ती म्हणजे ‘स्त्री’.ही फक्त व्यक्ती नव्हे तर एक ‘शक्ती’ च आहे. निसर्गाने ‘स्त्री’ ची घडवणूक च अशी केली आहे की ती स्वतःला नेहमी Flexible ठेवते.जिथे जाईल तिथे तिथली च होऊन जाते.संयम,प्रेम करण्याची ताकद,समर्पण,सहनशीलता,Multitasking हे उपजत गुण तिला शक्ती प्राप्त करून देतात.प्रत्येक स्त्री मध्ये हे गुण असतातच.फक्त हे गुण बहरणे हे मात्र कित्येकदा जगावर देखील अवलंबून असते.पण तरी देखील ती पुन्हा पुन्हा उठून उभे राहत असते.
तसं पाहायला गेलं तर आजही आपला देश ‘पितृसत्ताक, पुरुषसत्ताक’ च आहे. पण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहे.स्त्री सुशिक्षित होत आहे आणि स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाला देखील सुशिक्षित करीत आहे.घर सांभाळून नोकरी,व्यवसाय देखील करीत आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे.बाहेरून काम करून आल्यानंतर देखील ती पुन्हा घरात कामावरच रुजू होते.अशी ही नरी..विविध गुणांनी भरलेली.
स्त्री देखील एक माणूस च आहेत.तिला देखील दोनच हॅट आहेत.पण त्याच दोन्ही हातांनी ती दहा कामे करते तेही एकाच वेळी.हे देखील उपजत च गुण आहेत.पूर्वी च्या काळी स्त्रिया घराबाहेर पडत नसत.’चूल-मूल’ एवढेच काय ते तिचे विश्व. पण तेव्हा देखील ती घरातील सर्व जबाबदाऱ्या अगदी हसत हसत सांभाळत असे.तेव्हा तर खूप आव्हाने होती तिच्या समोर.घरातील सर्वांची मर्जी सांभाळून,घरातील व्यक्तींना त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत ती स्वतःचे आयुष्य जगत असे.
असे म्हणतात,मुली,स्त्रिया लगेच रडतात.’रडूबाई’ असतात.हो असतात स्त्रिया अशा. पण फक्त रडत बसत नाहीत.रात्रभर रडतील,पण सकाळी पुन्हा जबाबदाऱ्या पूर्ण करायला उठून उभ्या राहतील.अशा असतात स्त्रिया.कितीही संकटे येवोत,आव्हाने येवोत ह्या मागे हटणार नाहीत.परिस्थिती देखील स्त्री ची परीक्षा सतत घेत असतो.पण मागे हटेल ती ‘बाई’ कसली…
काही काही वेळेस काही स्त्री तक्रार करीत असतात.आम्हीच का सोसायचे,आम्हीच का सहन करायचे.स्त्री आहे म्हणून असे का…वगैरे…पण जर का प्रत्येक स्त्री वर उल्लेख केलेल्या आपल्या ‘उपजत’ गुणांवर लक्ष केंद्रित केले तर ते गुण तिची ताकद नेहमीच बनून राहतील.त्यामुळे स्त्रियांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेत अडकायला लागलात की स्वतःच्या उपजत गुणांवर लक्ष केंद्रित करा तेच गुण तुम्हाला शक्ती प्राप्त करुन देतील.
स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.असे म्हणतात ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’.अगदी खरे.स्त्री तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला सदैव पाठिंबा देत असते.त्याला मदत करत असते.त्याची साथ देत असते.तिच्यातील ‘समर्पण’ ‘Dedication’ हा उपजत गुण तिला हे करण्यास प्रोत्साहन देते.
स्त्री चे वय विचारू नये असे म्हणतात.का तर ती स्वतःसाठी कधी जगत नाही.सदैव वडील,भाऊ,नवरा यांच्यासाठी ती जगत असते.कार्यालयीन जीवनात देखील अनेक आव्हाने ती झेलत असते.कामाचा व्याप,स्वाभिमान जपणे, स्त्री आदर याविषयी देखील आजही तिला प्रचंड आव्हाने आहेत.पण ती ह्या सगळ्यामधून स्वतःला कणखर बनवते आणि यश मिळविते.
असे म्हणतात की पुरुष एकटा जगू शकत नाही.पण स्त्री च्या वाट्याला कोणत्याही कारणाने एकटेपण आले तरी ती एकटी आयुष्य काढू शकते.घरातील कर्ता पुरुष नसेल तर ती स्वतः त्या घरातील ‘कर्ता’ बनते.चूल-मूल संभाळत घरातील सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ती हसत हसत झेलते. अशी ही स्त्री…विविध अंगी…विविध रंगी..
पूर्वी स्त्रियांवर अनेक अन्याय होत असत.आजही होतच आहेत,फक्त काहीसे स्वरूप बदलले असेल.पण तरी देखील आजची स्त्री अन्याविरुद्ध आवाज उठवते आहे.काही स्त्रिया आजही शांत बसतात.पण त्या स्त्रियांनी देखील लढले पाहिजे.जिथे चुकीचे काही घडत असेल तिथे आवाज उठवायला हवा.स्वतःसाठी…स्वतःच्या आत्मसन्मानासाठी.नाहीतर हे जग तिचा फक्त वापर करेल..तिला नेहमी गृहीत धरेल.म्हणून थांबू नका.लढत राहा,संघर्ष करीत राहा.जिंकणार तुम्हीच आहात. कारण तुम्ही एक ‘आदिशक्ती’ आहात.
स्त्री एका वेळेस अनेक गोष्टी करू शकते.फक्त तिला हवे असतात ‘पाठिंबा देणारे हात’,’आदर करणारे कुटुंब’,’सन्मान करणारे मित्र,सहकारी’ आणि कौतुक ,प्रेम करणारा ‘जोडीदार’. जसा पुरुष स्त्री शिवाय अपूर्ण आहे.तशीच स्त्री देखील पुरूषाशिवाय अपूर्णच असते.म्हणून स्त्री-पुरुष दोघांनी एकमेकांना कायम साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला पाहिजे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
