Skip to content

‘मला कोणाची गरज नाही’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाच खरे तर कोणाच्यातरी आधाराची खूप गरज असते.

‘मला कोणाची गरज नाही’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाच खरे तर कोणाच्यातरी आधाराची खूप गरज असते.


प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते.पण आयुष्य जगत असताना,प्रत्येक व्यक्तीला समाजातील कोणत्या ना कोणत्या घटकाची, माणसाची गरज ही लागतेच.मग ते नाते कोणतेही असो.माणूस एकटा काहीच करू शकत नाही.आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीची गरज ही लागतेच.त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

आत्मनिर्भर असणे खूप चांगले. पण आयुष्यभर आपण कोणत्याच व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय जगूच शकत नाही.आणि म्हणून तर ही रक्ताची आणि बिनरक्ताची नाती आपणच तयार केलेली आहेत.काही व्यक्ती अशा देखील असतात, ज्यांना असे वाटत असते की, ‘मला कोणाचीच गरज नाही,मी माझे सर्व काही करायला खंबीर आहे’.आणि असे ती व्यक्ती वारंवार इतरांसमोर म्हणत असते.पण वास्तव वेगळेच असते.

काही व्यक्ती खूप अहंकारी असतात.काही स्वतःमध्येच रामणाऱ्या असतात.काही व्यक्ती आत्मकेंद्रित असतात.तर काही व्यक्ती खूप स्वार्थी देखील असतात.ह्या सर्व व्यक्तींचा एकच दृष्टिकोन असतो.तो म्हणजे,’मला कोणाची गरज नाही’.पण खरे तर ह्या व्यक्तींना देखील दुसऱ्या व्यक्तीची नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गरज लागत असते,मदत लागत असते.पण ती मदत घ्यायला , त्यांचा स्वभाव आणि हा दृष्टिकोन आड येतो.आणि ते ह्या दिमाखात राहतात की ,’मला कोणी नको’.

अशा व्यक्ती नकरात्मक असतात असे नाही.पण ते बदलायला तयार नसतात.पण आतून त्या खूप एकट्या पडलेल्या असतात.भावनिक झालेल्या असतात.सतत राग त्यांच्या मनात घोळत असतो.पण ते हे सगळे व्यक्त करू शकत नाहीत.आणि मग रागाने तर कधी अहंकाराने ते बोलून जातात की ,’मला कोणाची गरज नाही’.

ह्या मानसिकतेमागे विविध कारणे असू शकतात.जसे की, भूतकाळात आलेले अनुभव, विश्वासघात, फसवणूक,प्रेमभंग, ,जवळच्या व्यक्तीने साथ सोडणे इत्यादी.ह्या काही गोष्टींमुळे देखील ह्या व्यक्तीनची ही मानसिकता झालेली असते.पण खरे तर यांना कोणाच्या तरी आधाराची, पाठिंब्याची आवश्यकता ही असतेच.पण ती ते स्वीकारण्यासाठी,मागण्यासाठी पुढे यायला घाबरत असतात,संकोच करीत असतात.तर कधी त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्ण विश्वास वाटत नसतो.आणि म्हणून ते हुआ सर्व गोष्टीत न पडता, ‘मला कोणाची गरज नाही’ असा दृष्टिकोन ठेवून मोकळे होतात.

व्यक्ती कशी ही असो ती समाजशिवाय राहू शकत नाही.प्रत्येक व्यक्तीला आधार हा हवाच असतो.कोणीतरी असं असावं की त्याला सर्व काही सांगता येईल,त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.असे प्रत्येकाला वाटत असते.पण आजच्या जगात अनेकांना अत्यंत वाईट अनुभव येऊन गेलेले आहेत.आणि त्यामुळे व्यक्ती आत्मकेंद्रित बनत चाललेल्या आहेत.

‘मला कोणाची गरज नाही’ ,’कोणाचं कोणावाचून काही अडत नाही’ असे आपण पटकन बोलून जातो. पण बोलणे जरी सोपे असले तरी अमबलबजावणी करणे तसे अवघड आहे.कारण ,माणूस स्वयंपूर्ण कधीच नसतो.प्रत्येकामध्ये काही ना काही कमी,त्रुटी असतात.आणि त्या भरून काढण्यासाठी कोणाचीतरी गरज ही लागतेच.

प्रत्येकाला इतर माणसांची गरज असतेच.पण काही कारणास्तव हवी तशी साथ मिळत नाही.जसे की, एकतर्फी प्रेम, एकतर्फी मैत्री,नाते यामुळे दुसरी व्यक्ती हवी तशी साथ देऊ शकत नाही.आणि म्हणून मग अशी मानसिकता होऊ शकते.

तुमच्या आसपास देखील अशा व्यक्ती असतील.किंवा तुम्हाला देखील असे वाटत असेल कधीतरी.अशा वेळी त्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या रुपात एक ‘आधार’ देता यायला हवा.प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे देखील आपण एखाद्याला साथ ही देऊ शकतो.

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “‘मला कोणाची गरज नाही’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाच खरे तर कोणाच्यातरी आधाराची खूप गरज असते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!