Skip to content

तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या ‘नाही’ न म्हणण्याने निर्माण झालेल्या असतात.

तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या ‘नाही’ न म्हणण्याने निर्माण झालेल्या असतात.


आयुष्यात ना अनेकदा आपल्याला ‘नाही’ म्हणायचे असते पण कित्येकदा ते म्हणले जात नाही.नाही कसे म्हणायचे? नाही म्हणायला मन धजवत नाही कित्येकांचे.मग काय, नाही म्हणायचे राहून जाते.पण याचा परिणाम मात्र आपल्याला च भोगावा लागतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही निर्णय हे घ्यावे लागतात.योग्य असो वा अयोग्य ,निर्णय घेणे महत्वाचे ठरते.कधी कधी ‘नाही’ म्हणायचे असते.पण नाती जपण्यासाठी तर कधी कोणी आपल्यामुळे दुखावू नये ,कोणाला वाईट वाटू नये तर कधी समोरच्या व्यक्तीचा आदर,प्रेम म्हणून ‘नाही’ म्हणले जात नाही.मात्र शेवटी ह्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात.

सुमन खूप हुशार मुलगी.नोकरी करीत होती.धाडसी,देखणी तरुणी.लग्नाचे वय झालेच होते.वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाचेच स्थळ जणू जमवूनच ठेवले होते. सुमन माझ्या शब्दाच्या बाहेर नाही,यावर त्यांचा खूप विश्वास होता.त्यामुळे त्यांनी घरात सर्वांकडे ही गोष्ट बोलून दाखविली.सुमन वडिलांचा आदर तर करीत होतीच पण त्यांच्या शब्दाबाहेर नव्हती.मात्र लग्नाच्या बाबतीत थोडे वेगळे होते.मुलगा तिला आवडत नव्हता असे नाही.पण ती त्याला त्याचा फक्त मित्र मानत होती आणि तिला ही मैत्री लग्नापर्यंत कधीच न्यायची नव्हती.पण वडिलांना ‘नाही’ कसे म्हणणार.

मुलगा, विवेक देखील खूप समजूतदार होता.त्याने सुमन ला एकांतात विचारले देखील ,”सुमन ,तू लग्नाला तयार आहेस ना? जे असेल ते स्पष्टपणे बोल.सुमन बोलू लागली.”विवेक, मी स्पष्टपणे सांगते,मी तुला माझा मित्र मानते,तू कायम माझा मित्र असणारच आहे.पण मला तुझ्यात माझा जीवनसाथी नाही दिसत आहे.तुला दुखवायचे नाही मला.पण स्पष्टपणे सांगते विवेक, मी ह्या लग्नाला नाही तयार.”

“बाबांना अजून काही बोलले नाही.मन धजवत नाही.पण तुला जे आहे ते सांगितले.”
“थँक्स सुमन,तू इतकं खरे बोललीस.नाहीतर पुढे जाऊन अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या.मग आपण काहीच करू शकलो नसतो.फक्त आता तू तुझे हे मत घरात सर्वांना शांतपणे,स्पष्टपणे सांग ,म्हणजे तुझ्या मनात कोणताच गुंता राहणार नाही.”

सुमन ला विवेक चे म्हणणे पटले.ती घरात हे बोलली देखील.बाबा नाराज झाले. पण त्यांना तिची बाजू पटली.आणि त्यांनी सुमन चे म्हणणे ऐकले.आणि पुढच्या सर्व समस्या टाळल्या गेल्या.

जर सुमन ‘नाही’ म्हटली नसती तर तिचे आयुष्य खूप दुःखात गेले असते.ती कधीच समाधानी आयुष्य जगली नसती.लग्न ही तर आयुष्यातील खूप मोठी गोष्ट.लग्नाचा निर्णय घेणे ही देखील आयुष्य बदलून टाकणारी बाब आहे.आणि हा निर्णय घेताना सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवून निर्णय घेणे हिताचे ठरते.

सुमन च्या उदाहरणातुन ‘नाही’ म्हणणे किती महत्वाचे ठरते हे आपल्याला दिसून येईल.आयुष्यात तुम्ही देखील कित्येकदा ‘नाही’ म्हणु शकले नसाल.आणि त्यामुळे अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागले असेल.ह्याच अनुभवातून शिकणे गरजेचे आहे.थोडा वेक,समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते,दुःख होऊ शकते,राग येऊ शकतो.पण आपली बाजू वेळीच स्पष्ट केली की कोणतेच Confusion राहत नाही.

कधी कधी काही जण ‘हो’ देखील म्हणत नाहीत आणि ‘नाही’ देखील म्हणत नाहीत.स्वतःचा थोडा वेळ देऊन ह्यातील काहीतरी एक निवडणे अपरिहार्य असते.त्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.कधी कधी खूप कठीण असते हे सगळे, पण त्या व्यक्तीच्या आणि स्वतःच्या देखील भल्यासाठी हे करणे गरजेचे असते.

आयुष्यात आपण सर्वांना एकावेळी खुश नाही ठेवू शकत.जेव्हा कधी आयुष्यात तुमच्यावर ‘नाही’ म्हणण्याची वेळ येईल, मग कारण काहीही असो,ते म्हणता आले पाहिजे.फक्त त्या एका गोष्टीने आपले आयुष्य नाही ना बनत? कित्येक निर्णय हे मनावर दगड ठेवून घ्यावे लागतात.

आयुष्यात तुम्हाला सुद्धा कोणाकडून ‘नाही’ ऐकावे लागले असेल किंवा येथुन पुढे ऐकावे लागेल देखील.तेव्हा ते ‘नाही’ स्वीकारण्याची देखील तयारी कायम ठेवा.कारण जशी तुम्हाला तुमची मत आहेत तशीच ती दुसऱ्या व्यक्तीला देखील आहेत हे समजुन घेतले पाहिजे.

‘नाही’ म्हणणे म्हणजे अपमान करणे, मान न ठेवणे ,आदर न ठेवणे असे अजिबात नाही.उलट स्वतःचे ठाम मत,निर्णय सांगणे होय.आणि जेव्हा आपण हा ठामपणा अंगी बाणतो तेव्हाच आपण खरे आयुष्य जगत असतो.नाहीतर व्हावत गेलो तर आयुष्या कधीच गावसणार नाही.

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!