Skip to content

नातं कायम आणि शेवटपर्यंत निभावायला फक्त भावनिक नाही तर एक कणखर मन लागतं.

नातं कायम आणि शेवटपर्यंत निभावायला फक्त भावनिक नाही तर एक कणखर मन लागतं.


‘नाते आपुले जन्माचे, शतकाचे, विश्वासाचे आणि आनंदाचे’ हे गाणे आपण कोणत्यातरी जाहिरातीत ऐकले असेल..नात्यांवर भाष्य करणारे हे गाणे. वास्तव जीवनात अगदी लागू पडते.आजकाल नाती ‘Use & Throw’ झाली आहेत.पक्के नाते, कायमचे नाते या काही गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत.एक निभावतोय पण दुसरा नाही.म्हणजे दूतर्फी नातेच तुटत चालले आहे.हेच आसपास पाहून ,मनात हा लेख लिहिण्याचा विचार आला.खरेच, ‘नात निभावायला एक कणखर व्यक्तिमत्वच आज गरजेचे आहे’.कुण्या कमकुवत मनाचे हे काम नाही.

नाती भावनांनी तयार होतात.मग ते नाते कोणतेही असो, भावना असतील तर च त्या नात्यात एक प्रकारचा जीव येतो.पण फक्त भावनिक असून देखील चालत नाही.ते नाते कायम टिकविण्यासाठी ‘ Efforts’ घ्यावे लागतात आणि ते घेण्याची दोन्हीकडून तयारी लागते.आणि हे तेव्हाच घडू शकते जेव्हा त्या माणसाचे मन कणखर असते.

नात्यांमध्ये फक्त भावनांना पाहिले तर मग ते नाते पूर्णपणे जगता येत नाही.त्यामुळे भावनांबरोबर एकमेकांना प्रत्येकवेळी साथ देण्याची मानसिकता असणे खूप महत्वाचे ठरते.आणि ही मानसिकता तेंव्हाच तयार होते जेव्हा मन मोठे असते,शांत,स्थिर असते.

नात्यांमध्ये प्रत्येक जण स्वतंत्र असतो.मते, विचार वेगवेगळे असतात.पण तरी देखील एकमेकांचा आदर ठेवत हे नाते जपणे गरजेचे असते.आणि आजकाल माणसांना हेच जमत नाही.जो तो आपलाच अहंकार जवळ करतो आणि माणसांना सतत लांब ठेवतो.त्याने माझेच ऐकले पाहिजे, मी म्हणते तसेच केले पाहिजे असा अट्टहास घेऊन माणसे बसतात.ह्या नकारात्मक भावना नाती संपवून टाकतात.

परिस्थिती नेहमीच सारखी नसते.मग अशा वेळीच नात्यांचा कस लागतो.अडचणीत अनेकजण एकमेकांची साथ सोडतात.पण खरी गरज तर अडचणीतच असते.त्याक्षणी समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला एकदा ठेवून पाहणे आवश्यक असते.आणि हे तेव्हाच करता येते जेव्हा मन खंबीर असते.संकटांना तोंड देण्यासाठी सदैव तयार असते.

आजकाल कोणीच आपली बाजू मागे घ्यायला तयार नाही.मी का बोलू, जाऊ दे ,नंतर बोलता येईल,नंतर भेटता येईल.असे बोलून व्यक्ती व्यक्तीपासून दुरावत जातो.मी तर म्हणेन, जेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो ,की ,मी ह्या व्यक्तीशी बोलले पाहिजे, तर तुम्ही त्याक्षणी लगेच त्या व्यक्तीशी बोलले पाहिजे.अशाने नाती सदृढ होतात.

विश्वास आणि पारदर्शकता ह्या दोन गोष्टी कोणत्याही नात्यात खूप मोलाच्या ठरतात.जेव्हा तुम्ही कोणत्याही नात्यात असतात तेव्हा खरे बोलणे, जे काही आहे ते स्पष्ट सांगणे खूप महत्वाचे ठरते आणि ह्या दोन गोष्टींवर च नाती अवलंबून असतात.ज्या नात्यात विश्वास नसतो ,पारदर्शकता नसते तिथे भावना असून देखील काहीच उपयोग होत नाही.मग शेवटी दुःख आणि नाते दुरावणे ह्या गोष्टी हाती लागतात.

क्रोध, राग ह्या गोष्टी नाते संपवून टाकतात. राग व्यक्त करणे गरजेचे असते ,पण योग्य वेळीच.काही वेळेस राग नियंत्रित करणे अपरिहार्य असते.कारण त्या रागापेक्षा नाते महत्वाचे असते.पण हे तेव्हाच घडेल जेव्हा, मन भक्कम असेल.म्हणून नात्यात फक्त भावनिक राहू नका तर मजबूत राहा.तेव्हाच खरी नाती निर्माण होतील.

जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे काही तरी चुकत असेल तर ते त्याला सांगणे देखील गरजेचे असते.तसेच त्या व्यक्तीला चुकीच्या रस्त्यावरुन बरोबर रस्त्यावर आणणे देखील गरजेचे असते.हे तुम्ही तेव्हाच करू शकतात जेव्हा तुम्हाला मनापासून त्या व्यक्तीबरोबर नाते निभावायचे असते.

कोणतेही नाते कायम टिकून राहण्यासाठी दोन्ही कडून प्रयत्न असणे, दोन्ही कडून ते नाते टिकविण्याची तयारी असणे गरजेचे असते.आणि ते असेल तरच नाते कायम राहते.माणूस समूहात राहतो.त्याला दुसऱ्या माणसाची गरज असते.आणि हीच जाण आज प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि तसे जीवन जगले पाहिजे.

 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!