Skip to content

कर्ता करविता ‘तो’ आहे त्याला त्याचं काम करू द्या आणि तुम्ही फक्त तुमचा ‘रोल’ सांभाळा .

कर्ता करविता ‘तो’ आहे त्याला त्याचं काम करू द्या आणि तुम्ही फक्त तुमचा ‘रोल’ सांभाळा .


‘खुदा बनने की कोशीश मत कर, तू बस अपना किरदार निभा’.हाच विषय आहे आपला आजचा.’देव, ईश्वर, विधाता,निसर्ग,परमात्मा’ अशी किती तरी नावे आहेत जी आपण आपल्या रोजच्या बोली भाषेत वापरतो.’तो’, त्यानेच सर्व काही निर्माण केले आहे, आपण त्याच्या मुळेच ह्या जगात आहोत.म्हणूनच तोच कर्ता आहे, तोच करविता आहे.सर्व काही त्याच्या हातात आहे.

पण आज मनुष्य त्याची जागा घेऊ पाहत आहे.जे की कधीच शक्य नाही.माणसाचे काम आहे ‘,प्रयत्न’ करणे ना की ‘न्याय’ करणे.’न्याय’ फक्त त्याच्या दारी आहे. कारण, कर्ता करविता ‘तो’ आहे. त्याला त्याचं काम करू द्या आणि तुम्ही फक्त तुमचा ‘रोल’ सांभाळा .

पण आज माणूस स्वतःच्या हव्यासापोटी, रोज पळत आहे, त्याच्याकडे कोणत्या गोष्टी साठी संयमच उरलेला नाही.’मला हे पाहिजे, मला हे मिळणारच, मी हे असं ठरविलं आहे , हे हे असंच होणार’ अशी काहीशी मानसिकता आज आपल्याला पाहायला मिळत आहे.पण हे असेच कधीच घडत नाही.घडताना दिसत नाही.कारण, विधात्याच्या मनात असेल तर आणि तरच तुम्हाला ती गोष्ट मिळते, अन्यथा तुम्ही किती अट्टाहास केला तरी ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही.

आपला आजचा हा विषय, तुम्हाला थोडा अध्यात्मिक वाटेल.पण आध्यात्म आणि माणसाची मानसिकता याचीच सांगड तुम्हाला ह्या लेखात वाचायला मिळेल.आयुष्यात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,आध्यात्म आणि व्यवहार-माणसाची वृत्ती,वागणे. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, आरोग्य,नातेसंबंध प्रत्येक गोष्टीत यश मिळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे असते.त्यात Efforts घालणे महत्वाचे असते.पण इतके करूनही एखादी गोष्ट साध्य होत नाही.तेव्हा माणूस चिडतो, संतापतो,नैराश्यात जातो.पण ह्यात एक गोष्ट दडलेली असते.ती म्हणजे ,’ईश्वराची मर्जी’.जिथे त्याची मर्जी नसते, तिथे काहीही होऊ शकत नाही.मग तुम्ही कितीही अट्टाहास केला तरी देखील.

हेच वास्तव आपण आज सगळ्यांनी स्वीकारणे गरजेचे आहे.काही जण निरपेक्ष वृत्ती ठेवतात देखील.पण काही जण आज आपल्याला असेही पाहायला मिळतील.जे स्वतःच देव बनण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्व काही माझ्याच हाती आहे.मी कधीही काहीही करू शकतो,ही भावना सदैव त्यांच्या मध्ये असते.पण हे योग्य नाही.

विधात्याला कोणीच हरवू शकत नाही.ज्याने घडी बसवली आहे, त्यालाच तुम्ही कसे आव्हान देऊ शकता ? पण माणसामधील अहंकार त्याला हे सत्य स्वीकारू देत नाही.तो स्वतःच्याच धुंदीत, ह्या ना त्या मार्गाने आपला रस्ता धुंडाळत राहतो.पण शेवटी तेच होते, जे विधात्याच्या मनात असते.

म्हणूनच सांगावेसे वाटते, तुम्ही फक्त तुमचे सर्वोत्तम द्या.स्वतःशी प्रामाणिक राहा.इतरांशी आदराने वागा. जे तुमचे नाही, त्याच्या मागे पळत वेळ वाया घालवू नका.आवडणारी प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाला मिळत गेली असती तर परमात्म्याची गरजच उरली नसती. पण ‘तो’ नसेल तर आपण देखील नसू, हे विसरून चालणार नाही.

तुम्ही प्रार्थना करता, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवाकडे याचना करीत असतात, इच्छा बोलून दाखवीत असतात.पण सर्वच प्रार्थना सत्यात उतरतात असे नाही.काही ‘ Reject’ होतात तर काही ‘ Accept’ होतात.Reject होतात ,कारण त्यातच सर्वांचे भले असते आणि Accept होतात कारण ते होणे अपरिहार्यच असते,त्या पूर्ण झाल्याशिवाय आयुष्य पूर्ण होत नाही.

विश्वास ठेवा, देव जे काही करीत असतो, घडवत असतो त्या मागे कोणता ना कोणता उद्देश जरूर असतो.काही वेळेस माणूस आडमूठपणे वागतो.मग अशा वेळी दैवी शक्तीच त्याला थांबवू शकते.मग असे काहीतरी घडते ,त्यामुळे त्या व्यक्तीचा आडमूठपणा नियंत्रणात येतो.आणि दुसरीकडे, माणूस खूपच शांत राहत असतो, प्रत्येक गोष्ट सहन करीत बसतो.मग अशा वेळी देखील तो अशा काही घटना घडवून आणतो ज्यामुळे तो माणूस लढण्यासाठी उठून उभा राहतो, जागा होतो.

कोण आपल्या आयुष्यात राहणार आणि कोण नाही राहणार सर्व काही विधताच ठरवीत असतो.आपण फक्त प्रयत्न कराचे आणि शेवटी जे काही होईल ते स्वीकारायचे.अट्टाहास करून काहीच साध्य होणार नाही.जेव्हा जे घडायचे ते घडतच असते.कोणतीच गोष्ट अचानक घडत नाही.ती घडण्यापूर्वी अनेक संकेत नियती आपल्याला देत असते.ज्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो.

जगात जे जे काही घडत असते.त्या त्या गोष्टीमागे काही ना काही उद्देश जरुर असतो.आपण फक्त ते ओळखायचे आणि पुढे जात राहायचे. न्याय नाही करायचा, फक्त कर्म करायचे आहे जीवन सकारात्मकरित्या जगत राहायचे.

‘सुख-दुःख त्याच्याच हाती, मग हे माणसा ,तू का घेती सर्व काही हाती..?’

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कर्ता करविता ‘तो’ आहे त्याला त्याचं काम करू द्या आणि तुम्ही फक्त तुमचा ‘रोल’ सांभाळा .”

  1. खरय माझ्या बाबतीत म्हणाल तर संकेत मला कळत होते पण पुढे घडणार्‍या घटना चि नांदी आहे, पण समजलेच नाही, असो पण खूप काही शिकायला मिळाले कोणी कोणाचे नसते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!