Skip to content

आयुष्यात पुढे येणारा एखादा Regret टाळण्यासाठी, आता एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

आयुष्यात पुढे येणारा एखादा Regret टाळण्यासाठी, आता एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?


आयुष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात,त्या त्या सर्व करता येतातच असे नाही.कधी आपण प्रयत्न करतो पण तरी देखील त्या पूर्ण होऊ शकत नाहीत.तर कधी आपण त्या गोष्टीसाठी काहीच प्रयत्न करीत नाहीत आणि मग पुढे जाऊन आयुष्यभर ती एक ‘खंत’ वाटत राहते.ज्याला आपण ‘Regret’ म्हणतो. म्हणूनच म्हणते,’आयुष्यात पुढे येणारा एखादा Regret टाळण्यासाठी, आता एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?’

Regret वाटणाऱ्या गोष्टी कोणत्याही असू शकतात.जसे की ,’शिक्षण’,’लग्न’,’नोकरी’,’व्यवसाय’,’नाते’ किंवा एखादी ‘फॉरेन टूर’ देखील,’साहसी टूर’ अगदी काहीही.व्यक्तीनुसार गोष्टी छोट्या मोठ्या कुठल्याही असू शकतात.ह्या अशा काही आयुष्यातील गोष्टी आहेत ज्यामध्ये अनेक रंग दडलेले आहेत. वाचताना फक्त आपल्याला तो एक शब्द वाटतोय,पण हे फक्त शब्द नाहीत.ह्या गोष्टी म्हणजे,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवासच आहे.

सुधा अगदी सुशिक्षित मुलगी होती.पण लग्न झाले आणि संसारच फक्त नशिबी आला आणि नोकरी चे स्वप्न पूर्ण करता आले नाही आणि मग एके दिवशी त्या स्वप्नाचे रुपांतर ‘Regret’ मध्ये झाले. तेव्हा थोडे धाडस केले असते,प्रयत्न केले असते तर आज माझ्यावर ही खंत करण्याची वेळ आली नसती ,असे सुधा आज स्वतःशीच म्हणत आहे.असे वाटणे साहजिकच आहे.पण एक प्रयत्न करून पाहिला असता तर…?

विजय आज नोकरीत व्यस्त आहे.पन्नाशी उलटून गेली आहे.पण मनाशी सारखे वाटत आहे ,तरुणपणी थोडी रिस्क घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला असता तर कदाचित आता पेक्षा जास्त समृद्धी प्राप्त झाली असती.मनामध्ये हे Regret सारखे घोळत राहत आहे.

कॉलेज मध्ये असताना सोहम ला प्रिया खूप आवडायची.पण बोलण्याचे,प्रेम व्यक्त करण्याचे धाडस कधी झाले नाही.काही वर्षानंतर ,प्रिया चा एक मेसेज सोहम ला आला.’काय आता प्रप्रोज पण मीच करू काय’?.सोहम आवक झाला होता हा मेसेज ऐकून,मनात असताना देखील आता काहीच करू शकत नव्हता,कारण वेळ निघून गेली होती,तो त्याच्या संसारात होता. प्रिया ला उत्तर तो देऊ शकला नाही पण आयुष्यभर एक खंत त्याच्या मनात राहिली,’वेळीच प्रिया शी मनातील बोललो असतो तर….’

मनीषा अत्यंत हुशार मुलगी .पहिला नंबर येणारी. कॉमर्स शाखेत अगदी यशस्वी शिक्षण पूर्ण केलेली.आज नोकरीस देखील आहे.पण आता एक Regret तिला सतावतोय.’विज्ञान’ शाखेत शिक्षण पूर्ण करायला हवं होतं.आणखीन वेगळ्या संधी मिळवू शकले असते.

अमोल आणि करण घनिष्ठ मित्र.पण बोलता बोलता काही वाद झाले आणि कायमचा अबोला आयुष्यात आला.एके दिवशी अमोल च्या कानी बातमी आली,’करण चा अपघातात मृत्यू झाला आहे’.अमोल ला काय सुचतच नव्हते.मनात विचार एकच आला,’एकदा मी पुढे होऊन Sorry म्हणलायला काय हरकत होती.मैत्री कदाचित टिकली असती…’

पूजा ,सुंदर दिसणारी मुलगी.शिक्षण झाले की वडिलांनी आपल्या मित्राच्या मुलाशी तिचे लग्न पक्के केले.पूजा ला मात्र मुलगा पसंत नव्हता.म्हणजे तिला अजून काही वर्षे थांबायचे होते.पण वडील घाई करीत होते.पूजा ने वडिलांचा मान राखला.लग्न झाले.पण दुर्दैवाने त्या मुलाने पूजा कडे एके दिवशी ‘घटस्पोट’ मागितला का तर त्याला दुसरी मुलगी आवडत होती.त्यांचे अगोदरच रिलेशन होते.पूजा च्या मनावर खूप मोठा घात झाला.स्वतःलाच दोष देत राहिली.’लग्न होण्यापूर्वीच बाबांशी स्पष्ट बोलले असते तर..’

रोहिणी साहसी मुलगी होती.’Adventure’ करायला, मोठ्या दूरच्या ट्रिप करायला तिला खूप आवडायचे.पण ,कुटुंब तिला त्या साठी पाठिंबा देत नव्हते.त्यामुळे ती त्यातील बऱयाच गोष्टी करू शकली नाही.आणि आज काळ लोटल्यानंतर हीच गोष्ट तिच्या मनाला खंत देऊन जात आहे.

रोहित आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा.पण आई-वडिलांना नेहमी गृहीत धरीत असे.त्यांना वेळ देत नसे.स्वतःच्याच धुंदीत असे.एके दिवशी आई-वडील अचानक एक वेळीस देवाघरी गेले.आणि ते गेल्यानंतर रोहित ला स्वतःच्या चुकांची जाणीव झाली.पण आता Regret करण्याशिवाय त्याच्याकडे कोणतीच गोष्ट उरली नव्हती.

अशा प्रकारच्या किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत देखील घडल्या असतील ना?

प्रयत्नात खूप ताकद असते.प्रयत्नांना यश येईलच याची शाश्वती जरी देता येत नसेल तरी देखील एकदा प्रयत्न करून पाहणे आपल्या हातात असते.पण त्या साठी आवश्यक असतो तो धीटपणा, धाडस,रिस्क घेण्याची तयारी. यश-अपयश ही पुढची गोष्ट आहे.पण प्रयत्न करणे हे मात्र आपण नक्कीच करू शकतो.

जेव्हा काही काळ लोटतो,तेव्हा मन अनेकदा भूतकाळात जाते.तेव्हा केलेल्या चुका आठवतात,दुरावलेली माणसे आठवतात.आणि काही जगायचे राहिलेले क्षण मनात वस्ती करू लागतात.तेव्हा हळूहळू मग Regret ही गोष्ट मनाला खायला उठते.’मी तेव्हा असे केले असते तर…तसे करायला हवे होते…’.पण वेळ कोणासाठी थांबत नाही.आणि बघता बघता आयुष्याची संध्याकाळ व्हायला लागते.आणि शेवटी एकच गोष्ट हाती लागते.ती म्हणजे ,’Regret…खंत’.

एकदा गेलेला क्षण पुन्हा आहे तसा जगता येत नाही.म्हणून एक गोष्ट स्वतःसाठी नक्की करा,तुम्हाला जेव्हा जेव्हा जे जे काही करू वाटत असेल,बोलू वाटत असेल ते ते तेव्हाच करून मोकळे व्हा.आहे तो क्षण भरभरून जगा.आपल्या माणसांची कदर करा, आदर करा,चांगले नाते जोपासा. माहीत नाही… कुठला दिवस शेवटचा असेल..

आर्थत सगळ्याच गोष्टी नाही करता येत आयुष्यात..कारण ‘,त्याग’ ही देखील खूप मोठी गोष्ट आयुष्यात करणे एके क्षणी अपरिहार्य होऊन बसते.पण त्या गोष्टी जरूर करा ,ज्या विषयी उद्या जाऊन तुम्हाला कोणताही ‘Regret’ वाटणार नाही.

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!