सकारात्मक विचारांची शक्ती काय असते, ते वाचा या लेखात!
१) स्वतःवर विश्वास
स्वतःवर विश्वास ठेवणे ही सकारात्मक विचारांची पहिली पायरी आहे. कितीही कठीण असेल अगदी अशक्य सुद्धा वाटल तरीसुद्धा मी ते मिळवणारच जे मला पाहिजे आहे हा स्वतःवरील विश्वास अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतो.
२) चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा अजून जास्त सकारात्मक होतो. तुम्ही स्वतःला सवय लावा दिवसभरात जे काही चांगल घडेल त्याची दखल घेण्याची मग ती अगदी लहानशी बाब असेल तरी..
३) विचार.
जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला आयुष्यात सकारात्मक अनुभव मिळत राहतील.. सकारात्मकता तुमच्याकडे नेहमीच ओढल्या जाईल.. आणि नेहमी त्याच गोष्टींचा विचार करा जे तुम्हाला पाहिजे आहे.. नको असलेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका.
४) कल्पना.
तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याची दिवसभरात एकदा तरी कल्पना करा. तुमचं ध्येय साध्य झालं आहे याची कल्पना करा जेणेकरून तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळेल आणि तुमचं तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित राहील.
५) कृती.
फक्त सकारात्मक विचार करून काहीच उपयोग नाही.. कारण विचारांना कृतीची जोड महत्वाची असते. ध्येयाच्या दिशेने कृती करा. आणि ते ध्येय फक्त विचार करून मिळेल अशी आशा न धरता ते साध्य करा.
६) हार मानू नका.
तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतील.. पण त्या अडथळ्यांना घाबरून हार मानू नका.. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा आणि प्रयत्न करत राहा.
७) सहवास.
तुम्ही ज्यांच्यासोबत राहता.. तुमचा वेळ घालवता अशा माणसांचा तुमच्यावर प्रभाव पडतो. म्हणून अशा माणसांसोबत नेहमीच सहवास ठेवा ज्यांचे विचार सकारात्मक असतील आणि जे तुम्हाला नेहमी तुमचं ध्येय साध्य करायला पाठिंबा देतील.
८) मदत करणे.
दुसऱ्यांची मदत केल्यामुळे तुमच्यातील आनंद आणि तुमच्यातील सकारात्मकता चांगल्या प्रकारे वाढते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता तेव्हा तुम्हाला आतूनच आनंद मिळतो आणि ते तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते.
९) कृतज्ञता.
कृतज्ञता मानणे ही सर्वात उत्तम भावना आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला मदत करते. आपल्याकडे जे आहे त्याला आभार मानण्यासाठी दिवसातून एकदातरी वेळ काढा.
१०) आताचा क्षण.
भूतकाळात जे घडून गेले आहे त्याचा विचार करण्यात किंवा भविष्यात काय होणार याची उगाच काळजी करण्यात अडकून राहू नका.. आता या क्षणाला जे आहे त्यावर लक्ष द्या आणि त्याचा म्हणजेच आताच्या क्षणाचा आनंद घ्या.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

