Skip to content

आपल्या पार्टनरला कंट्रोल करत असाल तर.. सावधान!

आपल्या पार्टनरला कंट्रोल करत असाल तर.. सावधान!


जोडीदार हा आयुष्यभरासाठी साथ देणारा हवा असतो.. त्याच्यासोबत राहताना प्रत्येक क्षण अगदी सहज जात असेल मग तो सुखाचा असो अथवा दुःखाचा पण तो आहेना म्हणून बिनधास्त वाटायला हवं.. पतिपत्नीच्या नात्यात प्रेम.. विश्वास.. काळजी.. एकमेकांबद्दल आदर… सहानुभूती.. या सर्वांसोबत मोकळीक मिळायला हवी विचारांची.. वागण्या बोलण्याची.. बंधन जोडीदाराने लादण्यापेक्षा ज्याचे त्यानेच आपल्या मर्यादा ओळखून नात जपण्यासाठी काही योग्य ती बंधन स्वतःला लावावीत..

पण जर ही मोकळीक नात्यात नसेल .. एकमेकांवर नको असलेली बंधन असतील.. आपला जोडीदार आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल.. तर मात्र ते नात टिकण्यापेक्षा त्या नात्याच महत्त्व कमी होते.म्हणून जर कोणी आपल्या जोडीदाराला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर काही गोष्टींची सावधानता आधीच बाळगावी..

१) वाद

पतिपत्नीच नात हे इतर सगळ्या नात्यांपेक्षा सर्वात वेगळं असते.. या नात्यात एकमेकांना मोकळीक मिळणे गरजेचे असते.. पण ती मिळाली नाही कोणतीही गोष्ट करताना.. काही वागताना बोलताना जर सतत जोडीदार स्वतःच वर्चस्व दाखवत असेल.. तर दुसरा या वागण्याला कंटाळून शेवटी दोघांमध्ये वाद होतात. आणि काहीवेळेस हे वाद इतके वाढतात की त्यावेळी दुसर काहीच महत्वाचं वाटतं नाही आणि मग ते नात तुटण्याची सुद्धा वेळ येते..

२) तिरस्कार

आपला जोडीदार आपल्याला जितकं प्रेम देईल.. आपल्यावर विश्वास दाखवेल आणि त्यासोबतच आपल्या मताला महत्त्व देईल तर त्यावेळी त्याच्याबद्दल आदर हा वाढतो पण जेव्हा तो त्याचच खर करेल.. तो म्हणेल तीच पूर्व दिशा अस वागेल.. जोडीदाराच्या मताला महत्त्व देणार नाही तर मग अशावेळी त्याच्याबद्दल असलेलं प्रेम कमी होऊन तिरस्कार निर्माण होतो.म्हणतात ना प्रेम कितीही असेल पण जर संशय असेल तर ते प्रेम म्हणता येणार नाही.. तसच जर जोडीदाराला महत्त्व मिळत नसेल तर बाकी सगळं असूनसुद्धा त्याची किंमत राहत नाही.

३) विश्वास

विश्वास हा नवराबायकोच्या नात्याची भक्कम पायरी आहे हेच खर.. पण जर जोडीदार सतत त्याच वर्चस्व दाखवत असेल.. दुसऱ्याच ऐकून घेत नसेल.. तर त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्यावर एक जोडीदार म्हणून असलेला विश्वास कमी होतो. कारण सुसंगतीने घेतलेले निर्णय हे नात टिकवते पण परस्पर निर्णय घेतले की दुसरा मात्र दुखावत जातो.. आणि त्याच्या मनात कुठेतरी अविश्वास वाढत जातो.

४) एकटेपणा आवडतो

असे अनेक व्यक्ती आपण पाहतो जे आपल्या जोडीदाराला कंटाळून त्याच्यापासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करतात.. सतत वाद घालण्यापेक्षा, सतत तक्रार करण्यापेक्षा..आणि सतत जोडीदाराच्या कंट्रोल मध्ये राहण्यापेक्षा एकट राहणं ते जास्त पसंत करतात.

५) नात्याच महत्त्व

जेव्हा जोडीदार असा वागत असेल तर त्यावेळी त्याच्या वागण्याचा कंटाळा येतो.. त्याला कितीही समजावलं किंवा समजून घेतलं तरी त्याच वागणं काही बदलत नसेल तर त्याच्यविषयी काहीच आदर राहत नाही अर्थात त्या नात्याबद्दल काही आपुलकी, जिव्हाळा आणि त्या नात्याच महत्त्व सुद्धा कमी होते.

६) मानसिक आणि शारीरिक समस्या

मानसिकता उत्तम ठेवणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते पण काहीवेळेस दुसऱ्याच्या वागण्याचा आपल्यावर इतका परिणाम होतो की सतत तोच विचार करून आपलीच मानसिकता बिघडते.. अतिविचार.. दडपण.. यासारख्या मानसिक समस्या निर्माण होतात. आणि एकदा का मानसिकता बिघडली की त्यानंतर शारीरिक समस्या तयारच असतात जसे की डोकेदुखी.

७) संवाद

संवाद साधण्यासाठी जोडीदाराने आपल म्हणणं ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज असते.. आपल्या बोलण्याला आपल्या मताला महत्त्व दिलं की नेहमीच त्याच्याशी संवाद साधावा असे वाटते पण तसे होत नसेल तर नक्कीच त्यांच्यात संवाद उरत नाही.

८) कुटुंबावर परिणाम

जर पतीपत्नीच नात भक्कम नसेल तिथेच विश्वास नसेल प्रेम नसेल.. सतत त्यांच्यात वाद होत असतील.. त्यांच्यातील विश्वास कमी झाला असेल.. तर याचा वाईट परिणाम हा पूर्ण कुटुंबावर दिसून येतो.. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी वाढते.. लहान मुलांवर त्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम दिसून येतो.

या सगळ्या परिणामांचा विचार करून.. नात टिकवण्यासाठी.. नात्यातील प्रेम विश्वास आणि महत्वाचं म्हणजे ज्यामुळे नात अजून भक्कम होते असा हा संवाद साधला की एकमेकांवर कंट्रोल ठेवण्याची गरज उरणार नाही.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!