Skip to content

फक्त सकारात्मक विचार उपयोगाचा नाही. या गोष्टींची काळजी कोण घेणार??

फक्त सकारात्मक विचार उपयोगाचा नाही. या गोष्टींची काळजी कोण घेणार??


आजपर्यंत आपण नेहमीच सकारात्मक विचार कसे करायचे.. जास्तीत जास्त चांगले विचार..चांगल वागणं बोलणं कस करता येईल याकडे लक्ष दिले आणि त्यातलाच एक भाग म्हणजेच जेव्हा आपण सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्वात आधी आपण नकारात्मकतेला आपल्यापासून दूर ठेवण गरजेचं असते…

आपल्याला आपलं आयुष्य सुंदर असावं असच नेहमी वाटते. अर्थात आपण त्यासाठीच नेहमी प्रयत्नशील असतो. पण आपल आयुष्य कधी सुंदर होईल..

समजा आपल्याकडे खूप पैसा आहे.. गाडी आहे. बंगला आहे.. चांगली नोकरी आहे.. पण तरीसुद्धा काहीतरी एखादी गोष्ट असतेच जिच्यामुळे आपण आपल्याकडे असलेल्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाही.. आणि जर आपल्याकडे पैसा.. गाडी..बंगला नसेल तरीसुद्धा आपण आज जे आपल्याकडे आहे त्यामध्ये सुखी नसतो.

याच एकच कारण म्हणजे आपण आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान मानत नाही..आणि जे नाही त्याकडे लक्ष देतो.. आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याची धडपड प्रत्येकाने नक्कीच करावी पण ते मिळत नसेल..आपल्याला अपयश येत असेल तर त्याचा आपल्यावर होणारा नकारात्मक परिणाम आपल्याला जगण्याचा आनंद घेऊ देत नाही..

आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात केली तर त्यावेळी आपल्याला अनेकजण ज्याचं त्याचं मत सांगतात.. कोणी आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात तर कोणी आपण माघार घ्यावी म्हणून आपल्याला तुला नाही जमणार.. त्याला तर अपयश आले आणि तू तर तेवढं कधी केल सुद्धा नाही मग तूला सुद्धा अपयश मिळालं तर पुढे काय करशील.. अरे यामध्ये तुझ नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे..

अस नकारार्थी बोलून आपल लक्ष विचलित करतात .. म्हणून आपल्याच हातात असते की जे सकारात्मक बोलतात त्यांच प्रोत्साहन घेऊन पुढे जायचं की नकारार्थी बोलतात त्यांचं ऐकून माघार घ्यायची.. आपण जर नकारार्थी बोलणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचता येईल..

आपण आपलं आयुष्य अगदी योग्यरीत्या जगत असतो पण अचानक कोणी येते आणि आपल्याला सांगते की तुझ्याबद्दल तुझ्यामागे सगळे नेहमीच वाईट बोलतात.. तुझ्या तक्रारी करत असतात.. तुझ वागणं बोलणं किती चुकतेय याची चर्चा करत असतात..

आणि आपण हे सर्व ऐकल्यावर त्यावर विश्वास ठेवतो आणि चांगल चाललेल्या आयुष्याची दिशा बदलतो.. कारण आपण तोच नेहमी विचार करतो की अस का बोलतात.. मी तर तस काही वागत नाही… माझ्याच बाबतीत अस का होते आणि मग या विचारांनी आपल लक्ष महत्वाच्या ठिकाणी न राहता भरकटते..

मग आपणच विचार करावा की आपल्याबद्दल कोण काय बोलते.. खरचं बोलतात की उगाच आपल्याला त्रास देण्यासाठी कोणी अस सांगते आणि जरी काहीही बोलले तरी याचा नकारार्थी परिणाम मी माझ्यावर करून घ्यायचा की त्या नकारार्थी बोलण्याकडे दुर्लक्ष करून कोणीही आपल्याबद्दल काहीही बोललं तरी काहीच फरक पडू न देता आपल लक्ष विचलित न करता आपल्याच पद्धतीने जगायचं हे आपल्याच हातात असते.

अस कोणाचंच आयुष्य नाही जे पूर्ण सुखी आहेत.. कोणाला घरात त्रास असतो तर कोणाला बाहेर.. कोणाला शारीरिक त्रास असतो तर कोणाला मानसिक.. कोणी भौतिक सुविधांसाठी धडपडत तर कोणी मानसिक शांततेसाठी .. कोणाला सांसारिक सुख हवं असते तर कोणी त्यापासून कंटाळून दूर जायचा प्रयत्न करत असते.

सुख आणि दुःख याला आयुष्याचा भाग समजून जे आहे त्यामध्ये समाधान मानत जर आयुष्य जगायचं असेल तर आधी आपल्याकडे असणारे नकारार्थी विचार.. नकारार्थी वातावरण यांना दुर्लक्षित केलं तर नक्कीच आपल आयुष्य सुखकर होईल.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!