Skip to content

समस्यांना सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतूनच सामर्थ्य निर्माण होते.

समस्यांना सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतूनच सामर्थ्य निर्माण होते.


एखादी व्यक्ती आपल्याला खूप सामर्थ्यशाली वाटते.सर्वजण म्हणतात ,’किती हिमतीची आहे ही’,’किती स्ट्रॉंग आहे हा’.पण हे सामर्थ्य एका दिवसात कधीच कोणाच्यातच येत नाही. तर ते येते, समस्यांना सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतूनच.अगदी खरे आहे हे.

समस्याच माणसाला घडवतात.समस्या च मनाला बळ देतात.कधी कधी काही समस्या सहन कराव्या लागतात तर काही समस्या योग्य रित्या हाताळाव्या लागतात.आणि ही सहनशीलता,हाताळण्याचे कसब च स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण करते.

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात.काही व्यक्ती काही प्रमाणात कमी समस्यांचे आयुष्य जगत असतात. कारण त्यांना एक प्रकारचा ‘कम्फर्ट झोन’ असतो.पण काहींच्या नशिबी कायमच्या,रोजच्या समस्या लिहीलेल्या असतात.जेव्हा समस्या येते तेव्हा व्यक्ती निराश होते,तणावग्रस्त होते आणि तिची मानसिक शांतता ढळते.

हे सगळे साहजिक आहे.पण जेव्हा ती व्यक्ती त्या समस्या हाताळू लागते.त्यातून उठून उभे राहण्याचा प्रयत्न करते किंवा त्या समस्यांची तिला सवय होते तेव्हा तिच्यात एक प्रकारची मानसिक ताकद येते.ती व्यक्ती हुशार,कणखर,व्यवहारिक बनते.

जेव्हा समस्या येते तेव्हा ती सोडवताना माणूस अनेक नवनवीन गोष्टी अनुभवतो,ज्या त्याने ह्या पूर्वी अनुभवलेल्या नसतात.समस्यांना हाताळताना,माणसांची खरी ओळख होते.कोण आपले,कोण परके याची खरी जाणीव होते.कोण खरे आणि कोण खोटे हे देखील समस्याच आपल्याला दाखवून देते.आणि मग ह्यामुळे माणूस सामर्थ्यवान बनू लागतो.

काही जण समस्या नकारात्मक घेतात आणि आयुष्याला दोष देत बसतात.मग अशी माणसे कणखर बनू शकत नाहीत.पण जी माणसे अनेक काळापासून समस्या सहन करीत असतात ते आयुष्याचे विविध रंग पाहतात.आणि घडत जातात.कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे आपोआप त्यांना समजू लागते. आणि मग पुढे होणारी फसगत टळते.

आपण काही व्यक्तींच्या बाबतीत म्हणत असतो,’किती स्वतःला शहाणी समजते/ समजतो’.पण ह्या अशा लोकांना आयुष्यात अनेक वाईट अनुभव आलेले असतात.आणि त्या अनुभवातून शिकूनच ती शहाणी, सुज्ञ बनलेली असतात.आणि ह्या सगळ्या क्षमतेतुन त्यांच्यात एक प्रकारचे सामर्थ्य आलेले असते.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या माणसाला बदलण्यासाठी आलेल्या असतात.एखादी व्यक्ती खूपच शांत,कोणाच्यात न मिसळणारी असते.पण जेव्हा तिच्या आयुष्यात समस्या येतात तेव्हा ती सर्वांगाने उठून उभी राहते आणि मग धीट बनते.स्वतःचा विकास करते.समस्या माणसाला खरेच स्ट्रॉंग बनवतात.

समस्या आयुष्यात आल्यामुळे माणूस प्रत्येक गोष्टीच्या सर्व बाजूंचा सारासार विचार करू लागते आणि त्यामुळे योग्य निर्णयक्षमता विकसित होते.कुठे भावनिक व्हायचे,नाही व्हायचे हे ठरविता येते.त्यामुळे भावनांच्या आहारी न जाता ती व्यक्ती सर्वांचे भले असणारा निर्णय घेते.अनेकदा काही गोष्टींसाठी काही गोष्टी सोडायला देखील तयार होते.त्याग करण्यास समर्थ होते.आणि हे सर्व शक्य होते ते समस्या सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतुन.

नातेसंबंध, पैसा, आजारपण ,मानसिक आजार ,कार्यालयीन समस्या ,अशा एक ना अनेक विविध समस्या असतात.पण प्रत्येक समस्या माणसाला सामर्थ्यवान बनवते हे नक्की.

मग…तुम्ही कसे पाहता समस्येकडे…?

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “समस्यांना सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतूनच सामर्थ्य निर्माण होते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!