आपल्या आयुष्याचे कॅप्टन आपणच!
खेळपट्टीवर खेळताना डेल स्टेन सारखे 155km स्पीड ने अनेक इन्स्विंग येतील त्यांना सचिन तेंडुलकर सारखे स्टेट ड्राईव्ह ने उत्तर द्यायचे . अख्तर सारख्या वेगाने येणाऱ्या चेंडूना अप्पर कट मारून सीमापार करायचे. कधी कधी युवराज होऊन 6 चेंडू 6 षटकार मारायचे. मलिंगा बुमराह सारखे येणारे यार्कर ना धोनीच्या हेलिकॉप्टर ने उत्तर द्यायचे . येतील अनेक मिचेल जॉन्सन चे बाऊन्सर त्यांना ए.बी . सूर्या होऊन अंदाज न येता 360° ने टोलवायचे.
येणाऱ्या अनेक हसन आली सारख्या चेंडू ना कव्हर ड्राईव्ह मारून रागात उत्तर द्यायचे . येतील अनेक लेग स्पिन , ऑफ स्पिन त्यांना त्यांना सेहवागसारखे बिनधास्त खेळून काढायचे . रोहित शर्मा सारखे डब्बल सेंच्युरी खेळून समोरच्या चेंडूना पुल्ल कट मारून सीमापार मारायचे . येणारा कोराना सारखा चेंडू कसा पण आला तर द वाल सारखे भिंत होऊन उभा राहायचे .क्लीन बोल्ड होण्याचा संधी वाढतील तेव्हा पुजारा सारखे घट्ट उभा राहायचे . एखाद्या वेळी अनिल कुंबळे सारखे , वॉटसन सारखे जखमी जरी झाले तरी खेळत राहायचे . सुर्यास्त पर्यंत खेळून दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज व्हायचे . त्याच ताकतीने आणि त्याच उत्साहाने .
एखाद्या दिवशी लारा होऊन कायम अबाधित राहणारा विक्रम करायचा . येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर अजिंक्य रहाणेने सारखी स्थिर नजर ठेऊन कसोटी खेळणारा आज T-20 सारखी फलंदाजी करून बिनधास्त खेळायचे . मेंडिस सारख्या चेंडू ना धोनी सारखे खेळून काढायचे . येतील अनेक मारग्रा , ब्रेट ली सारखे चेंडू त्यांना आशिष नेहरा सारखे उंच मैदानाच्या बाहेर गेले पाहिजेत असे टोलवायचे . मध्येच धावबाद चे संधी झाली च तर गंभीर सारखे डाय मारून वर्ल्ड कप खेळी खेळायची .
पुजारा सारखा संयम गंभीर सारखा काही करायचे तयारी , युवराज सारखे पण खेळपट्टी सोडणार नाही ही तयारी , दादा सारखे कॅप्टन होऊन नाव नाही झाले तरी चालेल पण अस व्हायचे की सोबतचे 4-5 आपल्या सोबत गेले पाहिजेत . खेळात हार व्हायला लागली तरी संगकारा सारखी स्मित हास्य चेहऱ्यावर नक्कीच ज्याची चर्चा वर्ल्ड कप सारखी व्हावी . धोनीला कोहली सारखा पार्टनर झाला की मग आयुष्याची खेळी बहरली गेली पाहिजे . एकमेकंबरोबर चा विश्वास हा या खेळी ची साक्ष देईलच बाकी येतील .
काल करुण नायर सारखे त्रिशतक झाले तर विश्रांती घेऊन आज पुन्हा नव्याने हार्दिक पांड्या व्हायचे सगळे म्हणतील करुण नायर सारखी कहाणी होईल की काय तेव्हा आपण त्याच जोमाने सेहवाग सारखे खेळत राहायचे . समोरून वेस्ट इंडीज ची जुनी टीम जरी आली तरी कपिल देव सारखे फटके मारून वर्ल्ड कप जिकायचा. धोनी सारखे शांत , संयम ठेवून आखणी करून खेळत राहायचे . रैना सारखे अनेक पार्टनर सोबतीला ठेवायचे . सर जडेजा सारखे तलवार स्टाईल ने खेळत राहायचे . ज्या वेळी एखादा खतरनाक गोलंदाज समोरून चेंडू फेकत असेल तर थोडा पुजारा सारखा संयम ठेऊन तो गोलंदाजीचा षटके पूर्ण होऊ द्यायचे .
कायमच असेच चेंडू येतील अस काही नाही एखादा खराब चेंडू ओळखून खेळता राहायचे . चौकार षटकार आले नाही तर सुद्धा एकेरी दुहेरी घेऊन धावफलक हलता ठेवायचा . फ्री हिट पडलाच तर षटकार मारून सीमापार चेंडू मारायचा .
आपल्या टप्प्यात एखादा चेंडू सापडलाच तर चौकार मारून खेळत राहायचे . कधी एकेरी , दुहेरी , तिहेरी , खेळून धावा काढत राहायचे . आश्विन सारखा अचूकपणा दाखवत चौकार मारून सामना जिकायाचा. दरवेळी सचिन सारखे शतक होईल अस काही नाही कोहली सारखे शतकांचा दुष्काळ एकदम भरून काढायचा . टिकून खेळणे महत्त्वाचे आहे बाकी आपण कोण आहे .
हे आपल्या आयुष्याचे कॅप्टन आपणच फक्त आपल्याला माहीत असते .टप्प्यात आले की परफेक्ट धोनी सारखा लाँग ओन षटकार मारून सामना जिंकण्याचा . दादा सारखे निर्णय घेऊन अचानक रोहित शर्मा सारखे न तुटणारे विक्रम करायचे .
सगळेच संपेल असे वाटेल पण ऋषभ पंत सारखी एकाहाताने खेळून षटकार मारून सामना मध्ये जीव आणायचा . मोहंमद कैफ होऊन सामना मोठ्या दिमाखात जिंकायचा . बाकी धोनी , रोहित शर्मा सारखे डोक शांत ठेऊन निर्णय घेऊन होतील अनेक शतक आणि अनेक दुहेरी शतक पण जमिनीवर राहुन खेळ खेळत राहायचे . केन सारखे स्मित हास्य ठेऊन खेळ बहरत ठेवायचा . कितीही पानगळ झाली तरी आपण बहरणे सोडायचे नाही . बाकी सामना खेळत राहणे महत्त्वाचे आहे .
लेखक – गिरीशकुमार तुकाराम कांबळे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

