बायको झोपलेली असते अन् मैत्रिणीचा मेसेज येतो, “तू मला आजही खूप आवडतोस!”
सुजय आणि रेवाच लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाल.. हे नवीन जोडप एकमेकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत अगदी आनंदात राहतात.. सुजय हा माझ्या नवऱ्याचा जवळचा मित्र.. स्वभावाने अगदी शांत.. पण त्यासोबतच बिनधास्त.. त्याच राहणीमान अगदी उत्तम आणि त्याला कॉलेज मध्ये असताना मित्र तर होते पण मैत्रिणी सुद्धा खूप होत्या.. त्याच एका मुलीवर प्रेम सुद्धा होत पण तिच्या घरच्यांनी नकार दिल्यावर तीनेसुद्धा त्याला नकार दिला आणि त्यानंतर घरच्यांच्या आवडीने आणि अर्थात त्याच्या सुद्धा आवडीनेच त्याच आणि रेवाच अरेंज मॅरेज झालं..
सुजयने माझ्या पतींना घडलेला किस्सा सांगितला.. आणि खरचं मित्र म्हणून यांना सुद्धा त्याच्याबद्दल कौतुक वाटल..
एकदिवस रात्री झोपताना सवयीप्रमाणे सुजय फेसबुक चाळत होता आणि अचानक त्यावेळी त्याला एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली.. कोणाची आहे हे पाहिल्यावर त्याला कळलं की तिचं मैत्रीण जिच्यावर त्याचं प्रेम होत.. त्याने एक मैत्रीण म्हणून request स्वीकारली.. आणि लगेच तिचा त्याला मॅसेज मिळाला.. काय कसा आहेस हे विचारून झाल्यावर तिने सुजयला मेसेज केला की sorry मी त्यावेळी माघार घ्यायला नको होत.. मी तुला खूप दुखावलं आहे.. यावर सुजयने उत्तर दिलं.. काही हरकत नाही.. जे झालं ते घडून गेलं आणि आता तर माझं लग्न सुद्धा झालं आहे.. पण यावर तिने reply दिला की आपण पुन्हा तसेच close राहू शकतो का.. माझं तर लग्न नाही झालं..
अनेक स्थळ येतात पण मनात मात्र तू आहेस म्हणून कोणीही पसंत पडत नाही.. आणि तुझेच विचार मनात येतात.. तुझी आठवण सतत येते.. दुसर कोणाशी लग्न करण्याची इच्छा उरली नाही.. आज सुद्धा मी तुझीच वाट पाहतेय..
तीच हे उत्तर पाहिल्यावर सुजय क्षणासाठी विचार करू लागला.. त्याने तीच प्रोफाइल फोटो पाहिला.. आज सुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती.. पण त्याच क्षणी त्याच लक्ष त्याच्या बायकोकडे रेवा कडे गेलं..
रेवा अगदी गाढ झोपली होती.. तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या मनात आल की किती बिनधास्त झोपली आहे ही.. लग्न करून इथे एका अनोळखी घरात आली.. इतक्या वर्षांचं तिच्याशी घट्ट नात असलेलं तीच लाडकं कुटुंब सोडून आज आमच्यात तेच नात रेवा पाहतेय..
तिला हवं नको ते पाहणारे.. तिचे प्रत्येक हट्ट पुरवणारे .. तिच्यासाठी वाटेल ते कष्ट घेऊन तिला कुठेच काही कमी पडणार नाही याची काळजी घेणारे तिचे वडील सोडून ती इथे माझ्यावर तोच विश्वास ठेवून माझ्यासोबत राहतेय.. तिच्या सुख दुःखात तिला कायम पाठिंबा देणाऱ्या.. तिचे लाड करणाऱ्या.. तिच्या दुःखात तिला कुशीत घेणाऱ्या आणि तीच कौतुक करणाऱ्या..तिच्या आईच सुख सोडून ही माझ्याकडे आलिये.. भावाबहिणीची मस्ती..त्यांच्यातील खोटा रुसवा.. त्यांच्यातील ओढ हे सगळं आज ती आठवत असेल तरीसुद्धा मला कोणत्याच गोष्टीची तक्रार न करता.. माझ्याकडे खूप मोठ्या अपेक्षा न करता आज ती माझ्यासोबत राहून आयुष्यभरासाठी माझ्यावर इतका विश्वास दाखवतेय..आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत पुन्हा तेच नात ठेवलं तर नक्कीच रेवाचा विश्वासघात होईल..
आणि तिची फसवणूक करणे मलाच जमणार नाही.. तिचा माझ्यावर असलेला विश्वास आणि आमचं नात हे कायम टिकण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करेन आणि हा विचार करून त्याने त्याच्या मैत्रिणीला स्पष्ट नकार दिला.. आणि तिला ब्लॉक केलं.. त्याच्या या कृतीने त्यालाच आतून समाधान मिळालं..
खरच जर आपली बायको.. आपला नवरा आपल्यावर असे विश्वास ठेवत असतील..तर त्यांची कुठेच फसवणूक न करता त्यांचा आपल्यावर आणि आपल्या नात्यावर असलेला विश्वास सार्थ करावा. आणि यामुळेच नवरा बायकोच नात अजून घट्ट होईल..
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Kharach chan