Skip to content

आज समोर आलेलं संकट उद्या आपल्याला मजबूत बनवत असतं.

आज समोर आलेलं संकट उद्या आपल्याला मजबूत बनवत असतं.


आपण खूप आनंदी आयुष्य जगतोय.. कोणतीच संकट नाहीत.. कोणतीच गोष्ट मनाविरुद्ध घडत नाही.. सगळं काही सुजलाम सुफलाम चालू आहे.. अस कोणाचंतरी आयुष्य आहेका ??

जगणं म्हणजे सुख दुःख आलेच.. फक्त ते स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे.. आज जे आहे ते उद्या असेलच याची खात्री नाही मग ते सुख असो नाहीतर दुःख..

पण तरीसुद्धा आपण तक्रार करत राहतो.. या तक्रारी करण्यापेक्षा आपण नक्कीच जे आहे ते स्वीकारलं.. म्हणजे काय तर सुख तर कोणीही हसत हसत स्वीकारते पण त्यासोबतच दुःख सुद्धा स्वीकारले पाहिजे म्हणजेच काय तर येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणे.. संकटांना सामोरे जाणे.. प्रत्येक अवघड प्रसंगात समंजसपणे योग्य तो निर्णय घेऊन एक योग्य दिशा ठरवून त्यामधून बाहेर पडणे.. आणि यामधून आपल्याला मिळते काय तर नक्कीच आपल्यातील क्षमता वाढते..

जे प्रसंग आज आपल्या समोर आहेत आणि त्यामधून बाहेर पडताना ज्या अडचणींना.. त्रासाला.. दुःखांना आपल्याला सहन करावं लागत तेच त्रास.. तेच दुःख.. उद्या मात्र आपल्यासाठी आपली ताकद नक्कीच असणार याचा आपण एकदा का असेना अनुभव घेतला असेल किंवा नेहमीच घेत असूच..

म्हणून येणाऱ्या कोणत्याही वाईट काळात त्यातून सावरताना.. त्यामधून मार्ग काढताना हाच सकारात्मक विचार सोबत ठेवला तर नक्कीच आपल्यातील धैर्य अजून वाढेल..

पण मला भीती वाटतेय अशा संकटांची.. मला असे प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा नको वाटतात.. ते आठवलं की माझ्या अंगावर काटाच मारतो..मी अशा दुःखांचा विचार करून सुद्धा घाबरते.. हे आपल्या तोंडून.. आपल्या मनातून तेव्हाच निघते जेव्हा आपण स्वतःकडे येणाऱ्या वेळेला सामोरे जाण्याची तयारी दाखवत नसू.. आणि यातून आपल्याला कधीच जिद्द मिळणार नाही आणि जगण्याची प्रेरणा सुद्धा मिळणार नाही.

जगण्याची कला त्यांनाच माहीत ज्यांनी आयुष्यात एक काळ सोसून त्यातून बाहेर पडण्याची जिद्द दाखवली आहे.. आज क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर तोच आहे ज्याने येणाऱ्या अपयशातून सुद्धा यशाकडे जाण्याची वाट शोधली आहे..

आपण आज ज्या महान व्यक्तींची उदाहरण ऐकतो.. ज्यांना आपल्या प्रेरणास्थान मानतो त्यांनी सुद्धा आधी एक वाईट काळ.. अनेक अवघड प्रसंग हाताळून ते आज एक उत्तम व्यक्ती म्हणून घडलेत..

अगदी आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण घ्यायचं झालं तर कोणी एखादी नोकरी मिळवतो आणि त्या कामाच्या ठिकाणी त्याला सगळच सोप असेल अस नसते.. कामाचा ताण.. तिथल्या सहकाऱ्यांची तसेच वरिष्ठांची वागणूक.. वेळेचं बंधन.. सुट्टीची परवानगी.. कधी कोणाची transfer अशा ठिकाणी होते जिथे कसलीच सोय नाही तर कधी कोणाला अनेक वर्ष काम करून सुद्धा बढती मिळत नाही..

कोणाला टारगेट पूर्ण करण्याचं pressure… असे एक ना अनेक प्रश्न.. त्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या समोर असतात.. कोणी त्यातून पळ काढून नोकरी सोडते तर कोणी त्यांना सामोरे जाऊन प्रगती करतात.. जे त्यांना सामोरे जातात त्यांना आज नक्कीच स्ट्रगल जाणवते पण नंतर मात्र त्यांच्यातील आत्मविश्वास.. चिकाटी.. त्यांच्यातील जिद्द वाढलेली त्यांनाच जाणवते..

म्हणून संकट आले आहे म्हणून घाबरून न जाता.. आज आलेलं संकट मला आज नक्कीच त्रास देईल पण उद्या मात्र तोच त्रास माझ्यासाठी माझी ताकद असेल हा विचार मनाशी पक्का करा.‌

लेखिका : मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आ‌‏युष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!