Skip to content

प्रत्येक गोष्टीला Solution असतं, अगदी स्वभावाला सुद्धा औषध असतं.

प्रत्येक गोष्टीला Solution असतं, अगदी स्वभावाला सुद्धा औषध असतं.


Solution…..Solution….म्हणजेच तोडगा.जो प्रत्येक गोष्टीवर असतोच असतो.म्हणजे एखादी समस्या एकटी येत नाही तर तिच्याबरोबर ती समस्येचे उत्तर देखील आलेले असते.पण अनेकदा होते काय की, आपण फक्त ती समस्याच पाहतो आणि उत्तराकडे दुर्लक्ष करतो.अनेकांच्या बाबतीत अगदी हेच होते.मग मन सैरभैर होते, चित्त थाऱ्यावर राहत नाही.आणि माणूस बेचैन राहतो.

पण ही समस्या काही कायम नसते.पण तरी देखील Solution कडे आपण जरा उशिराच पोहचतो.म्हणजे होते असे की, ‘अरे माझं असं झालं ,आता मी काय करू, कोणीच मदतीला नाही’ वगैरे अनेकजण बोलू लागतात.पण ,जेव्हा कधी कोणतीही समस्या येते,तेव्हा फक्त समस्या समस्या न करता त्या समस्येवर त्वरित तोडगा शोधला पाहिजे. फक्त ह्या साठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागणार आहेत.

काही जणांना वाटत असते, कोणीतरी येईल आणि माझी स्वतःहून मदत करेल ,ह्या अडचणीमधून मला बाहेर काढेल.पण असे कधीच होत नसते.काही जणांचा तर जणू Ego च आड येतो. मी कसे मदत मागू, वगैरे त्यांची विचारसरणी असते.काही जण स्वतःला बदलायला देखिल तयार होत नाहीत, अगदी अडचण असताना देखील.जगाने माझ्यासमोर झुकावे,असेच जणू त्यांची मानसिकता झालेली असते.

पण असे करून काहीच उपयोग होत नाही, फक्त वेळेचा अपव्यय होतो.प्रत्येक गोष्टीला जस solution असतं, तसंच स्वतःच्या स्वभावाला देखील असतं. म्हणजे आपण स्वतःमध्ये नक्कीच बदल करू शकतो. नकारात्मक गोष्टी सोडून देऊन, नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो.स्वतःचा स्वभाव, वागणूक नक्कीच बदलता येते.पण ह्या सगळ्यासाठी स्वतःची मानसिक तयारी असावी लागते.

काही जण म्हणतात,’स्वभावाला औषध नाही…’पण जसं औषध प्रत्येक गोष्टीला असतं, तसंच स्वभावाला का बरे असू शकत नाही…? काही जण एखाद्या व्यक्तीला म्हणत असतात ,’अरे असा कसा तू, माणसात च राहत नाही, कायम अलिप्त’.मग तो व्यक्ती देखील म्हणतो, ‘हो मी असाच आहे आणि असाच राहणार…’.पण असे करून कसे चालेल.

आपण एखाद्या व्यक्तीला कदाचित बदलू नाही शकत.पण ती स्वतः व्यक्ती स्वतः ला नक्कीच बदलू शकते.प्रत्येक माणसाने स्वतःला परिस्तिथीनुसार, सानिध्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीनुसार स्वतःला बदलले पहिजे आणि असे करणे म्हणजे स्वतःची मानसिक काळजी घेणे आणि स्वतःचे मानसिक आरोग्य जपणे होय.

अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःला अगदी ३६५ डिग्री अँगल मध्ये स्वतःला बदलले आहे आणि त्यामुळेच आज त्या व्यक्ती आत्मविश्वासपूर्वक,अभिमानाने जगत आहेत.अर्थात स्वतःला बदलण्यासाठी बराच कालावधी लागतो, पण एकदा ठरविले की बदल निश्चित असतो.त्यामुळे स्वतःला सतत बदलत ठेवा.

काही व्यक्ती ,इतरांसाठी स्वतः कायम बदलत राहतात.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली ‘आई’.अगदी आई प्रमाणे बदलता नाही आले तरी किमान माणसाने स्वतःसाठी तरी स्वतःमध्ये चांगला बदल घडवावा. कारण बदल नेहमी चांगल्यासाठीच असतो आणि बदल कायम असतो.

ते म्हणतात ना ,’Only Change is Constant and nothing else’. प्रत्येक गोष्टीला Solution असतं हे आपण नेहमी रोजच्या बोलीत बोलतो, पण स्वभावाचं काय.? काही गोष्टी बदलावायच्या असतील तर प्रथम स्वतःला बदलून दाखवा, आणि जगात फरक पाहा. खूप छान वाटेल तुम्हाला.

सतत दुसर्याने बदलावे असे जर का तुम्हाला नेहमी वाटत असेल तर तुम्ही चुकीचे जीवन जगत आहात. जोपर्यंत बदल स्वीकारणार नाही ,तोपर्यंत प्रगतीचे द्वार कायम बंदच राहणार.मग फक्त समस्या च दिसणार.म्हणून समस्या सोडवायची असेल तर स्वतःला बदलायला शिका,खूप चांगले बदल आयुष्यात आपोआप घडू लागतील.

लेखिका : मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आ‌‏युष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “प्रत्येक गोष्टीला Solution असतं, अगदी स्वभावाला सुद्धा औषध असतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!