अज्ञानी ती….अतृप्त तो
याविषयावर लिहावं असं काही जणांनी सुचवलं होतं… आणि वेळ भेटला म्हणून…हा लेख…
तीन वर्षांपूर्वी ‘लग्न आणि शरीरसंबंध’ या विषयावर चार भाग लिहिले होते.त्यानंतर ते लेख वाचून अनेकांनी अनेक समस्या मांडल्या.सर्वांची हीच अपेक्षा होती की, त्यांच्या समस्यांवर मी उत्तर द्यावं.पण वास्तव गोष्ट ही आहे की, एकविसाव्या शतकातील कपलमध्ये देखील ‘सहजीवन आणि शरीरसंबंध’… याविषयी जागृती दिसून येत नाही. जागृती असली तरीही त्याचं प्रमाण खूपच कमी दिसून येते.याविषयी काही पुरुषांनी सांगितलेल्या समस्या….
ती याविषयी मोकळेपणाने बोलत नाही.तीला शरीरसंबंध या विषयी काही टिप्स द्यायला लागलो की,ती गैरसमज करून घेते.
याविषयीचे लेख, पुस्तके वाचायला दिली की,तीची अनास्था जाणवते.
तीला वाटतं की, शरीरसंबंध हा फक्त बाळाला जन्म देण्यासाठीच असतो.
तीच्यासाठी ही गोष्ट घाण आहे. ती काहीच समजून घेत नाही. काही माहिती सांगितली तर लगेच संशय घेते.
अशा अनेक तक्रारी… अनेकांच्या आहेत. खूपदा काही स्त्रीया याविषयी जागृत असतात.पण तिथे नवरे लोक तीची खिल्ली उडवतात.किंवा याविषयी हिला इतकं कसं माहित म्हणून संशय घेतात.पण हे क्वचित….
कारण भारतीय संस्कृतीत मुलींना ही गोष्ट सांगितली जातंच नाही. ही गोष्ट सहजीवनाचा महत्त्वाचा घटक आहे याची त्यांना जाणीव नसतेच. शेवटी ज्ञान असणं आणि त्याच उपयोजन करणं यात फरक आहे.
परवाच दोन समस्या माझ्याकडे आल्या…
१) एकाच लग्न होऊन दोन वर्षे झाली.तर दुसऱ्या एकाच लग्न होऊन पाच महिने झाले.दोघांची समस्या हीच की,….we can’t feel satisfied….She can’t support me.
खरं तर अशा अनेक समस्या अनेक दांपत्यांमध्ये दिसून येतात. आणि यातूनच दोघांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते. आपणास हे मान्यच करावे लागेल की,कोणीही ते दोघे…. केवळ मानसिक प्रेम करीत एकत्र सुखाचा संसार करू शकत नाहीत. तसे असतील तर ते खूपच कमी….. केवळ प्रेमभक्त…( असतात….नसतात…. माहिती नाही)
पण माझे बरेच लेख वाचून पुरुष वर्गाच्या कमेंट्स येतात की, तुम्ही खूपदा महिलांचीच बाजू मा़डता. त्यांच्या शारीरिक तक्रारी,त्यांची बाळंतपणानंतर होणारी शारीरिक हानी, त्यामुळे त्यांच्या शरीरसंबंध लाईफ वर होणारा परिणाम…यावर तुम्ही लिहिता…पण हा विषय देखील कधीतरी मांडा…आणि म्हणूनच बाईची बाजू न घेता केवळ एक समुपदेशक म्हणून यावर मत मांडावं वाटलं.
तसा हा विषय खरच कधीही न संपणारा….. नेहमीच दबकून बोलला जाणारा आहे. आणि जोवर स्पष्टपणे, काळजी गरज म्हणून यावर बोललं जातं नाही तोवर या समस्या वाढतंच जाणार आहेत.
माझा एक गैरसमज असा होता की, सायन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांना याविषयीची माहिती नक्कीच असणार.पण माझी एक डॉक्टर मैत्रीण एकदा मला म्हणाली, ” माझं लग्न झालं तेव्हा मला शरीरसंबंध विषयी काहीच माहिती नव्हती.आणि माझा नवरा तेव्हा मला म्हणाला होता…अग तु डॉक्टर आहेस ना!
सांगायचा मुद्दा हा की,केवळ माहिती असणं,ज्ञान असणं याला काहीच अर्थ नसतो.कोणत्याही ज्ञानाच आकलन फार महत्त्वाचे असते. म्हणूनच महिला वर्गाची ही जबाबदारी असते की, आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीती करुन घेणं, त्याविषयीचे संपूर्ण ज्ञान घेऊन कामक्रिडेत उत्स्फुर्त प्रतिसाद देणं.
जर आपला जोडीदार आपल्या सोबत प्रेमाने वागत असेल,तो त्यांच कर्तव्य निभावत असेल तर…बायकोची ही त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे ही एक वास्तव जबाबदारी असते.आणि ती तिने पूर्ण करावीच.
खूपदा बायकांचे शरीरसंबंध विषयी असणारे अज्ञान त्यांच्या संसारात अडचणी निर्माण करते. यावर मी समस्त बायकांना एक सांगू इच्छिते…. परवाच एका व्यक्तीने मेसेज केला,…मी माझ्या बायकोला सर्वतोपरी सांगून पाहिले, माहिती वाचायला दिली,पण पालथ्या घडावर पाणी! मग मला सांगा, मी का बाहेर जाऊ नये?
नवऱ्याने बायकोशी एकनिष्ठ रहावे हे मान्यच…पण बायको जर नवऱ्याला समजून घेत नसेल तर आम्ही काय करावे? समुपदेशक या नात्याने उत्तर द्या.
……. यावर समस्त बायकांच उत्तर काय असेल हे जीने तीने ठरवायचं. असो…
उत्तम सहजीवनाचा आधार जसं प्रेम आहे…तस़ाच तो शरीरसंबंध हा देखील आहे. त्यामुळे समस्त महिला वर्गाने याचा विचार करावा.निदान भविष्यात यावरुन निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आपल्या लग्न होणाऱ्या मुलींना याविषयीची माहिती द्यावी.
एक ओळखीचे वकील आहेत.त्यांनीही मला हेच सांगितले की, आमच्याकडे घटस्फोटाच्या ज्या केसेस येतात त्यातील जास्तीत जास्त केसीस ह्या शरीरसंबंध समस्यांवर आधारित असतात.
त्यामुळे लग्न ही संस्था टिकवण्यासाठी मुलींना आणि मुलांना लग्नापूर्वी शरीरसंबंध लाईफ, दोघांचा त्यातील सहभाग याची परिपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं.
केवळ एकाला याची माहिती असून काहीच उपयोग नसतो.कारण दुसरा त्यांच अज्ञान कुरवाळत बसतो.त्यामुळे तिथे संघर्ष अटळच असतो.
शेवटी काय… कोणत्याही गोष्टीचे डोळस ज्ञानच माणसाला सुंदर आयुष्य जगण्यासाठी मदत करते.म्हणूनच तीने तीची जबाबदारी जाणून … तीचं कर्तव्य पार पाडावे.
कोणीतरी म्हंटले आहे… पुरुष किंवा स्त्री…ही आपली समस्या नाहीच.आपली समस्या आहे… आपलं अज्ञान ,आपला अहंकार,आपला दृष्टिकोन….
Just think….and change…
सुधा पाटील (लेखिका, समुपदेशिका)
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
लेख आवडला
खरंच खूप छान माहिती मिळाली या लेखामधून. आणखी असेच माहितीपूर्वक लेख लिहीत जावे 🙏😊💯