Skip to content

प्रेमाच्या नावाखाली वासनेचे बळी होतायत.. सर्व शाळकरी आणि कॉलेजमधील मुलींनी हा लेख जरूर वाचा.

प्रेमाच्या नावाखाली वासनेचे बळी होतायत.. सर्व शाळकरी आणि कॉलेजमधील मुलींनी हा लेख जरूर वाचा.


त्यादिवशी स्नेहा खूप रडत होती.. तिच्या रडण्याच कारण सर्वांनाच माहीत होते आणि सगळेच तिच्या नावापुरती असलेल्या प्रियकराला दोष देत होते.. हो नावापुरती म्हणणं योग्य ठरेल.. कारण काही व्यक्ती हे स्वतःच एक चुकीचं फसव उद्दिष्ट मनाशी पक्कं करून खर वाटणार पण खोटं नात बनवतात..आणि त्यांच उद्दिष्ट त्यांनी गाठल की ते सोडून निघून जातात.. त्रास मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला होतो…आणि ते नात तिथेच कायमच तुटते.. मूळात ते नात नसतेच..तो एक आभास असतो..

स्नेहाच असच झालं… अनिकेतच तिच्या आयुष्यात येणं तिच्यासाठी योगायोग असला तरी तो मात्र ठरवून तिच्या आयुष्यात तिची फसवणूक करण्याच्या हेतूने आला होता. अनिकेत ना तिच्या शाळेत होता ना कॉलेज मध्ये.. कधीही न पाहिलेल्या.. कोणाच्याही माहितीत नसलेला हा मुलगा जेव्हा स्नेहा सोबत भेटीगाठी आणि तिच्याशी असलेले संबंध वाढवू लागला तेव्हाच स्नेहाची मैत्रीण निकिता हिने तिला सावध केलं होत.. पण स्नेहाने तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी संबंध घट्ट करण्याचा प्रयत्न केला.. आणि आज मात्र स्नेहा एका कोपऱ्यात रडत बसलेली. सगळे त्या मुलाला दोष देत असताना निकिताने मात्र स्नेहाची कानउघाडणी केली.

स्नेहा आज तू का रडतेस.. असा प्रश्न ऐकताच स्नेहा बोलली की निकिता माझं चुकलं तू मला सावध केलं तेव्हा मी तुझ ऐकलं असत तर आज मी फसले नसते.. मी कोणाला सांगू शकत नाही पण अग आमच्यात फक्त भेटणं बोलणं इतकंच नव्हत तर त्याही पलीकडे संबंध होते.. त्याने त्याची शारीरिक भूक भागवली आणि मला सोडून तो निघून गेला.. माझी त्याने केलेली फसवणूक मला आयुष्यभर त्रास देईल..

यावर निकिताने उद्गारल त्याने फसवल… तीच दोषी आहेका… स्नेहा निकिताकडे बघतच राहिली.. यावर निकीताने जे बोलली ते खरंच प्रत्येक मुलीने विचारात घ्याव असच आहे..

निकिता : अनिकेत जेव्हा तुला पहिल्यांदा भेटला तेव्हा लगेच त्याने तुला प्रेमाची कबुली दिली का..??

स्नेहा : नाही…

निकिता : मग मला सांग त्याची आणि तुझी जुनी ओळख होती का…??

स्नेहा : नाही ग.. त्याचा आणि माझा कुठलाच संबंध नव्हता.. नाही कोणती ओळख.

निकिता : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा समोरासमोर आले त्यावेळी त्याच्याशी तू हसली का.. की तोच उगाच तुझ्या मागे फिरत होता..

स्नेहा : नाही … त्याने मला hii hello केल्यावर मी स्वतः त्याच्याशी बोलली

निकिता : तुमचा contact कसा झाला.. तुझा फोन नंबर त्याने मागितला तेव्हा तू दिलास की त्याने जबरदस्ती घेतला तुझ्याकडुन ??

स्नेहा : जबरदस्ती नाही.. ओळख झाली.. थोडंसं बोलणं झालं आणि मग त्याने नंबर मागितला आणि मी दीला

निकिता : आता सांग.. त्याला जेव्हा तू बाहेर भेटायची तेव्हा तो तुला जबरदस्तीने बाहेर भेटायला सांगायचा का ??

स्नेहा : नाही.. कोणतीच जबरदस्ती नसायची.. त्याने कधी भेटायचं बोललं की मी तयार असायची.. मी कधी त्याला टाळत नव्हती.. कारण माझं मनापासून प्रेम होत त्याच्यावर..

निकिता : आणि तुमचे जे लग्नाआधीच संबंध झाले.. स्पष्ट बोलायचं तर शारीरिक संबंध जेव्हा तुमच्यात झाले त्यावेळी सुद्धा त्याने जबरदस्ती केली का..?? तुला त्याने फसवून बंद खोलीत नेल का ..?? तुझ्या परवानगी शिवाय तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या का ..??

यावर स्नेहा एकदम शांत झाली.. आणि अगदीच रडक्या आवाजात निकिताला तिने उत्तर दिलं.. की नाही ग.. त्याने मला जेव्हा जिथे बोलावलं तिथे मी त्याला भेटायची.. त्याने जेव्हा मला हॉटेल रूम मध्ये नेल तेव्हा सुद्धा मी त्याला एक दोन वेळा नाही बोलली पण नंतर त्याला नकार दिला तर त्याला वाईट वाटेल आणि कुठेतरी माझ्याही मनात त्या भावना वाढल्या होत्या म्हणून मी हो म्हणत सगळ्या मर्यादा सोडल्या..

निकिता : आता तूच मला सांग जर त्याने तुला कोणतीही आणि कधीच जबरदस्ती केली नव्हती.. तू स्वतःच त्याला होकार देत होतीस.. पहिल्यांदा तू त्याच्याशी हसून त्याचा मार्ग मोकळा केलास.. नंतर त्याला नंबर देणं.. त्याच्याशी नेहमी भेटणं बोलणं.. त्याच्याशी असलेले तुझे सगळे संबंध हे जर तुझ्याही संमतीने त्यावेळी झालं होत तर आज त्यालाच दोष देऊन काय उपयोग..

मी अस म्हणत नाही की तो दोषी नाही.. नक्कीच तो गुन्हेगार आहे.. त्याने तुला फसवल आहे. पण तू सुद्धा त्याला वाट मोकळी केली होतीस..
आज इतक्या बातम्या आपण ऐकतो.. मुलींना चिरडून त्यांचे तुकडे जंगलात फेकतात.. कोणावर बलात्कार होतो.. सतत या हेडलाईन्स आपण ऐकतो.. वाचतो.. त्यावेळी आपल्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते.. मग तरीसुद्धा आपण त्याच वाटेवर का जायचं..

तुझ प्रेम आहेस अस म्हणतेस पण मला सांग या वरवरच्या नात्याला प्रेमाचं नाव देऊन.. प्रेम या शब्दाचं या नात्याच पावित्र्य का घालवायच आपण..
प्रेम म्हणजे भेटणं बोलणं आणि शरीर संबंध नाही.. आपणच चुकतो म्हणून आपल्याला फसवण्याचा अधिकार मिळतो समोरच्या व्यक्तीला.. तू जर हात लावायची सुद्धा परवानगी दिली नसतीस तर त्याने तुला बंद खोलीत घेऊन जायची इच्छा व्यक्त केली नसती..

पण जिथे आपणच बोट देतो तिथे हात पकडायला वेळ लागणार आहे का..प्रेम हे बंद खोलीत नसते.. पहिले आपण आपल रक्षण कस आणि कुठे केलं पाहिजे हे आपल्याला कळायला हवं…

कोणीही भेटल.. बोललं.. थोडा चांगुलपणा दाखवला की तिथेच प्रेम समजून त्या चुकीच्या नात्यात अडकून फसवणूक करून आता रडत बसण्यापेक्षा त्यावेळी सावध राहून.. ओळख घेऊन वागल तर नक्कीच ही वेळ येणार नाही. ओळख घेणं म्हणजेच माणसं ओळखण प्रत्येकाला जमेल अस नाहीच पण आपण आपली काळजी घेणं आणि आपली सुरक्षितता जपण हे नक्कीच आपल्या हातात आहे..

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!