Skip to content

आपला मूड सहजच खराब होतो, तो होऊ नये यासाठी हे टिप्स वापरा.

आपला मूड सहजच खराब होतो, तो होऊ नये यासाठी हे टिप्स वापरा.


आपला मूड सहजच खराब होतो.. आपल्या मनाविरुद्ध काही घडल …कोणी काही बोललं की आपल्याला वाईट वाटते.. आपण सतत त्याचा विचार करत बसतो.. कधी कधी तर खूप रडू येते.. आणि अशावेळी आपण जे काही ठरवलेलं असते ते बाजूला सारून फक्त त्याचाच विचार करतो..मग अशावेळी आपण काय करावं जेणेकरून आपला मूड बिघडणार नाही तर…..

१) आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवा

आपल्याला कोणी काहीही बोलुदेत आपल लक्ष मात्र आपल्या ध्येयाकडे असावं.. अनेकजण जाणूनबुजून आपल आपल्या ध्येयाकडे .. आपल्या कामाकडे दुर्लक्ष व्हावं.. आपल कुठेतरी नुकसान व्हावं म्हणून सुद्धा आपल्याला त्रास देतात.. तर कधी कोणी नकळत आपल्याला त्रास देतात.. आपल्याला वाईट वाटेल अस बोलतात.. जर कोणी काही बोलण्याने आपल ध्येय दुर्लक्षित होत असेल तर आपल पुढे नुकसान होईल हे आपण लक्षात घेऊन कोणाच्या बोलण्याने स्वतःचा मूड न बिघडवता आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष दिलं तर उगाच आपण करत असणारे विचार डोक्यातून निघून जातील.

२) दुर्लक्ष करा

आपल्याला जाणीव असते की कोणाच्या बोलण्याचा त्रास आपल्याला होतोय.. त्यांच्या बोलण्याचा आपल्यावर होणारा परिणाम आपल्यालाच नंतर सहन करावा लागतो.. म्हणून स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा ज्यावेळी आपल्याला कोणी काही बोलतात .. काही वेगळं वागतात त्यावेळी तिथेच त्यांचं वागणं बोलणं मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष करायचं.

३) सुधारणा करा

कधी अस सुद्धा होते की कोणी आपल्याला काही बोलते आणि आपल्याला चटकन वाईट वाटते पण एखादी व्यक्ती अशी सुद्धा असते जी आपल्याला स्पष्ट बोलून दुखावेल पण ती व्यक्ती आपल्या हिताचं सांगत असते..आणि जेव्हा कोणी खर बोललं तरीसुद्धा त्यावेळी वाईट वाटतं.. राग येतो..पण नंतर शांत डोक्याने विचार केल्यावर जेव्हा त्या व्यक्तीने आपल्या हिताचं सांगितलं आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर आपल्या वागण्यात नक्कीच गरजेप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून पुढे आपल्याला कोणी दोष देणारं नाही.आणि जर आपण काही करताना ते मनाप्रमाणे नाही झालं तर कदाचित त्यामध्ये आपण कुठे चुकत असू तर त्यामध्ये सुद्धा आपण बदल करून आपल्यातील क्षमता वाढवण्याचे काम आपण करत राहायचे.

४) मानसिकता बदला

कोणी काही बोललं किंवा आपल्याशी वेगळ्या पद्धतीने वागले की लगेच आपण आपला मूड बिघडवयचा नाही .. मुळात दुसऱ्याच्या वागण्याने आपण आपल्यावर परिणाम करून घ्यायचाच नाही.. जिथल तिथेच सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करायचा. कोणाच्या वागण्याबोलण्याने आपण आपल्या स्वभावात, आपल्या मनःस्थिती मध्ये बदल करायचा नाही.आणि आपल सुद्धा जे ठरलं त्याप्रमाणे आपल्याला करता आले नाही.. मनाविरुद्ध घडल तरी मूड खराब न करता अजून जास्त प्रयत्न करण्याची मानसिकता ठेवायची. ज्यामुळे आपण नेहमीच प्रयत्नशील राहू आणि आपल्याला आलेलं अपयश सुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठी अडवणार नाही.

५) कलेची जोपासना

कोणत्याही आजारावर कायमच सर्वोत्तम औषध असेल तर ते म्हणजे आपल्यातील कला.. आपल्यातील कला आपल्याला इतकं त्या कलेमध्ये गुंतवते की आपल्याला त्यावेळी आजूबाजूच्या जगाचा सुद्धा विसर पडतो.. कोणतेच विचार त्यावेळी मनात प्रवेश करत नाही.. आपण जेवढा विचारांना वेळ देतो त्यापेक्षा आपण तोच वेळ आपल्यातील कलेला दिला तर नक्कीच आपण आपल मन आणि आपला मूड आपल्या ताब्यात ठेवू शकू.

६) संवाद

काहीवेळेस तर आपला मूड इतका आपण खराब करतो की आपल्याला रडू येते.. आपल्यातील संताप शिगेला जातो.. आपल कशातच लक्ष लागत नाही.. काही करावं सुचत नाही.. तर अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आपल्या मनातील घालमेल नक्कीच शेअर करा. जेणेकरून आपल मन हलकं होईल आणि काहीवेळेस मन मोकळं झालं तरी आपला मूड सुद्धा बदलतो.

७) महत्त्व देणं कमी करा

आपण कोणाला आणि कोणाच्या बोलण्याला महत्त्व द्यावं हे आपल्याला कळायला हवं.. कोणीही आपला मूड सहज खराब करत असेल तर मग आपणच कुठेतरी चुकतोय हे लक्षात घ्या. कारण आपण इतरांना.. त्यांच्या विचारांना.. त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देत असल्याने आपल्यावर त्याचा सहज परिणाम होतो.. त्यापेक्षा आपण आपल्या विचारांना आणि आपल्या भावनेला जास्त महत्त्व दिलं तर नक्कीच आपल्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही.

८) आवडीच्या गोष्टी करा

ज्यावेळी आपला मूड ठीक नसेल त्यावेळी सहसा आपल कशात लक्ष लागत नाही.मग अशावेळी आपल्याला आवडतील आणि आनंद देतील अशा गोष्टी करायच्या. कोणाला गाणे ऐकायला आवडते.. तर कोणाला वाचन.. कोणाला फिरायला आवडते.. तर जे आवडते ते करायचं ज्यामुळे आपल मन उत्साही होते.

आपला मूड नेहमीच बदलत राहतो.. आणि आपल्या मूडचा परिणाम आपल्या आजवर होतो आणि नक्कीच त्यामुळे भविष्यावर सुद्धा परिणाम होणार म्हणून आपला मूड आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी वरील प्रयत्न नक्की करून पाहुयात ज्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक आणि उत्साही राहू.

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपला मूड सहजच खराब होतो, तो होऊ नये यासाठी हे टिप्स वापरा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!